कोण खरी पतिव्रता??

Written by

यश आणि सचिन, लहानपणापासून चे मित्र. एकाच बिल्डिंग मध्ये राहणारे हे दोघे एकाच शाळेत शिकलेले…योगायोगाने दोघांना नोकरी एकाच ठिकाणी लागली…

एकमेकांच्या प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी ते धावून जात असत…

दोघे नोकरी मध्ये सेट झाले तसा त्यांच्या लग्नाचा विषय घरात सुरू झाला…यश आणि सचिन चे आपल्या भावी पत्नी बद्दलचे मत जरा वेगळे होते…

यश ला आपली बायको जुन्या वळणाची, आपल्या ताब्यात राहणारी, जे सांगेल ते मुकाट्याने करणारी बायको हवी होती तर या उलट सचिन ला नवीन विचारांची, आधुनिक पण संस्कारी मुलगी हवी होती…

देवाच्या कृपेने दोघांना अशाच बायका मिळाल्या…

यश ची बायको संपूर्ण दिवस संसार आणि देवधर्म करण्यात घालवत असे..नवऱ्या साठी सतत उपास, सतत कोणते तरी व्रत…यातच गुंतलेली असे…नवऱ्यापेक्षा देवाशीच जास्त बोलत असे…

सचिन ची बायको घर आणि नोकरी दोन्ही सांभाळत असे, सचिन ला नवीन नवीन काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन देत असायची, नवीन पुस्तकं वाचायला आणायची, एखादा माहितीपट बघायला सांगायची…नवीन नवीन गोष्टींवर दोघांच्या चर्चा चालत असत.. राजकारण असो वा शैक्षणिक विषय, तिला सगळी खडानखडा माहिती असायची…उपास तापास करण्यावर तिला विश्वास नव्हता…सचिनची अशी उद्योगी बायको मिळाली म्हणून समाधानी असायचा…

लोकं म्हणायची, “यश ला अगदी पतिव्रता बायको मिळाली हो…किती करते ती नवऱ्या साठी… नाहीतर पहा ती सचिन ची बाई, या मुलीला फक्त स्वतःची नोकरी आणि पैसा हवाय..कधी काही देवधर्म नको की काही व्रत नको नवऱ्यासाठी, काय तर म्हणे ऑफिस मध्ये महत्वाचं काम आहे, म्हणून वटपौर्णिमा करणार नाही, सचिन च काय होणार कुणास ठाऊक…!!!”

सचिन ला सगळं समजत होतं, लोकं काय बोलतात ते…पण तो पर्वा करत नव्हता…

दोन्ही जोडप्यांचा संसार अगदी सुखात सुरू होता, अचानक कुणाची तरी नजर लागावी असे संकट त्यांच्यावर चालून आले…

यश आणि सचिन च्या कंपनीवर गुन्हा दाखल झाला आणि दोघांचीही नोकरी गेली.. तिथल्या कर्मचाऱ्यांवर आरोप केला गेला आणि त्यांना कुठेही नोकरी मिळणार नव्हती…

यश च्या बायकोने अजून उपास चालू केले, व्रत चालू केले…नवऱ्याचं संकट दूर व्हावं म्हणून…ज्योतिषी कडे चकरा सुरु झाल्या…पंचधातू ची अंगठी घाल, पाचू ची अंगठी घाल असे प्रकार तीने नवऱ्याला करायला सांगितले…

इकडे सचिन च्या बायकोने धीराने परिस्थिती सांभाळली, ती नोकरीत ओव्हरटाईम करु लागली, त्यामुळे पैशांचा प्रश्न सुटत गेला…पण सचिन निराशेच्या गर्तेत जात होता, हे लक्षात येताच तीने सगळी माहिती काढून सचिन ला एका छोट्या व्यवसायात गुंतवले, आपल्या कमाईतून तिने बरीच बचत केली होती, त्यातून तिने भांडवल उभे करायला मदत केली, या व्यवसायात सचिन ला आवड निर्माण होऊ लागली, तिने सचिन ला बरीच पुस्तकं वाचायला लावलेली, त्यात व्यवसायचीही बरीच पुस्तकं होतो, त्याचा फायदा त्याला झाला…तो कामात गुंतून राहू लागला…आणि निराशेच्या गर्तेत जाण्यापासून बचावला…अगदी कसोशीने सचिन च्या बायकोने परिस्थिती पूर्वतत आणली.

यश च्या बायकोचे उपास मात्र संपत नव्हते, यश ला मानसिक आधाराची गरज होती, पण त्याची बायको सतत देवासमोर…

यश च्या ठायी एकाकीपण येत होते, विचार करून करून मन सुन्न होत असे…असंच एक दिवशी त्याला झटके येऊ लागले, त्याची बायको देवघरात…त्याने कळवळून आवाज काढला तेव्हा ती धावत आली,


त्याला पाहताच ती घाबरली, देवाच्या धावा करू लागली..

सचिन त्याचा बायकोशी फोन वर बोलत होता, ती कामावर गेली होती..

आवाज ऐकून तो यश च्या घरी धावत आला, फोन चालूच होता…

सचिन च्या बायकोला परिस्थिती कळताच तिने अम्ब्युलन्स बोलावली आणि तीही धावत आली, अंबुलन्स येईपर्यंत तिने यश च्या छातीवर आणि हातावर काहीतरी प्रथमोपचार केले. अम्ब्युलन्स आली, यश ला दवाखान्यात नेले आणि उपचार सुरू झाले…

सचिन, त्याची बायको आणि यश ची बायको आय सी यु बाहेरच उभे होते, 3-4 तासांनी डॉक्टर बाहेर आले तसे त्यांनी सांगितले की प्रथमोपचार केले आणि लवकर आणलं म्हणून यश चा जीव वाचू शकला…

सचिन च्या बायकोने बरीच पुस्तकं वाचलेली त्यातूनच ती हे शिकली होती…

सचिन च्या बायकोने स्वतःचा संसार, नवऱ्याचं भवितव्य.. इतकंच नाही तर दुसऱ्याचंही सौभाग्य वाचवलं होतं…

सचिन यश च्या बायकोला बोलला..

“नसेल केली हिने कधी वटपौर्णिमा, कारण पुढच्या सात जन्माची सोय करण्या आधी या जन्मात मला चांगलं आयुष्य देण्यासाठी ती झटत होती…

नसेल केलं हिने कधी व्रत किंवा उपास, नसतील केल्या देवाच्या धावा.. कारण चमत्कारा पेक्षा नवऱ्याच्या सामर्थ्यावर तिचा जास्त विश्वास होता..

माझ्या रक्षणासाठी नसतील मला बांधले गंडे दोरे, तिने हातात पुस्तकं टेकवली ज्यांनी माझं रक्षण केलं..

ती अर्धांगिनी बनून राहिली, मानसिक आणि आर्थिक दृष्टीनेही..

हीच माझी खरी पतिव्रता आणि माझी सावित्री”

अश्याच सुंदर सुंदर कथा वाचण्यासाठी आमच्या खालील फेसबुक पेज ला नक्की लाईक करा

https://www.facebook.com/irablogs/

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा