गरोदरपण…. आणि काळजी

Written by

 गरोदरपणाचा एकूण कालावधी 40 आठवडे आहे.म्हणजेच  नऊ महीने 7 दिवस असा आहे.

त्याला तीन भागांमध्ये विभागले आहे

First trimester :शेवटच्या पाळीचा पहिला दिवस ते 12 आठवडे असा आहे

Second trimester :13 ते 28आठवडे असा आहे

Third trimester: 28 ते 40 आठवडे असा आहे

10 (दहा )चा नियम

1)पूर्ण नऊ महिन्यामध्ये डॉक्टर कडे दहा वेळेस डॉक्टरांकडे visit असायला हवी  visit ची विभागणी खाली दिली आहे
.

पहिल्या तीन महिन्यात एक

नंतर दर महिन्याला एक या प्रमाणे सात महीने पूर्ण होई पर्यंत

आठव्या महिन्यात दर 15 दिवसाला आणि नवव्या महिन्यात दर आठवड्याला…. डिलेव्हरी होई पर्यंत

2) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण 10 gm% असणे आवश्यक असते

3) पूर्ण गरोदरपणात कमीत कमी 10kg. आईचे वजन वाढलेच पाहिजे

4) एकूण 8 ते 10 तास झोप घेणे आवश्यक असते.

A]First  trimester (12आठवडे ) तीन महीने

कांता माझ्या बाह्य रुग्ण विभागात तपासणी करण्यासाठी आली होती…. तिला ताप आल्यासारखं वाटत होतं…. तिची नेहमीच मासिक पाळी अनियमित असल्याने ती गरोदर आहे हे तिला समजले नव्हते…. आणि तिने लोकल डॉक्टर कडून तापेसाठी गोळया घेतलेल्या होत्या…

माझ्या कडे आल्यावर मी तिची प्राथमिक तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.. आणि तिची उपचाराची दिशा बदलली…

मग मी कांताला गरोदरपणातील पहिल्या तीन महिन्यांची माहिती देण्यास सुरुवात केली

पाळी चुकली की पहिले प्रेग्नेंट आहे की नाही हे कन्फर्म करायला हवे…

हे तुम्ही डॉक्टर द्वारे करू शकता किंवा स्वतः ही करू शकता
ही टेस्ट काही अवघड नाही आणि या टेस्ट मध्ये सुरुवातीला urine चे मॉर्निंग sample घ्यावे लागेल….

Pregnancy कन्फर्म झाली की स्त्री रोग तज्ञांना दाखवायचे आहे.

लक्षणे ( Symptoms )

मळमळ होने

उलटी होने

सकाळी सकाळी चक्कर येणे

पाया मध्ये गोळे येणे

कुठल्याही गोष्टीचा वास येणे

जेवण न जाने आणि त्या मुळे येणारा अशक्त पणा

मूड बदलणे( mood swings )

डॉक्टर द्वारे क्लीनिकल तपासणी  काय काय केली जाते

  उंची

 वजन

  तुमचे नखं

   डोळे (conjuctiva )

 तुमची नाडी तपासणी

   ब्लड pressure

  काही सूज आहे का

बाकी तुमचे हृदय आणि रेस्पिरेटरी सिस्टिम तपासली जाते

नंतर तुमच्या बाळाची वाढ तूम्ही सांगत आहेत त्या अनुषंगाने बरोबर आहे की नाही हे बघितले जाते

आणि तुमची या व्यतिरिक्त काही इतर कंप्लेंट असेल तर ते बघितले जाते.

रक्ताच्या आवश्यक तपासण्या

तसं तर रक्ताच्या काही मूलभूत तपासण्या केल्या जातात पण हे प्रत्येक रुग्णा प्रमाणे बदलू शकते…

1)हिमोग्लोबिन, रक्त गट आणि युरीन च्या प्रोटीन, शुगर, ची तपासणी

2)एच आई व्ही, व्ही डी आर एल, एच बी एस ए जी,  thyroid

 सोनोग्राफी तपासणी खालील कारणासाठी केली जाते
गर्भ.. गर्भपिशवीत आहे का नाही हे तपासण्यासाठी

बाळाचे ठोके, बाळाची वाढ बघण्यासाठी

जर रक्तस्त्राव होत असेल तर अबॉर्शन चा प्रकार बघण्यासाठी

सोनोग्राफीला जाताना :पाणी भरपूर पिणे जरुरी असते ब्लॅडर पूर्ण भरलेले हवे

जेवण, नाश्ता केला तर चालतो

काय नाही केले पाहिजे( पूर्ण 40आठवडे )

1)ओझे न उचलने

2) संबंध न येऊ देणे

3) प्रवास टाळणे

4)कुठलाही कच्चा मांसाहार टाळणे, कॉफी, शीतपेय, चायनीज, अल्कोहोल, स्मोकिंग हे सर्वच प्रकार टाळायचे आहे.

काय केले पाहीजे

1)सकाळी सकाळी कोरडे अन्न खाणे (पहिले तीन महीने )

2)जे खावेसे वाटते ते खावे फक्त ते अन्न healthy असावे…. वरी दिलेल्या लिस्ट मधले नसावे

3)डॉक्टरांनी दिलेल्या सर्व tablets अगदी नियमित आणि वेळेवर घेणे…. folic ऍसिड बाळाच्या मेंदूच्या वाढी साठी खूप जरुरी आहे… आणि बाकी tablets ने तुम्हाला होणारा त्रास कमी होईल

4)अन्नामध्ये शिजलेले अन्न, हिरव्या पालेभाज्या :मेथी,पालक. करडी, टोमॅटो, आलू, बिट, बाकी इतर मौसमी भाज्या…  तसेच फळे :सफरचंद, रताळं, गाजर, किवी, डाळिंब(40आठवडे ), केसरयुक्त दूध

5) ड्राय फ्रुटस,अंजीर, खजूर,मनुके,बदाम, काजू अक्रोड पिस्ता (थोडया प्रमाणात ) शेंगदाणे, डाळी,(40आठवडे )

डॉक्टर केव्हा गाठावा( धोक्याची लक्षणे )

नियमित तपासणी च्या वेळे शिवाय जर

1) अचानक पोट दुखत असेल तर

2) रक्तस्त्राव होत असेल तर

 3)नियमित उपचार केल्यानंतरही उलट्या होत असतील तर

  B]     सेकंड trimester (13 ते 28आठवडे )चार ते सात महीने

डॉक्टर ने दिलेल्या follow up च्या तारखा नियमित पाळाव्यात
क्लीनिकली प्रत्येक वेळेला वर दिलेल्या लिस्ट प्रमाणे तपासणी केली जाते…( head to toe examination )

त्यामध्ये प्रामुख्याने, बाळाची वाढ, बी. पी. तपासले जाते

रक्तातील हीमोग्लोबीन हे ही तपासले जाते, गरजे प्रमाणे काही

रक्ताच्या आणि युरीन च्या तपासण्या केल्या जातात.
तसंच सगळ्यात महत्वाचे म्हणजे 18 ते 20 आठवड्यांच्या दरम्यान एक anamoly स्कॅन ही सोनोग्राफी तपासणी केली जाते.

या तपासणी मध्ये बाळामध्ये काही व्यंग आहे का ते बघितले जाते…

जर बाळामध्ये काही मोठे व्यंग असेल आणि आईच्या जीवाला धोका होत असेल तर ते बाळ काढून टाकण्याचा कालावधी 20 आठवड्यांचा आहे… त्या नंतर काढणे ही कायद्याने बंदी आहे

एका स्त्री ने ही सोनोग्राफी केली नाही आणि सातव्या महिन्यात तिने सोनोग्राफी केल्यावर तिला कळाले की तिच्या बाळाला हृदयाचा खूप मोठा आजार आहे… पण कायद्या मुळे तिला नऊ महीने पूर्ण होऊ द्यावे लागले… बाळ खालून येत नसल्याने सीझर करावं लागलं…. सीझर झाल्यावर तासाभरात ते मूल दगावलं…. फक्त anamoly स्कॅन न केल्याने हा त्रास त्या आईला सहन करावा लागला

ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य इतकंच की चुकूनही ही सोनोग्राफी तपासणी चुकू देऊ नका…

रक्त वाढीच्या आणि कॅल्शियम च्या गोळया सुरु केल्या जातात त्या डिलेव्हरी होईपर्यंत  घ्यायच्या आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक डॉक्टर हा तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने tablets देऊ शकतो
कधी कधी रक्त वाढीच्या गोळया सहन होत नाहीत त्या वेळेस डॉक्टर ने सांगितल्या प्रमाणे नियमित तपासणी व गरज असल्यास रक्तवाढीचे इंजेक्शन लावून घेणे जरुरी असते…

नियमित तपासणी व्यतिरिक्त डॉक्टर कधी गाठावा

1) अंगावर सूज, पाय सुजणे

2) डोके दुखणे, मळमळ करणे, उलट्या होने

3) छाती दुखणे

4)पोट दुखणे

5) बाळाची हालचाल न जाणवणे… साधारण पणे 18 ते 20 आठवड्यापासून बाळाची टिचकी मारल्या सारखी हालचाल जाणवते…

6)अंधुक दिसणे

7)अचानक रक्तस्त्राव होने

C] Third trimester (29 ते 40 आठवडे ) आठ ते 9 महीने सात दिवस

डॉक्टर या मध्ये वरील सर्व तपासण्या करुन बाळाची वाढ,

बाळाची position, प्रेसेंटेशन वगैरे बघितल्या जाते .
इथे सोनोग्राफी डॉप्लर, nst किंवा routine…… गरजेप्रमाणे केल्या जातात.

रक्त व urine च्या वरी लिस्ट दिल्या प्रमाणे तपासण्या केल्या जातात

डॉक्टर केव्हा गाठावा (धोक्याची लक्षणे )

1)अंगावर सूज, पाय सुजणे

2) डोके दुखणे, मळमळ करणे, उलट्या होने

3) छाती दुखणे

4)पोट दुखणे

5) बाळाची हालचाल न जाणवणे.किंवा रोजच्या पेक्षा कमी किंवा जास्त हालचाल जाणवणे.

6)अंधुक दिसणे, झटके येणे

7)अचानक रक्तस्त्राव होने

8) पोट राहून राहून गच्च होने, मांड्या भरून येणे, कंबर दुखणे, रक्तमिश्रित डाग लागणे

या व्यतिरिक्त कधी कधी डिलेव्हरी ची तारीख उलटून गेली तरी एखाद्या रुग्णाला कळा येतच नाही अश्या वेळेस ती गर्भवती महिला सीझर होईल या भीतीने डॉक्टर कडे जात नाही…. हवं तर तूम्ही एक नाही दोन तज्ज्ञांचे मत घ्या पण डॉक्टर कडे न जाण्याची चूक करू नका…

कारण एकदा दिवस पूर्ण झाल्यावर बाळाभोवती चे पाणी कमी कमी व्हायला लागते आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो…

आम्ही कितीतरी अश्या गर्भवती माता बघितल्या आहेत की ज्यांनी नऊ महीने बाळाला पोटात वाढवलं आणि अश्या एका सीझर च्या भीतीने बाळाला गमावलं….

सख्यानो मला असे वाटते की जर या लेखाप्रमाणे तूम्ही तुमची स्वतः ची काळजी घेतली तर तुमची प्रसूती ही सुलभ होईल… आणि तुम्हाला पडणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची मी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे…

टीप : walking हे second आणि third trimester मध्ये केले तर चालते… पूर्ण गरोदरपणात हिल्स च्या चप्पल वापरू नये.

लेख आवडल्यास like करा, share करायचा असल्यास नावासहित share करा
©® डॉ सुजाता कुटे

Comments are closed.