खरं प्रेम… न बोलता एकमेकांचा मनातले समजण्यातच…!

Written by

खरं प्रेम… न बोलता एकमेकांचा मनातले समजण्यातच…!

आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता…पण तो विसरला होता…पण तिच्याशी खूप बोलावसं वाटत होत आज त्याला… अगदी मनमोकळं ….तो तिला म्हणाला….चल दूर एकांतात कुठेतरी जाऊ या…आणि तो मग तिला समुद्रकिनारी घेऊन गेला….

दोघांचीही ती आवडती जागा… पोर्णिमेची रात्र असल्याने चांदण्यांचा गालिचा पांघरलेला…एकांतात वाहणारा तो शांत गार वारा….सळसळणार्‍या लाटा…आणि सोबत त्याच्या मिठीत सुखवलेली ती …!

तेव्हा…अचानक त्याला आठवण झाली…आज आपल्या लग्नाचा वाढदिवस…. आणि त्याने तिला काही भेटवास्तूच दिली नव्हती…पण ती मात्र काहीही झाले तरी छोटीशी भेट द्यायला कधीच विसरत नसे…. पण तो तिला काहीच देणार नाही ह्याची शंभर टक्के खात्री होती तिला….माहिती असून सुद्धा त्याला चिडवायचे म्हणून मग ती त्याच्या हातात लाल गुलाबाच फुल ठेवत रागच्या सुरताच बोलली त्याला…

“आज काय फक्त मिठीत घेऊनच भागवणार का माझं गिफ्ट…???”

तो हसतच म्हणाला….नाही ग…काय हवं तू सांग , तुला हवं ते आणून देतो…

ती क्षणचाही विचार न करता बोलली…”मला काही नको रे…फक्त तू नेहमी आनंदात राहात जा….हसत राहत जा..काहीही झाल तरी…मी तुझी साथ कधीच सोडणार नाही….

तो उदास नजरेने बोलला “का अस म्हणतेेस ग????”

ती म्हणाली …”कारण गेले कित्तेक दिवस झाले तू उदास आहेस…तुझ्या मनातलं ओळखून आहे रे मी….मला कळतंय तुझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, त्याला पूर्ण करण्यासाठी असणारी तुझी तडफड, आपल्याच लोकांनी समजून न घेतल्याने आलेलं दडपण, त्यात झालेली तुझी फरपट …सगळं कळतंय रे मला….म्हणून मला तुला नेहमी हसत पहायचा आहे…

तो जरा बावरलाच …तिच्या मांडीत डोकं ठेवत तो पण नंतर बोललाच…

“जबाबदाऱ्याचे ओझे पेलता पेलता तोल जातोय ग माझा…दुरावल्या सारखी होतात काही नाती….
कसं ग आनंदात राहू मी…तीळ तिळ तुटतो जीव माझा…?”

तिला बहुतेक समजल होत त्याचा मनातलं कोडं…पण स्वतःला सावरत डोळ्याटले अश्रू तिने तिथेच थांबवले..आणि मग हसतच म्हणाली…

“ठीक आहे…पण प्रत्येक वेळी तडजोड तूच करणे योग्य का…?आपलं वयक्तिक मत मांडणे कधीतरी गरजेचे असते….नाहीतर आपण taken for granted होऊन जातो…व्यक्त होण म्हणजे नाती दुखावणे मुळीच नाही…तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुझ्या बरोबरीनेच उभी राहिल… त्यात उदास होण्यासारखं काय…?”

तिने हळूच हातात हात घेत प्रेमळ हात त्याचा कपाळावर फिरविला आणि खळखळणाऱ्या त्या लाटांकडे नजरेने श्वास सोडला…

हे लग्नाचा वाढदिवासचे ते सुंदर गिफ्ट नसेलही… पण त्याच्यासोबतचे ते अनमोल क्षणच कोणत्या महागड्या वस्तूपेक्षा पुरेसे होते आयुष्य जगण्यासाठी…

नेहा खेडकर, अहमदाबाद❤✍

Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा