खात्या पित्या घरची दिसतेस.. माझ आरोग्य

Written by

     खात्या पित्या घरचे लक्षण… माझेआरोग्य

.. ©®जयश्री कन्हेरे -सातपुते #$$$#नवीन विचार माझे सामाजिकलेखमालिका #$$$#

       मी लग्नाच्या वेळेस अगदी सडपातळ होती चवळीची शेंग म्हणा न.. लगेचh good news आली. पहिल्यांदा (बाळाच्या वेळी ) चेकअपला गेले तेंव्हा वजन 40kg होत. सर्व रिपोर्ट नॉर्मल होते.त्यामुळे बाळ झालं ते ही छान व गुटगुटीत. डिलिव्हरी नंतर दोन वर्ष तशीच होती जशी लग्नाच्या वेळेस.. बारीक.. बाळांनी अंगावरच दूध पिन सोडल. थोडी मी पण मोकळी झाली.. जरा जास्तच बारीक होते आधी त्यामुळे थोडं “वजन वाढल” तर मी दुर्लक्ष केल. ” छानच आहे मी किती बारीक होते,आता मस्त दिसते मी” असा म्हणायचे. बाकीचे म्हणायचे मुलगी मोठी झाली तर  “छान अंगात भरलीस आता ” तरीही मी लक्ष द्यायचे नाही. दुसरी गोष्ट “केस गळणे ” तो तर सर्वच स्त्रियांचा प्रॉब्लेम आहे. त्याकडे पण लक्ष दिल नाही.. जे सुरु होत ते तसंच सुरु ठेवलं..माझा स्वभाव बदलला, जरा चिडचिडा झाला… थोड्या थोड्या गोष्टीचा खूप व लवकरच राग यायला लागला.. लहान मुली मुळे चिडचिड होते.. त्याकडेही दुर्लक्ष केल..  (तो प्रयत्न 3वर्ष होऊन गेली )मला गळ्यामधे अटकल्या सारखं वाटायचं.. तेंव्हापण या थायरॉइडची शंका नाही आली.फँमिली dr.कडे गेलो त्यांनी पण काही सांगितलं नाही. विचार केला एकदा कान, नाक, घसा तज्ञ dr.कडे चेकअप करावं…वरुड (अमरावती )Dr.मॅडम म्हणाल्या हायपर ऍसिडिटी आहे पण एकदा थायरॉईड चेक करून घ्या.आणि इथून पुढे सुरुवात झाली माझ्या थायरॉइडच्या प्रवासाला.

    चेकअप केला 10-11-2017 ला पहिल्यांदा चेकअप केला तेंव्हा TSH लेव्हल 11.58 होती व वजन 65kg.. मी ऍलोपॅथी औषधं सुरु केल .THYROX -12.5. रोज एक.MRP-137.86 तीन महिने चालतात. तीन महिन्यांनी TSH चेक करावं लागत. म्हणून नंतर जेंव्हा 10-4-2018 चेक केल तेंव्हा TSh लेव्हल (11.98)वर होती. ?एकाएकी कमी होतं नाही माहिती आहे मला पण कॅबेज,सोयाबीन तेल व सोया प्रॉडक्ट बंद, कोबी, बटाटे, पालक, स्पायसी, ऑईली पदार्थ टाळले.मॉर्निंग walk, प्राणायाम नियमित होता. तरीही TSH लेव्हल कमी झाली नाही.. ???विचारातच पडले.

      जिथे आम्ही चेकअप करतो ते, लॅब वाले म्हणाले “तुम्ही होमिओपॅथी औषधं घेऊन बघा जरा महाग आहे पण थायरॉईड पूर्ण बरा होतो.. मी स्वतः अशे पेशंट बघितले आहे. ज्यांना मूल नाही होतं थायरॉइडमुळे त्यांना मूल पण झालीत व तेही नॉर्मल.. “(सहसा काही केस मधे मूल ऍबनॉर्मल होतात थायरॉईड असल की )

  बराच विचार केला ??? व एप्रिल 2018 ला आम्ही होमिओपॅथी Dr.कडे गेलो.. त्यांनी रिपोर्ट न बघता इतकंच सांगितलं.. “तुमचा विश्वास असेल व औषधं नियमित मी सांगेन तितके दिवस घ्याल तरच मी औषधं देतो..  6महिन्यांनी तुम्ही चेक करून मग मला रिपोर्ट दाखवाल. 2.5 वर्ष औषधं घ्यावी लागेल तेंव्हा थायरॉईड पूर्ण बरा होईल. ” इतकी ग्यारेंटि घेत आहे तर औषधं घ्यावी म्हणून मी होमियोपॅथी सुरु केली.

