खेळ कुणाला दैवाचा कळला ( भाग 7)

Written by

जय : वृंदा तूला माहीत आहे का?मी तूला प्रपोज कुणामुळे करू शकलो??

वृंदा : कुणामुळे??

जय : अनिकेत मूळे

वृंदा :काय?? बदमाश अनिकेत

जय :अगं त्याच्यामुळे मी आज हिम्मत केली… नाहीतर कधी केलं असतं काय माहित??

मग दोघेही विचार करत जेऊ लागले

जेवण झाल्यावर दोघेही नेहमीच्या ठिकाणी आले…. येता येता जयने वृंदा ला विनंती केली….

जय :वृंदा आपण उद्या पून्हा बाजारात येऊयात का? मला पण माझ्या घरच्या लोकांसाठी देखील काही खरेदी करायची आहे….

वृंदाने स्मितहास्य करून होकार दिला…. तिला लक्षात आले की जयला तिच्यासोबत अजून वेळ घालवायचा आहे…. तसं तिचं मन देखील भिरभिरत होतं… तिला मनापासून खूप आनंद झालेला होता…

दुसऱ्या दिवशी वोर्कशॉप झाल्यावर दोघेही बाजारात आले होते. दोघांनीही भरपूर आणि मनसोक्त खरेदी केली…. दोघेही मनापासून आनंदी असल्याने दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली होती…..
आता रोज वोर्कशॉप संपले की काहीतरी कारण काढून जय वृंदाला बोलवत असे…. आणि वृंदा आनंदाने त्याच्यासोबत बाहेर जात असे…

भराभर दहा दिवस संपले…. दोघांचीही पाऊले थोडीशी जड झाली होती…. पण सोबतच आपापल्या घराची अनामिक ओढही होती….

जयवर तर आता जबाबदारी होती…. त्याच्या घरच्यांकडून वृंदासाठी होकार मिळवण्याची….

दोघेही आपल्या गावी आले…. पहिले वृंदाला घरी सोडले…. आणि मग जय आपल्या घरी गेला….

घरी गेल्या गेल्या वृंदाने तिच्या आईला घट्ट मिठी मारली…

वृंदा : आई कशी आहेस…. माझी आठवण आली नाही का?

आई : अगं आठवण तर तूझी रोज येत होती… पण जय सर सोबत होते म्हणून आम्ही बिनधास्त होतो….

वृंदा : छोटया तूझी नीटची परीक्षा होती ना?? कशी गेली

वैभव : ताई, चांगलं वैभव नाव आहे माझं…. मी आता नीट ची परीक्षा दिली… .. छोटया म्हणणं शोभतं का तूला??
By the way, परीक्षा छान गेली… मेडिकलला लागेल नंबर… नक्कीच

वृंदा :अरे वा, चलो इसी बात पे हो जाये…. असं म्हणत वृंदाने दोघांनाही आणलेले गिफ्ट आणले… आणि दिले….

इकडे जय घरी आला… घरी आल्यावर अगदी मिष्टान्न भोजनाने त्याचं स्वागत झालं… मग जय ने आपआपल्या घरच्यांना घेतलेले gift दिले….

जयची आई : बापरे जय तू आणि आमच्यासाठी gifts??
कधीपासून?? म्हणजे तू इतक्यांदा बाहेर जायचास पण गिफ्ट्स पहिल्यांदाच आणलेस….

जय :काय गं आई किती प्रेमाने आणलेत मी तुझ्यासाठी आणि तू?? जय लडिवाळ पणे म्हणाला….

जयची आई : पण जय खरं सांग ही gift चॉईस पण तूझी वाटत नाहीये….तूझे आवडतीचे रंग माहिती आहेत मला…. ही साडी म्हणजे कुठल्या स्त्री ने सिलेक्ट केल्यासारखी वाटते आहे….. if i am not wrong??

जय : हो आई… पण तू कसं ओळखलस??

जयची आई : अरे इतकी परफेक्ट रंगसंगती,साडीचा कपडा… तीला वापरलेली जरी… आणि तीचा पदर इतकं सगळं व्यवस्थित आहे म्हणून लक्षात आलं.

जय : आई, त्याच बाबतीत मला तूला बोलायचं आहे…

जयची आई : let me guess, तूला कुणीतरी मुलगी आवडली आहे…. ओह आता link लागली…. तूला त्या मुलीने सुचवले gifts बद्दल… बरोबर ना?

जय: आई कसं काय गं मला इतकं तू ओळखतेस??

जयची आई : कोण आहे ती?? कुठल्या कंपनीची मालकीण?? कुठली व्यावसायिक??

जय : अगं आई दुसऱ्या कुठल्या कंपनीत नाही… माझ्याच कंपनीत एम्प्लॉयी आहे ती…ती फक्त एक एम्प्लॉयी असली तरी आपली कंपनी स्वतःची समजून काम करते… सध्या ती सेक्रेटरी म्हणून काम पाहते आहे….

हे ऐकताच जयच्या आईचा चेहरा पडला…. पण आपल्या चेहऱ्यावरचे भाव दिसू दिले नाही…

जयची आई : तिचं नाव काय आहे?
जय : वृंदा… आई तूला आवडेल ना गं ती सून म्हणून??

जयची आई : अ.. हो, का नाही तिला घरी घेऊन ये कधी….

जय : काय?? एकदम आनंदाने i love you आई…. मी खूप नशीबवाण आहे की तू माझी आई आहेस…..

जय ने लागलीच वृंदाला फोन लावला…. आणि त्याच्या आईचा होकार सांगितला….. जयच्या वडिलांचा तर कश्यालाही विरोध नव्हताच….

इकडे वृंदाने देखील आईला एकांतात जय बद्दल सांगितले….

वृंदाची आई : हे बघ बेटा तू खूष राहावं हेच माझं स्वप्न आहे पण या मोठया लोकांपासून जरा सावध रहा…

वृंदा :अगं आई जय सर तसे नाहीत, हवं तर तू अनिकेतला विचार…

वृंदाची आई : बरं बाई राह्यलं…. मला काही प्रॉब्लेम नाही तू खूष तर मी खूष…..

आता दोघांच्याही घरून मिळालेल्या होकारामुळे दोघेही खूप खूष होते…. आता त्यांना कुठल्याच बंधनांची भीती वाटत नव्हती…. तासनतास फोनवर गप्पा होत होत्या, एकमेकांना चिडवणं, हसणं, खिदळण, प्रेमाच्या गप्पा असा दिनक्रम झाला होता…..

वृंदा एकदा जाऊन जयच्या आईला भेटली देखील होती…. पण वृंदाला जयची आई तितकी खूष वाटली नव्हती…..तीने जयला देखील ही गोष्ट सांगितली…. तेव्हा जय म्हणाला अगं आज जरा आईची तब्येत ठीक नव्हती म्हणून तूला असे वाटले असेल….

काही दिवस असेच गेले, आता जय आणि वृंदाच्या लग्नाचा विचार सुरु झाला….

एक दिवस अचानक जयच्या आईचा वृंदाला फोन आला….

जयची आई : वृंदा लवकरात लवकर आपल्या गावाच्या वेशीजवळ ये…. खूप महत्वाचे बोलायचं आहे…. प्लीज जयला हे सांगू नकोस आणि तू एकटीच ये….

वृंदाने पटकन आपली स्कूटी काढली आणि फास्ट स्पीड ने जयच्या आईने जिथे बोलावलं तिथे गेली…..

  • क्रमश :
    ©® डॉ सुजाता कुटे
Article Categories:
प्रेम

Comments are closed.