कोरोनाला पळवून लाऊ

Written by

कोरोना ने जगभर सगळीकडे नुसता धुमाकूळ माजवला. या आलेल्या संकटाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने एक चांगला पर्याय निवडला. 22 मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला. सगळ्यांना घरी बसण्याची विनंती करण्यात आली. नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद दिला. यात डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय क्षेत्रातील इतर स्टाफ, तसेच सफाई कामगार यांनी मोलाचे योगदान दिले. यांच्यासाठी तसेच कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी ज्यांचा ज्यांचा वाटा होता अश्या सगळ्यांसाठी संध्याकाळी पाच वाजता टाळ्या वाजवल्या गेल्या. नागरिकांनी आनंदाने टाळ्या वाजवून, लहान मुलांनी तर डमरू वाजवून या सगळ्यांचेच कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा आपण सर्वजण यासाठी योग्य ती काळजी घेऊ. 31 मार्च पर्यंत शक्यतो घराबाहेर पडायचे टाळू आणि देशावर आलेली ही आपत्ती लवकरच दूर होऊदे अशी एक अपेक्षा करुया.

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.