त्या नंतर मी आज पर्यंत होमिओपॅथी च औषधं घेत आहे. आता जेंव्हा TSh लेव्हल बघितली तर नॉर्मल आली फक्त 10 महिन्यात 1-3-2019 (4.45).वजन आटोक्यात आलं. केस गळती सुरु आहे पण तीही होईल बंद. मी औषधं सुरूच ठेवलं आहे. त्यांनी सांगितल्या नुसार अडीच वर्ष पूर्ण करणार आहे.
खुप महिला थायरॉईडग्रस्त आहे… वजन तर विचारूच नका… इतक्या झपाट्याने वाढत आहे…  तेंव्हा ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी घाबरून न जाता..योग्य आहार.. प्राणायाम…1तास फिरणे… व जी औषधं (ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक )घेत आहात त्यावर पूर्ण विश्वास असला तर तुमचं थायरॉईड पूर्ण बरं होऊ शकते . आज माझं वजण वाढणं बंद झालं… मी माझा स्वतःचा अनुभव शेअर करतेय. कोणत्याही पॅथी विषयी गैरसमज निर्माण करायचा नाही.. आपण जी औषधं घेतो ती विश्वासाने घ्या.. व ट्रीटमेंट ला योग्य प्रतिसाद द्या.. फक्त औषधं घेऊन कोणताच आजार बरा होत नाही त्याला व्यायाम व योग्य आहार ही खूप गरजेचं आहे. थायरॉइड मधे खाण्यावर खूप कंट्रोल करावं लागतो. ब्रेड, बिस्कीट, टोस्ट, फास्टफूड बंदच केले मी.. आणि हो वजन एकाएकी कमी होतं नाही जे वाढायला इतके वर्ष लागले.. ते कमी कस काही दिवसात होईल…नाही का

    आपल वजन जर झपाट्याने वाढत असेल तर प्लीज स्वतःचा थायरॉईड चेकअप करावा… आणि स्त्रिया स्वतः कडे दुर्लक्ष करतात त्यामुळे अनेक व्याधी जडतात. तेंव्हा स्वतःकडे लक्ष द्या.. तुम्ही जाडे होतं आहात हे हेल्दी पना आहे की थायरॉईड ची सुरुवात..?  याचा विचार करा… ???.. ©®जयश्री कन्हेरे -सातपुते #$$$#नवीन विचार माझे सामाजिकलेखमालिका #$$$#

मला वाटलं तुमच्याशी शेअर कराव म्हणून करत आहे. मी कुणालाच कोणत्याच प्रकारचा सल्ला मागितला नाही कारण त्या सल्ल्यामुळे आपल मन वीचलित होत.. व कोणाचं ऐकायचं याच टेन्शन येत. कदाचित या माहिती मुळे बऱ्याच जणी ज्यांना थायरॉईड आहे त्यांची भीती कमी होईल. उपचाराला योग्य प्रतिसाद दिला तर थायरॉईड पूर्ण बरा होऊ शकतो.. मी माझ्या स्वानुभवावरून सांगते आहे.. दुसऱ्यांच्या अनुभवावरुन नाही..यातील सर्व माहिती ही खरी आहे.. कुणाकडून ऐकली किंवा फक्त लिहायची म्हणून नाही लिहिली,माझा अनुभव व इतर ज्यांना थायरॉईड आहे त्यांना योग्य ती माहिती द्यावी इतकाच हेतू..

   Like करा असा आग्रह नाही पण नक्की वाचा .. काही शंका असेल तर कमेंट करा… व जास्त शेअर करा… कारण योग्य माहिती सर्वांपर्यंत पोहचावी..धन्यवाद ??जयश्री कन्हेरे -सातपुते

प्रतिक्रिया व्यक्त करा