खरंच तू कमावतेस?.. ??विचारा स्वतःला..

Written by

खरंच तू कमावतेस…? विचारा स्वतःला
        ?✒️जयश्री कन्हेरे -सातपुते

मनिषा ती जिची ही कहाणी… घरची परिस्थिती बेताचीच होती. दोन बहीणी व आई बाबा अस छान चौकोनी कुटुंब. तशी फार सुंदर नाही पण हुशार खूप होती… त्याच हुशारीने पुढे छान सरकारी नोकरी मीळवली तीने. त्याच नोकरीच्या भरवशावर घरची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली. मोठ्या बहिणीचे लग्न झाले, छान सुखी घरी पडली ती. मग वेध लागले मनीषाच्या लग्नाचे, सरकारी नोकरीवर मुलगी म्हंटल तर लाईन लागली चांगल्या स्थळाची.

त्यापैकीच एक म्हणजे राजीव च श्रीमंत स्थळ. कांदेपोहे टाईप बघण्याचा कार्यक्रम आटोपला. इतकं श्रीमंत स्थळ व राजीव दिसायला खुप हँडसम होता, मनीषा पेक्षा ही दिसायला भारी. त्यामुळे नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. हे स्थळ सगळ्यांना खुप पसंत पडलं. मग काय लागले सगळे लग्नाच्या तयारी. बघता बघता लग्नाचा दिवस आला आणि थाटामाटाने लग्न पार पडले.

तीला खुपच आनंद झाला जी श्रीमंती स्वप्नवत होती त्याची ती मालकीण झाली होती.सासरी पाय ठेवला तर तेथील श्रीमंती बघून मनीषाला अस वाटलं जाणू ती स्वप्नच बघतेयं कि काय. काय ते घर.. प्रत्येक सामानाची खरेदी पारखी नजरेने केलेली. तीन रूमच्या घरात राहणारी मनीषा आज इतक्या मोठ्या घरात येउन खूपच खुश होती. प्रत्येकाला वेगळी रूम, घरासमोर छान छोटस गार्डन, घरी कामाला गडी, स्वयंपाकाला पण बाई हे बघून तर मनीषाला राजाची राणी झाल्यासारखं वाटलं.. तीच मन गाणं म्हणतं होत

आज मै उपर, आसामा नीचे,आज मै आगे जमाना है पीछे”????

लग्नानंतरचे सर्व सोपस्कार पार पडले. राजीव नी तिला हनिमून सरप्राईज दिल कुल्लू मनाली च..??छान चाललं होत सगळं. सुट्ट्या संपल्या व मनीषाच रुटीन सुरु झालं. नोकरी, घर..अप डाउन करून जाम थकायची मनीषा. तस घरी कामच टेन्शन नव्हतंच.

महिण्याचा पगार झाला, ही आधीच अप डाउन मुले थकायची व पैशाची घरी काही गरज नाही म्हणून पगार काढायची नाही..

थोडे दिवस राजीवने वाटत बघितली मग म्हणाला “अग तुझ बँकेत जाण होत नाही. खूप वेळ उभ राहावं लागत लाईन मधे आपण तुझ अकाउंट जॉईन अकाउंट मधे ट्रान्सफर करून घेऊ.”

     मनीषाला वाटलं बरोबरच तर बोलतोय तसही माझा वेळ जाण्यायेण्यातच जातो, राजीवच ऐकून एक दिवस वेळ काढून तिने जॉईन अकाउंट काढून घेतलं. राजीवने ATM पण काढलं व मनीषाला त्रास नको म्हणून स्वतःकडेच ठेवलं. सर्व व्यवहार राजीवच करायचा.आता कुठेही बाहेर गेलं कि सर्व बिल राजीवच द्यायचा. आधी ती आईला जर मदत लागली तर करायची. कारण बाबा शेतीच करायचे व मुलगा नव्हता त्यामुळे आपल कर्तव्य ती पार पडायची,पण जेव्हापासून जॉईन अकाउंट झालं व ATM सुद्धा राजीव कडे आलं तेंव्हापासून आई बाबांला मदत करायला ती कचरत होती. “कस म्हणू राजीवला बाबांना पैशाची गरज आहे ” असा विचार करून ती आईला टाळू लागली.

असं सगळं चालू असताना गोड बातमी आली. या गोड बातमीच्या नादात ती सगळं विसरली व मातृत्वाचा क्षण नी क्षण अनुभवू लागली. आता जास्त काळजी घेत होते तिची सासरचे..काही काही कमी पडू देत नव्हते. फक्त नोकरी तेव्हडी बघ बाकीचे सर्व व्यवहार राजीवच बघत होता. डिलिव्हरी सासरीच केली श्रीमंत लोकं, शहरात राहणारे, खेड्यात कस काय जाउ देतील सुनेला.

प्रतीक्षा संपली व मनिषाने गोंडस मुलाला जन्म दिला सगळे म्हणाले “हिला भाऊ नाही न म्हणून देवाने हिला पहिला मुलगाच दिला.” सगळे खुश होते, तिचे आई-बाबा त्यांच्या परीने जे जमेल ते बाळंतविडा घेऊन आले. त्यावेळी पहिल्यांदा तिच्या आई-बाबाचा अपमान तिच्या सासूने केला. 

हेच कशाला आणलं, आमच्याकडे काही कमी आहे का? कशाला त्रास केला. माहित होत आम्हाला म्हणूनच डिलिव्हरी साठी माहेरी नाही पाठवलं” मनीषाची सासू म्हणाली.

सासूच्या या बोलण्याचं मायलेकीला दोघींना पण खूप वाईट वाटलं.??? मनीषाला वाटलं नव्हतं तिच्या घरात तिच्या आई -बाबाचा अपमान होईल. पण जाउ दे म्हणून ती गप्प राहिली. बारस झालं तिथेही तेच घडलं… आईचा अपमान.. इथून पुढे पदोपदी तिच्या आईला ते गरीब आहेत हे दाखवण्याचा एकही चान्स सोडायची नाही मनीषाची सासू.

बस झालं आता म्हणून मनिषाने सासूला समजवण्याचा प्रयत्न केला..पण कडक स्वभावाच्या सासूने तिलाच गप्प केले?. थोडे थोडे खटके उडू लागले होते.

राजीवला सांगितले तरी तो आईच्याच बाजूचा होता त्यामुळे त्याची आई कशी योग्य आहे हेच तो मनिषाला पटवून द्यायचा. ही हिच्या आईची बाजू घ्यायची व तो त्याच्या आईची.यामुळे दोघात वाद होऊ लागले.??

?रागाच्या भरात मनिषाने ATM मागितल… झालं राजीवला संतापाला कारण मिळालं…? “का पाहिजे तुला ATM? सगळं करतोय न मी. तुला काही कळत का त्यातलं? तू तुझी नोकरी बघ, पैशाचे व्यवहार माझे मी बघून घेईल. तुला लागलेले पैसे देतोय मी.. आता काय आई -बाबाला द्यायचे का पैसे तुला? लग्नानंतर मुलीकडलं पाणी नाही पीत काही आईवडील आणि तुझ्या वडिलांना पैसे पाहिजे का तुझे? “ असं नको ते बोलला राजीव.

“माझ्या आई बाबांना पैसे पाहिजे म्हणून नाही …. तरीही असो माझ्या कडे मला काही लागलं तर “? मनीषा म्हणाली.

“तू फक्त तुझी नोकरीं बघ, व पैसे लागले तर माग मला. बस आता विषय संपव इथे. मला वाद नको” राजीव म्हणाला.?

चार दिवसाची नवलाई संपली.. व सासरच्यांची श्रीमंती दिसली मनीषाला…हे इतके श्रीमंत आहेत तर यांना माझ्या पगाराची काय गरज या विचारतच तिची रात्र गेली. आकाशातून थेट जमिनीवर आदळली मनीषा..

“हे सगळं काय होतय, मला आई बाबांनी शिकवलं, नोकरीं करण्या इतपत लायक बनवलं.आणि आज मी माझेच कमावलेले पैसे खर्च नाही करू शकत मनासारखे, का? मला माझ्याच खर्चासाठी लागणारे पैसे नवऱ्याकडून घ्यावे लागतात, का? आधी किती छान म्हणाला राजीव “तुला बँकेचा, व्यवहाराचा त्रास नको” म्हणून सगळं कस हसत खेळत माझ्याकडून काढून घेतलं व मी पण डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं सगळं खुशीने दिल. आज जेंव्हा मी माझंच परत मागतेय तर हा नको म्हणतोय, का? खरच याला माझ्या त्रासाची काळजी होती कि फक्त माझा पैसा हवा होता? स्त्री ही फक्त पैसे कमाऊ शकते…  ते खर्च नाही करू शकत, का? ” ?

आज मनीषाला खरच वाटलं आपण मनाने खूप दुर्बल आहोत. ?आणखी किती दिवस असच राहायचं. “नवरा म्हणाला तुला त्रास कशाला म्हणून जॉईन अकाउंट करून घेतल.. मग ATM काढल ते पण  त्याच्याच ताब्यात कारण त्रास नको… हळूहळू कळल तीला आपन कमावत असुनही आधिन आहोत…आपला पैसा खर्च करायला आपल्याला नवऱ्याला मागावा लागतो.. खरच मी कमावते? मी नोकरी करते?हा पैसा माझ्या मालकीचा कि नवऱ्याच्या?  “?हा विचार सुरू असतांना मोबाईलची रिंग वाजली.. व ती पण  जागी झाली…

बस आता खूप झालं,आता त्रास झाला तरी चालेल पण  पैशाचा व्यवहार आपनच करायचा..हे तिने ठरवलं. ???

ही सत्य कथा आहे.नाव काल्पनिक आहे.आणि मला वाटत बऱ्याचशा नोकरीवाल्यांची हिच कहाणी असेल. बऱ्याच स्त्रिया फक्त नोकरीं करतात व वर्षाअखेर इन्कमटॅक्स च्या फॉर्म वर सही करतात. तेंव्हा कळतो त्यांना त्यांचा पगार किती आहे ते… आर्थिक व्यव्हारात स्त्रीया बऱ्याचदा लक्ष देत नाही. दुकानात गेल्या तरी नवरा बिल देणार, हॉटेलात गेल्या तरी नवराच बिलं देणार, कुणासाठी काही घ्यायचं,द्यायचं ते पण नवराच आणणार सोबत असतात या पण नॉमिनल पसंती साठी. कारण बायकोला त्रास नको…

खरच वाटत तुम्हाला हे सगळं त्रास नको म्हणून करतात?. काही नवरे नसतीलही असे…किंवा काही स्त्रिया पती परमेश्वर म्हणून स्वतः हे खुशीने करत असेल. माझ्या परिचयातील बऱ्याच नोकरीवाल्या स्त्रियांची ही परिस्थिती आहे.

मग सांगा आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त पैसे कमवणारी मशीन इतकाच आहे का? भाऊ नसलेल्या मुलीने आई -बाबांना पैश्याची मदत केली तर कुठे बिघडल? श्रीमंत घरी पैशाचा किती लोभ असते ते पण दिसलं.या सर्व गोष्टी वरून एकच वाटत मला ?

स्त्री कीतीही शिकली,
प्रगत झाली तरीही ती गुलामीच्या जोखंडाखालीच आहे..

करु दे कितीही काम पुरुषाच्या बरोबरीने
तरीही ती,शरीराने नाजूकच आहे…

कमावू दे कीतीही जास्त पुरुषापेक्षा
तरीही ती मनाने अबलाच आहे…

घर, मुल व नोकरी सांभाळतांना होते तारेवरची कसरत तीची,
तरीही ती बांधील आहे…..

सर्व च क्षेत्रात मारली आहे मजल तीने
तरीही ती गुलामच आहे…

कष्टाचेच तर असतात पैसे(पगार)तीचेही,
तरी ही ती नवर्‍याच्या आधिन आहे….

तोड हे बंधपाश, सोड ही गुलामी, आपल अस्तित्व निर्माण कर कारण तु एक सक्षम स्त्री आहे….?जयश्री कन्हेरे -सातपुते

 ..,.खरंच गरज आहे, आज आपल्याला बदलायची.जाग होण्याची,एका मर्यादेपर्यंत ठीक आहे पण आपल्या नोकरीचा फायदा हा ज्यांनी आपल्याला त्या लायक बनवलं त्यांना पण झाला पाहिजे.

आई -बाबा नाहीच घेत मुली कडले पैसे पण ज्यांना मुली आहे त्यांच्या मुलीच मुलगा नाही बनू शकत का? काय वाटत तुम्हाला ते नक्की सांगा.

बदल आपल्या पासून घडवून आणा. कुणीतरी बदल घडवेल याची वाट नाही बघायची. महिलेला लग्नानंतर ही सर्व प्रकारचे स्वातंत्र मिळेल,तेंव्हा ती स्वावलंबी होईल..तेंव्हा करा सुरुवात आपल्या पासूनच. व्हा मग जाग्या आणि बना एक सर्वपरीने सक्षम स्त्री. ??

माझा लेख, माझे नवीन विचार कसे वाटले ते नक्की सांगा,आवडल्यास like करायला विसरू नका व जास्तच आवडल्यास शेअर करा पण माझ्या नावासकट. ?जयश्री कन्हेरे -सातपुते ?लेखनाचे सर्व अधिकार राखून आहेत.. त्यामुळे कायदेशीर कार्यवाही होऊ शकते..

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा