खरा बालदिन

Written by

#खरा_बालदिन

“एका हॉटेलवर जेवायला गेलो असताना सावळा, केस वाढलेले,मळकटलेले कपडे,डोळ्यात दिशाहीन स्वप्नं घेऊन चहा वाटत फिरणारा निरागस रुपेश नजरेस पडला आणि माझाच भूतकाळ समोर दिसला. मीही लहान वयात खांद्यावर झेपत नव्हती अशी ओझी उचलून ..मोठा संघर्ष करून शिकून स्वावलंबी झालो.

रुपेश सारख्या लहान मुलांना खेळण्या बागडण्याच्या वयात परिस्थितीपायी किंवा कोणाच्या स्वार्थी हेतूसाठी अशी कामं करताना पाहिलं की वाटतं ज्यादिवशी बालकामगार पूर्णतः दिसणे बंद होतील तोच खरा बालदिन.

त्या दिवसापासून आतापर्यंत रुपेश सारख्या अनेक बालकामगारांना त्यांचं बालपण परत मिळावं म्हणून मी या बालसदन मध्ये आणले,शिकवले…आज यांचा खऱ्या अर्थाने बालदिन साजरा होतोय.” तन्मय आवंढा गिळत भावनांना वाट मोकळी करत भाषणात बोलत होता.

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा