गर्भातील बाळाची व्यथा…

Written by

मी कळी…❤

 

 

 

आई आपल्या बाळाची एकदम उत्सुकपणे वाट पाहत असते… मग ती मुलगी असो वा मुलगा … आईला दोन्ही मुल सारखीच असतात… पण बलात्कारासारख्या बातम्या ऐकल्या की वाटत … मुलगाच बरा … मुलगी नको … कारण तिच्या वाटेला अस काही आल तर …

 

आजची स्त्री पुरुषांएवढीच कर्तृत्ववान असली तरीही समाजात तिच्यावर अन्याय होताना पाहतो … मग मनात प्रश्र निर्माण होतो… असे अन्याय होण्यापेक्षा मुलगाच बरा …

 

_________×__________×_________

गर्भातील बाळ त्याची व्यथा मांडतो… ❤

अग आई… अग हो हो मीच… तुझ्या पोटात मी आहे…मुलगी… मिच बोलतेय… घाबरू नको…मला ना तुझ्याशी थोडसं बोलायचे आहे ग… काय ग आई… आधी तर तु मुलगी हवी असे बोलत होती… पण आता काही दिवसापासून तु तर मुलगाच असेल तर बर् होईल असं बोलते आहेस… तुला भीती वाटते का माझ्यासोबत पण अस काही वाईट होईल म्हणून…

 

पण खर सांगू का… अश्या काही बातम्या ऐकल्या ना की वाटत इथे जरी अंधार असला ना…तरी बाहेरच्या जगापेक्षा इथेच बर् आहे… बाहेरच जग माझ्यासाठी सुरक्षित असेल ना ग…? पण मी बाहेर येणार नाही असं नाही हं…मी येणार…

 

तुझ् अंगाईगीत ऐकायचय मला… 

तुझ्या उबेच्या कुशीत झोपायचय मला… 

तुझे सुख दुःख जाणून घ्यायचेत मला… 

तुझी एक जवळची मैत्रिण व्हायचय मला… 

तुझ्या मऊ मऊ हातानी माया करून घ्यायचिये मला… 

 

त्या दिवशी डोहाळे जेवणात पण पेढा निघाला म्हणून तु आणि बाबा किती खुश झालात ग… बर्फी निघाली असती तरी एव्हढेच खुश झाला असतात का ग…? मुलगा नसेल तर आपल्या घराच पानच हलणार नाही का ग…?

 

मला वाढव की मुलासारखे… मला शिकव की कराटे.. कुंफू.. सर्व… मी पण काहीतरी छान करून दाखवेन की ग… मुलगी असले तरी तुमचा छान सांभाळ करेन ग… मोठ्या क्षेत्रात छान शिक्षण घेऊन आपल्या घराचा सन्मान करेन… मुलगा वंशाचा दिवा आहे तर मी पण त्या दिव्याची वात आहे ना ग…

 

खरचं माझा जन्म म्हणजे तुला शाप वाटतो का ग…?

©®All Rights Reserved

 

✍प्रीती बडे

 

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.