गहिवरला श्वास तू..४

Written by

गहिवरला श्वास तू..४

मंतरलेले दिवस होते ते..
उठलास का?जेवलास का?काय करतेयस?आठवण येते ??अशा typical messages नी inbox full होत होता..shopping, movies,भटकंती सगळं एकत्र .. मस्त चाललेलं आयुष्य..सात जन्मांची स्वप्न पाहत दोन जीव मनाने कधीच एक झालेले…

अशातच एक दिवस..
त्याच्या hospital ला आलेली case..
८२ वर्षीय आजोबा..
छातीत कळ..
त्रासाला सुरूवात झाल्यापासून तब्बल २ तासांनी दवाखान्यात ..
एवढा वेळ acidity वाटली म्हणे नातेवाईकांना..
डोकंच सटकलं होतं त्याचं..पण आता ह्या सगळ्यापेक्षा त्याचं लक्ष पेशंटकडे जास्त होतं.. पण सहकारी व याने मिळून शर्थीचे प्रयत्न केले तरी नियतीने काही तोंडी आलेला घास सोडला नाही..
झालं..काही मिनीटीत तिथे १५-२० जणांचा group जमा झाला नि याच्या सहकार्यांसह याला जमावाने घेरून खूप मारलं.. मिडीयाला नवीनच विषय मिळाला चघळायला..आतापर्यंत वाचवलेल्या १०० पेशंट्स बद्दल ज्यांना माहीतही नाही त्यांनीही याच्या कार्यक्षमतेवर शंका घ्यायला सुरूवात केली..एका news channel ने तर कहरच केला .. Treatment च नाही तर याच्या character बद्दलही नाही नाही ते आरोप केले गेले..कौतुक करणार्या नजरा तिरस्कारात बदलल्या..
एका दिवसात चित्र एवढं पालटलं की सगळं होत्याचं नव्हतं होवून बसलं..याचं करीयर,केलेली मेहनत पाण्यात गेलं..
सगळं संपल्यासारखं वाटत होतं तिच्याशी बोलावं म्हणून फोन केला तर तिचा फोन स्विच्ड ऑफ… ७-८-१०वेळा फोन करूनही तेच..
ती सुध्दा या सर्वांसारखीच..या सगळ्यावर विश्वास ठेवला वाटतं तिने ..म्हणून फोन बंद येतोय..
प्रेम प्रेम म्हणून केलं ते सगळं नुसत वरवरचं??
आज तिलाही माझ्या कामावर,माझ्या character वर शंका यावी..??
असहाय्य वाटत होतं..
सगळाच मनस्ताप..
प्रचंड संताप आलेला.. तिचाही आणि स्वतःचाही….

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा