खरंच मुलगा हवा का….????

Written by

खरंच मुलगा हवाच का..?
✒️?  ©जयश्री कन्हेरे -सातपुते

विनय घरातील मोठा मुलगा.. त्याच्या पाठी.. तीन मुली झाल्या गीता काकूंना.. हो तेच काकूंच्या सासूला वाटायचं.. एका मुलाला दुसऱ्या भावाचा आधार.. म्हणून…मुलाच्या प्रतीक्षेत तीन मुली झाल्या…
तरीही काका काकूंनी… मुलीच झाल्या.. असा तिरस्कार केला नाही…विनयच्या चार आत्या व दोन काका.. लहान पणी वारले.विनयचे बाबा एकटेच होते.. त्यामुळे एकट असण्याचं दुःख त्यांना माहित होत… म्हणूनच बाकीचे जरी तीन -तीन मुली आहे असा म्हणाले तरी काका मात्र मुलगा व मुलगी यांच्यावर सारखच प्रेम करायचे, (1980ची गोष्ट आहे ही..) मी तर अस म्हणेल कि विनयच्या बाबांनी विनय पेक्षाही जास्त लाड मुलींचा केला… तसही म्हणतात न.. “बाबाना मुली  जास्त आवडतात” अगदी तसंच.. 
विनय काही फार हुशार नव्हता अभ्यासात.. कसाबसा पदवी प्रयत्न शिकला.. याच भविष्य सरकारी नोकरीत नाही हे काका ओळखुन होते म्हणून त्याला… बिझनेस सुरु करून दिला… विनयने पण बिझनेस ची धुरा छान सांभाळली…मुली नेहमी सारख्याच हुशार.. मोठी अरुणा पदवीच शिक्षण घेऊन कपडे शिवण्या कडे वळली.. ति लहानपानापासूनच बाहुलीचे कपडे शिवायची तेंव्हाच काका -काकूच्या लक्षात आलं ही लेडीज टेलर होणार..  ??. दुसरी सुमती अभ्यासात भारीच हुशार सगळ्यांमध्ये .. काकांना पण तिचा इतरांपेक्षा जरा जास्त अभिमान होता..सुमतीने पण बाबांचा विश्वास कायम ठेवत.. बाबा असलेल्या डिपार्टमेंट मधे म्हणजे ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट मधे जॉब मिळवला, कृषी सहाय्यक म्हणून.. आता सगळ्यात लहान म्हणजे जान्हवी… ती काय करेल याची कुणालाच कल्पना नव्हती… पण तिची बोलण्याची पद्धत बघून असा वाटायचं ही वकीलच झाली पाहिजे…काही कारणास्तव ती वकील न होता शिक्षिका झाली..
सर्वांचे लग्न झाले… मुली छान घरी दिल्या… जावई हे मुलासारखे मिळाले… त्यामुळे काकांना तर अस वाटायचं कि “मी चार धाम यात्रेचं पुण्य घरीच कमावलं...” नातू -नातीन यांच्या गराड्यात काका काकु खूप खुश होते… सर्व सुरळीत चालू होत..
आणि
अचानक एक दिवस गीता काकूंना छातीत दुखायला लागल… काकूंची अशी परिस्थिती बघून काकांचा पण ब्लड प्रेशर वाढल… घरी विनयच होता… बाबांना बघायची कि आईला… अशा वेळी भाऊ हवा होता असा प्रत्येकाला वाटत.. विनयने आई बाबाला दवाखान्यात नेले.. बाबाच BP नॉर्मल झालं. आईवर प्राथमिक उपचार करून डॉक्टर बोलले यांना नागपूरला न्या… मित्रांची मदत होतीच विनयला.. तो सगळं करायला समर्थ होता.. तरीदेखील  भावनिक आधार हा फक्त बहिणीचं देऊ शकत होत्या..
त्याने सरळ बहिणींना फोन लावून बोलावून घेतले.. अरुणा जवळ राहायची लगेच पोहचली गावाला… सुमती नागपूरलाच होती तिने सुट्ट्यांचा अर्ज टाकला.. भावाला सांगितलं काळजी करू नको लगेच आईला घेऊन ये. तुम्ही यायच्या आत मी दवाखान्यात असेल..  जान्हवी जरा लांब राहायची म्हणजे 400km तिने व तिच्या पतीने पण सुट्ट्यांची तडजोड केली… मिळेल त्या बसने नागपूर गाठले…. या सर्वात त्या तिघींच्याही नवऱ्यांचा पूर्ण सपोर्ट होता…
बाबांना बर नव्हतं व या दोघींची मुलं सोबत ठेवणं शक्य नव्हतं म्हणून अरुणा गावाला घरी बाबा व यांची मुल सांभाळत होती.. काकुवर उपचार सुरु झाले होते.. बायपास कराव लागेल अस संगीतल डॉक्टरनी..
विनय तर काय कराव याच विचारात होता.. पण सुमतीने त्याला धीर देत ऑपरेशन करायचे सर्व documents बघितले व सही पण स्वतः केली.. जानव्ही होतीच सोबतीला.. सर्व व्यवस्थित पार पडलं… जो पर्यंत काकूंना डिस्चार्ज मिळत नाही तो पर्यंत त्यांच्या दोन्ही मुली सुट्ट्या टाकून दवाखान्यातच होत्या भावाच्या बरोबरीने त्याला साथ द्यायला… औषधं आणण्यापासून ते डॉक्टरशी बोलण्या प्रयत्न सगळं काही..भावाच्या सोबत सुमती व जान्हवीने केल. घरी बाबा आणि या दोघींची मुलं अरुणाने सांभाळली.. इतकंच नाही तर पैशाची सर्व अरेंजमेंट (बँक गावात होती ) बाबांसोबत जाऊन अरूणानेचं केली…  गीता काकू पूर्ण बऱ्या होऊन घरी परतल्या..सगळ्यांना हायस वाटलं…
घरी परतल्यावर काका काकूला म्हणाले.. अपल्याला विनयला मदतीला भाऊ म्हणून मुलगा पाहिजे होता न… मला तर आधी पासूनच माझ्या मुलींवर विश्वास होता… व आता तुझ्या या ऑपरेशनच्या वेळी आपल्या या तिन्ही मुलींनी विनयला तितकीच साथ दिली जितकी एक भाऊ देऊ शकला असता...
मला अभिमान आहे कि मी मुलींचा बाप आहे. लग्नानंतर ही मुली आपल्या आई बाबांसाठी सगळंच करू शकतात…. आपले जावई पण खूप  समजदार आहेत.. प्रत्येक आईबाबाला असे समजदार जावई व मुलीला समजदार सासर मिळो…
या नंतर गीता काकू व काका .. हवापालट म्हणून तिन्ही मुलींकडे एक -एक महिना मस्त राहून आले…
समाप्त… ©जयश्री कन्हेरे -सातपुते
ही कथा नाही… खरी घटना आहे फक्त नाव बदललेली आहेत… या घटनेला आता 5वर्ष होत आलीत… काकू व काका छान आहेत.. मी हे सांगू इच्छिते  कि सर्व मुलींना सासरची मंडळी होती… व स्वतःच्या नोकरी पण… त्यांनी सासरच्यांना कस सांभाळल हे त्याचं त्यांना माहित.. हे मात्र खरं कि काकूच ऑपरेशन व सुट्टी मिळेल पर्यंत त्या आईसोबत दवाखान्यातचं होत्या…
आई बाबा आपली काळजी घेतात.. मग लग्न झालं म्हणून आपण अपल्या आईबाबांच्या मदतीला जाउ नये? का? तर… सासरचे नको म्हणतात. जर तुम्ही सक्षम आहात तर काही नियम व परंपरा बदलविण्याची सुरुवात स्वतःपासून करा. “कुणीतरी कि प्रथा बंद केली असती तर बर झालं असत…” अस म्हंटल्या पेक्षा “ती मीच”अस समजून, जे नाही पटत मनाला ते बंद करा..मग त्यासाठी घरच्यांचा किंवा समाजाचा विरोध पत्करावा लागला तरी चालेल.
आजकाल एक किंवा दोन मुली असणारे भरपूर आहेत. मग त्यांना जर गीता काकूसारखं झालं तर…?
मग त्यांनी कुढत बसायचं का आम्हाला मुलगा हवा होता?
आज प्रत्येक गोष्टीत मुलीला समोर नेत आहोत आपण पालक..  मग लग्न झाल्यावर तीच कर्तव्य संपल अस कस म्हणून शकतो आपण.. मुलगा असो वा मुलगी त्यांना जन्म द्यायला तितकाच त्रास होतो आईला… त्यांना मोठं करायला, शिकवायला, नोकरीवर लावायला, तितकाच प्रयत्न करतात बाबा, दोघांनाही लागलं तर दुःख सारखंच होत माय बापाला… मुलं सुद्धा नोकरीं निमित्त बाहेर असतात… काही तर परदेशात असतात.. काहींना आई -वडील नको असतात.. काही जवळ असूनही आई बाबांन पासून विभक्त राहतात… (मी सगळेच म्हणतं नाही आहे.. ) मग अस असूनही… मुलगा असलाच पाहिजे किंवा एक मुलगा असल्यावरही दुसरा मुलगा पाहिजे.. हे विचार योग्य आहेत का?
विनयच्या बहिणींनी त्याला दिलेली साथ ही भावापेक्षा कमी होती का?
एकच करायचं मुलींना वाढवतांना तु लग्न करू दुसऱ्या घरी जाशील..अस सांगण्यापेक्षा “तु आमचं सर्व काही आहेस… व आमच्या म्हातारपणाचा आधार सुद्धा..तेंव्हा लग्न जरी झालं तरी आमचं हवं नको ते तुलाच बघावं लागेल.. त्यासाठी तु तुझ्या सासरच्यांना कस तयार करायचं ते तुझ तु बघ ” अस जर मुलींना शिकवलं तर “मुलगा हवाच” ही गोष्ट लोकांच्या मनातून पुसल्या जाईल…. व मुली पण आई – बाबांना सांभाळू शकतात ही “प्रथा” चालू होईल..आणि त्यामुळे गर्भात मुली मारण्याच प्रमाण पण कामी होईल अस मला वाटते.
मी माझ्या मुलीला तेच शिकवतेय.. मी तरी माझ्या पासून ही “प्रथा” सुरु करतेय कि “मुली सुद्धा आई- बाबांना सांभाळू शकतात…” पण हो सासू -सासऱ्यांना विसरू नका… ते पण आपल्या नवऱ्याचे आईबाबाचं आहेत..
माझा लेख लिहिण्याचा उद्देश मुलं वाईट असा नाही.. पण “मुलगाच हवा” याला विरोध करणारा मात्र नक्की आहे..
काका -काकूंचे जावई पण कुणाचे तरी मुलचं आहेत.. त्यांनी समजून घेतलं, बायकोला, सासूबाई -सासऱ्यांना. मुलं पण छानच असतात. ज्यांना मुली आहेत त्यांना जे नेहमी वाटत आपल कस होणार?  त्यासाठी हा लेख खास..मुलींना पायावर उभे करण्यासोबतच मानसिक सक्षम बनवा..जे योग्य वेळ आल्यावर त्या मुलाची गरज भासू देणार नाही..आणि आपल्यावर ही वेळी येणार नाही.. ” मुलगा असता तर बर झालं असत” अस म्हणण्याची.
लेख वाचण्यासाठी धन्यवाद ? काय वाटत तुम्हाला..? मुलगा असलाच पाहिजे हे योग्य आहे? मी माझ मात मांडलं, तुम्हाला ते कस वाटलं हे नक्की सांगा.. चुका झाल्या असतील तर क्षमा असावी.. नवीन विचार रुजवण्याचा माझा प्रयत्न, नवबी प्रथा सुरु करण्याची माझी धडपड कशी वाटली..? तुमची यात मला साथ आहे का हे नक्की सांगा.
Like नाही केला तरी चालेल पण शेअर नक्की करा माझ्या नावासकट … हा लेख प्रत्येकाच्या वाचण्यात आलाच पाहिजे..मुलगा -मुलगी भेद मिटायलाच हवा..?©जयश्री कन्हेरे -सातपुते ?

Article Categories:
सामाजिक

Comments

 • सुंदर मनोविश्लेषण व अप्रतिम मांडणी.वास्तववादी सत्यान्वित जरी असली,तरी झणझणीत अंजन घालणारी,कर्तव्यनिष्ठकथा म्हणुया हवंतर.

  विनोदकुमार गजानन भोपटकर पुजारी. 19th जुलै 2019 4:21 pm उत्तर
  • खूप खूप आभार तुमचे.. या अप्रतिम प्रतिक्रियेसाठी ?

   Jayshree Kanhere 25th जुलै 2019 7:00 pm उत्तर
 • Nice thoughts I agree

  Sadhana jadhav 19th जुलै 2019 11:54 pm उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत