गहिवरला श्वास तू..५(अंतिम)

Written by

गहिवरला श्वास तू..५ (अंतिम)

नोटीस मिळालेली हॉस्पिटलकडून ..प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत घरी बसायचं..
पायाशी आली ती वस्तू लाथेनं थाडकन उडवली..
सगळं अस्ताव्यस्त्य केलं….
आदळआपट ..
पसारा ..
ती असती तर हे पाहून जाम चिडली असती..
“श्याा..या क्षणीही तिचाच विचार मनात आला जिला आपली काही पडलीच नाहीये”
पुन्हा आतल्या आत धुमसणं सुरू झालं..

दारावर टकटक..
दारात ती उभी..
मनात बरं वाटलं पण मी चिडलेलो ना..बोललोच नाही काही..
एकतर स्वतःला माझी काळजी नाही आणि आत आल्याबरोबर माझ्यावरच firing.. मलाच एक ठेवली…
“अगं..किती जोरात मारते..आधीचं लागलंय ना ..”
ती-मग काय आरती करू तुझी..हे काय करून ठेवलंय घरात..
तो- तूच कारणीभूत आहे याला..लोकांनी नाही तर नाही तू सुध्दा माझ्यावर विश्वास ठेवू नये..
..
” रोहन्या ..तोंडावर ताबा..आम्ही म्हणतो ते तू पुन्हा पुन्हा prove करतो “मागे वळलो तर हॉस्पिटल मधला मित्र प्रितम उभा..

तो-अरे तू केव्हा आला ?
तुला नाही माहीत ही कसं वागली..

प्रितम- just आलो..आणि ऐकलं तुझं.. हो आम्हाला नाही माहीत ना वहिनी कसं वागल्या ते..दोन दिवस झाले तुझ्यावर अन्याय होतोय तू किती मन लावून काम करतो जगाला दाखवून द्यायचं होतं त्यांना म्हणून dean पासून पेशंट्स पर्यंत कितीतरी जणांशी बोलल्या..CCTV Footage शोधलं,काही चांगल्या पत्रकारांचाही support मिळाला , त्यामुळेच emergency वर फरक न पडू देता OPD बंद ठेवून strike करायचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आणि तो successful झाला..
खरं म्हणजे चांगल्या डॉक्टरलाच नाही तर कुठलीही नोकरी करणार्या व्यक्तीला उत्तम सेवा देण्यासाठी stress free वातावरण पाहिजे. बाकी नोकर्यांसारखा एक fix उत्तर किंवा treatment नसते ना आपल्या बाबतीत..प्रत्येक शरीर,त्याचा treatment ला response वेगळा असतो..
एक गोळी एका व्यक्तीसाठी best असली तरी ती कधी कधी दुसर्यासाठी allergy घेवून येते .. हे खूपदा शरीररचना,सवयी यांवरही अवलंबून असतं.. मग
मनात मारहाणीची भिती असेल तर कोण सरकारी दवाखान्यात सेवा द्यायला तयार होईल..कारण सरकारी दवाखान्यात ह्या गोष्टींचं प्रमाण जरा जास्तच असतं..कोणत्याही डॉक्टरला आपल्या पेशंटचा जीव सर्वात महत्वाचा असतो..क्वचित जण असतातही पैशाला महत्त्व देणारे पण ह्या थोड्यांमुळे मनापासून काम करणारा वेठीस नको धरला जायला..
हे सगळं सामान्य जनतेला नीट समजावून पटवून देण्याच्या खटपटीत होत्या रे त्या..गधड्या जरा TV सुरू करायचे कष्ट घेशील का??

TV ऑन केला ..

डॉ.रोहन निमकर यांना मारहाण करणाऱ्या जमावातले ४ मुख्य आरोपी गजाआड..
निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी वाढीव security guards मंजूर..
मी आधी treat केलेल्या काही पेशंट्सच्या माझ्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या छोट्या छोट्या video clips..
कामावर लवकरात लवकर रुजू होण्याचा डीनसरांचा आदेश..
.
.
कधी न रडणारा strong मी आज डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहत होतं…
तिने पटकन पुढे होवून माझे डोळे पुसले आणि स्वतःचेही ..
तो- “s-o-r-r-y .. तुझा फोन स्विच्ड ऑफ आला म्हणून मला वाटलं..तू सुध्दा..”
ती- अविश्वास नाही अरे माझा फोन त्याच दिवशी चोरीला गेला..पोलीस कंप्लेंट वगैरै करतानाच हे प्रकरण कळालं मग ह्या कामात लागले आणि ..
तो-तिच्या तोंडावर बोट ठेवून.. बास..बास.. काही बोलू नको.. आता फक्त ऐकायचं…..
प्रित्या बाहेर जा बरं..
प्रितम -साल्या मला direct हाकलतोय…
“दोस्त दोस्त ना रहा….”

तो-बस नौटंकी..उद्या भेटतोच तुला हॉस्पिटलला..पळ..byee..

अजीबात वेळ न दवडता, तिला लगेच मिठीत घे़तलं..तिच्या गालावरची मघाची अश्रूंची जागा आता लाजेच्या गुलाबांनी घेतली..माझ्या हातांनी तिच्या डोळ्यातले मोती टिपले..तिनेही माझ्या छातीवर डोकं ठेवलं..तिच योग्य जागा होती तिची माझ्या आयुष्यतली..माझ्या हृदयापाशी

तू आज मला पूर्ण केलंस पियू..इतकं प्रेम..?
मी तर फक्त तुझ्याशी बोलून मन मोकळं होईल म्हणून बोलायचा विचार केलेला.. पण तू त्याच्याही कितीतरी पुढे जाऊन मला यातून सहीसलामत बाहेर काढलंस.. सप्तपदीच्या वेळी फेरे घेतानाची वचनं तू लग्नाआधीच prove केलीस ..
मला वाटायचं इतक्या वर्षांत मला girlfriend नाही मिळाली ;मी तर loser आहे..आज मला कळतंय;
माझ्या आयुष्यात तुझी जागा देवाने आधीच Reserve करून ठेवली होती..
I am the winner गं..

I am the winner..

तू माझ्या सोबत आहेस ना आता आयुष्यात कुठलीही संकटं येवू दे मला कसलीच भिती नाही..

“खुळं काळीज हे माझं ..
तुला दिलं मी आंदण…..
तुझ्या पायावर माखेल माझ्या..
जन्माचं गोंदण…..
जीव दंगला, गुंगला ,रंगला असा..
पिरमाची आस तू..
जीव लागला ,लाभला ध्यास ह्यो तुझा ..
गहिवरला श्वास तू………..”

(समाप्त.)

(माझ्या लिखाणाला छान प्रतिक्रिया देणारंचे खूप खूप आभार..दीर्घ कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न म्हणून हळूहळू थोडं थोडं लिहीत गेले.. वाट पहायला लागल्याबद्दल sorry..)

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा