कोरोना….एक युद्ध

Written by
         गो कोरोना गो..,गो कोरोना गो…, असे मीच  नव्हे, माझे कुटुंबच नव्हे, तर या पृथ्वीतलावर असणारे जास्तीत जास्त लोक म्हणत आहेत, पण बाब अशी आहे की,खरंच आपल्या म्हटल्याने तो जाणारा आहे का…तर याचे उत्तर आहे..नाही, मुळीच नाही…. कोरोना हा विषाणू इतका स्वाभिमानी आहे की त्याला जो पर्यंत आपण आपल्या घरात म्हणजेच शरीरात आणत नाही तो पर्यंत तो येत नाही.
कोरोना चा इतका कहर आहे की, जणू हा कोणता तरी महा प्रलायचा प्रकार आहे, आता पर्यंत पहिले युद्ध आणि दुसरे युद्ध हे फक्त पुस्तकात वाचले होते, परंतु कोरोना युद्ध इतके भयानक आहे की याची कधी कल्पना सुध्धा केली नव्हती, या युध्दाचा अंत केव्हा होईल याकडे सर्वांच्या नजरा आहे.
 कोरोना सोबत जर युद्ध आपल्याला खेळायचे असेल तर,फक्त आणि फक्त स्वतःचा घराबाहेर पडायचं नाही.परंतु हे युद्ध कमी  न होता दिवसेंदिवस वाढतच आहे…या युद्धामध्ये जर जिंकायचे असेल तर कुणासोबत संपर्क न करता सरळ घरी बसून राहायचे.
कोरोणा वायरस हा शरीराच्या बाहेर असला तर मरतो एकदा का तो शरीराच्या आत गेला तर मरत तर नाही तर याउलट तो झपाट्याने वाढतो, अशा या व्हायरस ला हरवण्यासाठी आपल्याला कोणाच्या संपर्कात न येणे महत्त्वाचे.
युरोप खंड मधील देशातील कोरोना ची स्थिति जर बघितली आणि तशी अवस्था जर भारताची झाली तर आपले काय होईल,…कल्पना न केलेले केव्हाही चांगले,..तशी अवस्था होऊ नये या करिता आपण जसं आपल्याला भारतीय सरकार सांगत आहे तसच करायला पाहिजे,सरकारला आपल्याला चांगला प्रतिसाद देऊन स्वतःच्या जीवाची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे….
कोरोना हे युद्ध जर संपयाचे असेल तर कुठेही न जाता केवळ आपल्या स्वतःच्या घरात बसायचे आहे आणि हीच आपली सर्वांची देशभक्ती होईल …. या युद्धामध्ये बळी आपले आप्त जाऊ नये म्हणून, या बाबतीत अगदीच गांभीर्याने विचार करायचा आहे,आणि हे युद्ध आपल्याला कोणत्याही किमतीत जिंकायचे म्हणजे जिंकायचं…
 असे वाटते की जणू हे एखादे स्वप्न आहे डोळे उघडताच सर्व काही नीट आहे….परंतु नाही हे स्वप्न  नसून एक भयानक सत्य आहे ..आणि सत्यात पुढे किती बळी जातील याचा अंदाज लावताना सुद्धा थरथरायला होतंय…
हे भयानक सत्य लवकरात लवकर संपो, अन सगळं काही आदी सारखं स्वच्छंद होऊ….तर मग चला या युद्धात सहभागी होऊया….घराच्या बाहेर न जाता कोणाच्या संपर्कात न येता घरातच बसून वारंवार हात धुऊन घेऊया …स्वच्छ राहूया,..जय हिंद जय भारत……आणि शेवटी एकच म्हणावसं वाटते …….गो कोरोना गो….गो कोरोना गो…..

Comments are closed.