खरे लक्ष्मी पुजन

Written by

मस्त गुलाबी थंडी पडलेय……. सगळीकडे चैतन्य भरुन राहिलयं…….. हिरवागार निसर्ग मंद वाऱ्यावर डोलतोय…….. हिरव्यागार भाज्यांचे मळे शेतात फुललेत……… बाजारपेठा ही पानाफुलांनी, फळांनी गजबजलेल्या आहेत……. मार्गशिर्ष महिना सुरू आहे……. उपास, व्रतवैकल्य, पोथीवाचन अन लक्ष्मीपुजन ……… धुप, दीप, कापुराचा सुगंध सगळ्या घरभर पसरलाय …….. त्या सुगंधानं सगळ घर प्रसन्न झालयं……. टाळ घंटानादात आरती होतेय……..               घरोघरी देवीला खीर पुरीचा नैवेद्य, विविध भाज्यांचा नैवेद्य बनतोय …….. अन , सुग्रास भोजनावर कुटुंबियांसमवेत आनंदाने ताव मारत सगळेजण त्तृप्तीचा ढेकर देताहेत………. मार्गशिर्षातल्या गुरुवारी सगळ्यांच्या घरातलं हे द्रृष्य……

हिवाळी मोसमात मिळणाऱ्या छान हिरव्या तजेलदार भाज्या…….. मटार, पावटा, गाजर घालून केलेला भात, खीरपुरी, पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, आम्रखंड असा गोडाधोडाचा नैवेद्य……. असा या महिन्यातील प्रत्येक गुरूवार……..

आता शेवटचा गुरूवार उजाडतो……. घरातील स्रियांची लगबग सुरू होते…….. हा असतो उद्यापनाचा गुरुवार ……… देवीच्या नैवेद्यासाठी गोडधोड पदार्थांची रेलचेल……… सुवासिनींना हळदीकुंकू अन फळांचा प्रसाद……… देवीच्या रुपात जेवणाऱ्या कुमारीकांना जेवणाचं आमंत्रण……..

मुलीही खुष असतात……… अगदी हौसेने एकमेकींबरोबर जेवायला जातात…….. त्याच मुलींना दुसऱ्या घरात जेवणाचं आमंत्रण येत……… हसतच, आनंदाने मुली तेथेही जातात…….. आता अगोदर जेवल्यावर, त्या तिथे दुसऱ्या घरी किती जेवणार असतात बरे…….. पण मुलींना जेवु घातल्याचा आनंद मिळवण्यासाठी त्याच अगोदर जेवलेल्या मुलींनाच परत जेवु घालून हेतू साध्य होतो का?……. अशाने देवी त्यांच्या रुपात येऊन जेवेल?……… मुली थोडचं खातात, अन ताटात अन्न तसच राहाते ………


Pediasure 

आता सरीताच्या घरचे उद्यापन बघा. सकाळी तीन साग्रसंगीत पुजा मांडली, पोथी वाचली, धुपदीप आरती केली, फळांचा नैवेद्य दाखवला, अन कामाला लागली.

दुपारी लवकरच स्वयंपाकाला सुरवात केली. खीर, पुरी, भाजी, वरणभात, कुरड्या पापड तळून देवीला नैवेद्य बनवला. सायंकाळी सहा वाजता देवीला नैवेद्य दाखवला. एका मोठ्या डब्यात जेवण भरले अन मंदिरासमोर बसलेल्या वृध्द अनाथ लोकांना जेवण जेवु घातलं. सगळ्यांना ब्लँकेट दिल, अन तासाभरातच घरी परतली. सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवून फळांचा प्रसाद दिला.

सख्यानो, असे प्रसंग, घटना आपल्याला पहायला मिळतात. आपल्या संस्कृतीत पुजेला, अन्नदानाला महत्व आहे. परंपरेनुसार आपण ते करतो, पण काही विचार आता बदलायला हवेत नाही का?………. जेवलेल्यांनाच परत जेवायला घालण्यापेक्षा, भुकेल्या पोटांना अन्न दिल तर……….. लक्ष्मी प्रसन्न होणार नाही का?…….

तुम्हाला काय वाटतं?

आपली बहुमुल्य मत नोंदवा…
सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा