गहिवरला श्वास तू..२

Written by

गहिवरला श्वास तू..२

लग्नाच्या बाबतीत त्याच्या काही फारशा अपेक्षा नव्हत्या.
मुलगी दिसायला बरी,स्वभावाने गरीब,आणि डॉक्टर असली तर उत्तम..
तिच्या आईच्या हाताचा special शिरा,आणि पोह्यांनी कार्यक्रमाला सुरूवात झाली..तसं दोघांनाही त्यात फारसा interest नव्हता.. सगळ्यांच्या पाया बिया पडायचे सोपस्कार झाले..त्याचे पाय पडायची acting ही करून झाली तो नको म्हणणार माहीत असूनही..काय करणार प्रथा आहेत ना..!
शेवटी सगळ्यांनी एकमेकांशी बोलायला पाठवलं..मनातल्या मनात “याहू….” म्हणत दोघे पटकन तिथून सटकले..गच्चीवर तिच्या आवडत्या मोगर्याजवळ ती त्याला घेवून गेली..
पश्चिमेकडे लाजून गुलाबी होणारा सूर्य..त्याचवेळी पूर्वेकडे नुकतीच जन्मलेली साजरी चंद्रकोर..आजूबाजूला पिंगा घालणारा खट्याळ वारा..त्यामुळे मधेच टपटप पडणारी मोगर्याची फुलं..त्यांचा हलका दरवळ आणि समोर ती..पहिल्यांदाच पाहूनही जन्मोजन्मीची खूण पटल्यासारखी..त्याला तर Romantic date वर आल्यासारखंच वाटत होतं…..
कधी कधी संवादासाठी शब्दांपेक्षा नजर जास्त effective असते.तिची ती बडबड,स्वतःबद्दल सांगणं,त्याच्याबद्दल विचारणं..सगळं किती सहज,जुनी ओळख असल्यासारखं वाटत होतं..त्याच्या चॉकलेटी डोळ्यात तिला त्याची निरागसता दिसत होती..तेवढ्यात आलेल़्या वार्याच्या झुळूकेने तिचे भुरभुरणारे कुरळे केस जरा बाजूला उडाले आणि त्याला दिसला तिथे मघापासून लपून बसलेली नाजूकशी मोगर्याची सर….केव्हापासून घमघमणारा हा सुगंध इकडूनही येत होता तर…साहेबांच्या मनातला कवीच जागा झाला..

“गंध भरला मोगरा..
केसांत तुझ्या खुलून यावा..

नात्याच्या ह्या शुभ्र कळ्या ,
आता आपल्यात फुलून याव्या…..”

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा