क्षण…. फक्त आपलेच….

Written by

हे क्षण… फक्त आपले….

(ती त्याच्या खांद्यावर डोक ठेवून झोपण्याचा प्रयत्न करतेय)
ती : ऐक ना? झोपलास??

तो : हमम् नाही…

ती : झोप येत नाहीये…. बोल ना काहीतरी…

तो : काय बोलू??

ती : हमम्, I love you…

तो : Love you too…

ती : No!!!!     I love you….

तो : I love you too 3,4,5,6,7 to ………100

ती : So…. Sweet…. नेहमी असाच माझ्यावर प्रेम करत राहशील ना….

तो : पागल आहेस काय??? मी तर यापेक्षाही जास्त प्रेम करेन….

ती : हम्म्म, दिवसभरातून एक फोन पण नाही करत…

मी कशी अॉफीस मध्ये कामात असूनपण फोन करून विचारते… अहो जेवलात का?? काय करताय?? Etc… etc…. तुम्हाला नाही आठवण येत माझी ???

तो : अगं… वेडे…. आठवण येण्यासाठी आधी विसराव लागत…., तु… मला… विसरू देणार आहेस???

ती : हममम्…….. बोलायला सांगायला नको…, ते तुम्हाला बरोबर जमत… त्याबाबतीत हुशार आहात….

तो : मग… हुशार आहे…. म्हणून तर तुझ्याशी लग्न केलं…. (तिला चिडवत)

ती : (काहीशी रागात) काय म्हणालास????

तो : अगं… म्हणजे तुझ्यासारखी गोड, समजूतदार, विश्वासू, माझ्यावर भरभरून प्रेम करणारी, माझी काळजी घेणारी बायको थोडी ना दुसरी कोणी भेटणार आहे… (अगदी लाडात)

ती : मग… मी म्हणून झेलते तुम्हाला….दुसरी कोणी टिकणार नाही तुमच्याकडे….

तो : हो का???

ती : हो मग….

तो : हममम् ……. हे तर खरं आहे, मला तुच समजू शकतेस….. म्हणून तर मी तुला येवढं प्यार करतो… (तिला मिठीत घेऊन)

ती : (मिठी घट्ट आवळत, लाडात येऊन) हमममम् Love you….

तो : (तिच्या कपाळावर किस करत) Love you too….

 

Good night ?

(असा संवाद दररोज घडावा म्हणजे दिवसभराचा थकवा दूर निघून जातो आणि आजचा रुसवा ईथेच संपतो,  दुसरा दिवस परत नव्याने सुरू होतो)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत