कोरोना समज गैरसमज

Written by

#corona
#covid19
#lockdown

कोरोना समज गैरसमज
Stamping आणि home qurantaine

जेव्हा पासून सगळीकडे कोरोना ची साथ सुरू झाली तेव्हापासून बरेच वेगवेगळे नवीन शब्द सामान्य लोकांच्या कानावर येत आहेत..किंबहुना आमच्या ही वापरात येऊ लागले आहेत…त्यापैकी जास्त वापरले जाणारे शब्द आहेत ते म्हणजे stamping आणि homequarantaine,यांच्यासोबत अजून एक शब्द तुम्ही ऐकला असेल तो म्हणजे Isolation ward..
रोज duity करत असताना कोरोना संबंधीत बरेच वेगवेगळे पेशन भेटत आहेत..त्यातील ज्यांना कोणाला काही लक्षणे दिसत आहेत त्याना आपण योग्य ते मार्गदर्शन करत आहोत.परंतु लोकांच्या मनात या विषयी बरेच गैरसमज आहेत.त्यामुळे त्याना या गोष्ट समजणे गरजेचे आहे.
1) सगळ्यात महत्वाचे जर तुम्हला कोरोना समबंधीत काही लक्षणे दिसून येत असतील जसे की

ताप,कोरडा खोकला,श्वसनास अडथळा अशी लक्षणे दिसून येत असतील तर सगळ्यात पहिलं आपलं कर्तव्य आहे ते म्हणजे घाबरून आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेणे..मी काही असे ही पेशट पाहिलेत जे आपल्याला कोरोना झाला म्हणजे आपली बदनामी होईल या भीतीने घराबाहेर पडत नाहीत आणि आपली लक्षणे लपवून ठेवतात.परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर अशी लक्षणे दिसत आहेत म्हणजे आपल्याला कोरोना ची लागण झाली आहे अस नाही,पण आपल्याला लागण होऊ नये म्हणून आपण हॉस्पिटल मध्य जाऊन आपली तपासणी करून घेणे आणि यौग्य ती औषधे अर्थात (ती ही लाक्षणिक चिकित्सा) घेणे गरजेचे आहे.म्हणजे थोडक्यात आपल्यला अशी लक्षणे दिसून आली तर घाबरून न जाता दवखाण्यात जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे.

2) दुसरा एक महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे होम क्वारंटाईन..याचा ढोबळमानाने अर्थ घरगुती विलगिकरण असा होतो.यामध्ये आपण कोरोना सदृश्य लक्षणे आढळलेल्या रुग्णांना त्याच्या घरीच विलगिकरन करून under obsrevation ठेवतो.सोबत त्याला काही दिवसाच्या supportive medicins देतो.यावेळी त्या रुग्णाला आपण सलग 14 दिवस घरात राहण्याचा,तोंडावर मास्क बंधने,पाणी गरम पिणे या प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे.
परंतु एवढं समजावून सांगून देखील जे जे लोकांना अश्या प्रकारे home qurantaine केलेले आहे ते लोक सुचना देऊन ही घराबाहेर फिरताना दिसून येतात..,पण यांनी हे समजून घेतले पाहिजे यामुळे ते स्वतः बरोबर इतरांचा जीव ही धोक्यात घालत आहेत.
हे समजून घ्या की तुमच्या प्रमाणे मुबाईत सुध्दा ज्या लोकांना अशी काही लक्षणे नाहीत अशी सुज्ञ लोकं आपली जबाबदारी म्हणून घरात राहत आहेत.
3)स्टॅम्पिंग
तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच लोकांच्या ज्यांना ही लक्षणे दिसून येतात त्याना घरीच राहण्यासाठी म्हणून शिवाय त्यांनी किती दिवस घरी थाम्बल पाहिजे याची नोंद केलेले शिक्के बऱ्याच लोकांच्या हातावर दिसून येतात.याचा अर्थ तुम्हला कोरोना ची लागण झाली आहे असा नसून तुम्ही तुमच्या काळजी साठी घरी थाम्बल पाहिजे असा आहे.हा शिक्का त्याच लोकांना मारला जातो ज्यांना कोरोना सदृश लक्षणे दिसून येतात आणि जे ज्या भागात कोरोना चे रूग्ण आढळून आले आहेत त्या भागातून,शहरातून,राज्यातून,देशातून आले आहेत.
त्यामुळे ज्या काही लोकांच्या हातावर शिक्के मारले आहेत त्यानि ही घाबरून न जाता घरात राहुन स्वतःची काळजी घेतली पाहिजे.

4)आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ISOLATION(ढोबळमानाने हॉस्पिटल पूर्णपणे विलगीकरणं)
या मध्ये मात्र काळजी करणं गरजेचं आहे.यामध्ये ज्यांना कोरोनाची लक्षने दिसून येत आहेत व जे कोरोनाच्या प्रथम तपासणी मध्ये positive आले आहेत त्याना मात्र सक्तीने जिथे अत्यावश्यक सर्व वैद्यकीय सेवा असतील अश्या दवाखान्यात डॉक्टर्स च्या निगराणी खाली लाक्षणिक चिकित्सा देत ठेवलं जात.
पन अस ही नाही की ज्या रुग्णाला isolation ward मध्ये ठेवले आहे म्हनजे तुम्ही धोक्यात आहेत .अश्या ठिकाणी उपचार घेऊन 14 दिवसात बरे होऊन गेलेले रुग्ण ही आहेत.तसेच जे लोकं isolation मधून सुखरुप बरे होऊन आलेले आहेत त्यांच नाव ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुपित ठेवलं जात.

त्यामुळे एक डॉक्टर म्हणून माझी एकच विंनती आहे की सध्या सगळीकडे संभ्रमाचं व वातावरण आहे..अश्यावेळी कोणत्या ही अफवानां बळी न पडता स्वतःची काळजी घ्या.आणि कोणाला काही ही शंका असतील तर नक्की विचारा.स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची ही.आम्ही आहोतच तुमच्या साठी सदयेव तत्पर..!

फक्त एक लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही स्वतःहुन काही लक्षाने दिसून आल्यावर पुढे याल त्यावेळी तुम्ही तुमच्यासोबत हजारो लोकांचे प्राण वाचऊ शकता….!

✍️डॉ अजित सुगंधा कृष्णन
शासकीय वैद्यकीय अधिकारी सिंधुदुर्ग

काही शंका असतील तर नक्की msg करा

Article Tags:

Comments are closed.