कोरोंनामुळे झाली घर हीच शाळा ,मुलांना द्या संस्कार, चांगल्या सवयी आणि आरोग्याचे धडे.

Written by
  • 3 आठवडे ago

कोरोंना विषाणूच्या जगभर पसरणार्याु प्रादुर्भावमुळे सध्या जगातील सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत, जणू आपण फक्त यंत्रामनवसर्खे घरातच फिरतोय अशी अवस्था झाली आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार थांबले आहेत. त्यातही शाळा बंद आहेत 31 मार्चपर्यंत. मोठ्या औद्योगिक क्षेत्रासारखा मानसलाही ब्लॉक क्लोजर निसर्गाने दिला हे, असे माला वाटते. असो, याची गरज होतीच पण ती माणसाने जाणवली नाही निसर्गाने ती माणसाला दिली. शाळा बंद आणि मुले घरात म्हंटल्यावर बर्यांच पालकांच्या कपाळावर आठ्या पडल्याच पण मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असणार की आता 15 दिवस या मुलांना कसे सांभाळायचे? आजाराच्या भीतीने सुट्टीत बाहेर गर्दीत जाता येत नाही, बाहेरचे काही खायला देता येत नाही, अभ्यास कसा घ्यायचा, काय शिकवायचे अश्या अनंत प्रश्नांनी पाळकवर्ग चिंतेत आहे. मी ही एक आई आहेच, मलाही हेच प्रश्न पडले आहेत पण मी त्यातून मार्ग काढलाय. तो मार्ग काय आहे ते मी या लेखातून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. कदाचित वेगळ्या अर्थाने घर हीच शाळा बनवून या 15 दिवसात आपल्या सारख्या पालकांना शिक्षकाची भूमिका पार पडायची आहे.
माझ्या मुलाला सुट्टी लागल्यानंतर मी विचार करून काही कामांची यादी केली. त्यामध्ये अभ्यासाबरोबर घरातील काही कामांचाही समावेश आहे. यामध्ये चार भाग पडले, अभ्यास-संस्कार- सवयी- आरोग्य. या चार विषयांची शाळेत असते तशी तासिका मात्र नाही केली, पण अभ्यासाच्या वेळ मात्र तीच ठेवली. माझा मुलगा मोठ्या गटात म्हणजे सीनियर केजीत आहे. त्यामुळे त्याच्या मूड्नुसार या गोष्टी मी त्याला करायला सांगते. त्यामध्ये काय काय आहे बघा.
घरकाम
1) दुकानातून दूध आणि इतर आवश्यक वस्तु आणणे. 2) धुतलेले कपड्यांच्या घड्या घालणे.3) झाडांना पाणी घालणे. 4) खेळण्यांशी खेळून झाल्यावर ती पिशवीत भरणे. 5)घरातील खुर्च्या पुसणे 6) घासून ठेवलेली भांडी मांडायला मदत करने 7)सरबत तयार करणे. 8) वर्तमानपत्र घडी घालून ठेवणे.9) भाजी फ्रीज मध्ये ठेवणे, वस्तु जगाच्या जागी ठेवणे,10) छाप घेवून रांगोळी काढणे. 11) घरच्या आसपासचा कचरा गोळा करणे.
अशी काही कामे मी त्याला रोज सांगते एका दिवशी दोन किंवा एकाच काम सांगते म्हणजे त्याला कंटाळा येत नाही आणि ते काम करताना आनंद होतो.
संस्कार आणि सामान्य ज्ञान
एरवी मुले शाळेत जातात आणि संध्याकाळी काहींची शिकवणी असते त्यामुळे आवर्जून त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी पालकांना वेळ मिळत नाही. पण आता 15 दिवसांचा मोठा वेळ पालकांना आणि मुलांनाही मिळाला असून यामध्ये अनेक संसारीक गोष्टी मुलांना शिकवू शकता.
1)सकाळची प्रार्थना- कराग्रे वसते लक्ष्मी,सायंप्रार्थना-शुभमकरोति, दिव्य दिव्य दीपत्कार 2) मनाचे श्लोक किंवा त्यातील काही श्लोक. 3)गणेश स्तोत्र. 4) स्वतःचा पूर्ण पत्ता, आई वडिलांचे दूरध्वनी क्रमांक. 5)नद्यांची नावे, शहरांची नावे, गाणी, पोवाडा 6) रंजक गोष्टी सांगणे. 7) पेपरपसून काही वस्तु तयार करणे अश्या अनेक गोष्टी मुलांना पालक शिकवू शकतात.
चांगल्या सवयी आणि आरोग्य.
मुलांना एरवी सकाळी उठल्यावर दात घासणे, पोत साफ करणे आणि आंघोळ करून, कपडे घालून शाळेत शाळेत जाणे एवढीच सवय लागलेली असते कारण ती अनिवार्य असते. पण याशिवायही अनेक चांगल्या सवयी लावण्याची गरज आहे त्या पाहुयात.
1) योगासने करणे, व्यायाम करणे. 2) खेळून आल्यावर साबणणे हातपाय, तोंड स्वच्छ धुणे.3) जेवण झाल्यावर ताट घासायला देणे, उचलून ठेवणे, जेवताना सगळ्यांसाठी पाणी घेणे. 4)घरात येणार्याच माणसांना नमस्कार करणे. 5) वाचन करणे 6) चांगल्या गोष्टी ऐकणे.7) निसर्गात रमणे.
आता महत्वाचा मुद्दा अभ्यास. अभ्यास तर घेतलाच पाहिजे पण तो काहीशी युक्ति वापरुन घेतला तर त्याचा कंटाळा येणारच नाही. त्यासाठी अभ्यास लेखी आणि तोंडी या दोन प्रकारात घ्यायला हवा. तोंडी प्रकारात आधी काही खेळ खेळा, म्हणजे आकडे मुलांना सांगा आणि त्यांची स्पेलिंग त्यांना लिहायला सांगा, तसेच फळे, अवयव नावे, इंग्रजी आणि मराठी मुळाक्षरे, पाढे म्हणणे या गोष्टी करता येतील. तसेच लेखनाच्या बाबतीतही करता येईल. शाळेतील पुस्तकातील अभ्यास, वाचन याचाही अभ्यास मनोरंजक पद्धतीने पालकांनी घ्यावा. या सगळ्या गोष्टी पालकांनी पाल्यांना दमदाटी किंवा मारहाण ना करता कराव्यात. काही अडचण आल्यास शाळेतील शिक्षकांना जरूर विचारणा करावी. कारण बाहेरच्या परिस्थितीमुळे त्यांना घरात बसावे लागते यात त्यांची चूक नाही तर सुरक्षितता आहे. याचा चांगला उपयोग म्पाल्यांना आणि पालकांना व्हयवा हीच अपेक्षा. सर्वांनी काळजी घ्या आणि निरोगी रहा.
पल्लवी काटेकर,कोल्हापूर.

Comments are closed.