गहिवरला श्वास तू..

Written by

पिस्ता कलरची साडी,साडीच्या काठाला मैचिंग अशी आणि तिच्या पूर्ण धनुष्याकृती ओठांना खुलून येणारी हलकीशी लालचुटूक लिपस्टिक ,छोटीशी डार्क रेड टिकली ,जरा गव्हाळ रंग असलेली ,अगदी खूपच सुंदर नसली तरी चारचौघांत ऊठून येईल अशी ती आणि तिच्या उजव्या गालावरची तिची गोड खळी; जी अधेमधे गालांवर येणार्या तिच्या कुरळ्या बटांमागे हळूच लपायची..
तो पहिल्यांदाच बघायला गेला ते मनात जरा हुरहूर घेवूनच..
कशी असेल, काय बोलेल..
हे सगळं अनुभवायची त्याची पहिलीच वेळ..
Background ला
“दो अनजाने अजनबी..” चालू होतं..
तसंही तो तर हिरोपेक्षा काही कमी नव्हताच..
धारदार नाक,उंचपूरा,फिक्कट आकाशी रंगाचा शर्ट,काळी जिन्स,आणि ह्या सगळ्यावर त्याची Killer Smile..
लग्न करतांनाची तिची मुख्य अट.पप्पांना सांगून झालेलं, छान मनमोकळा हसणारा मुलगा माझ्या साठी शोधा असं.उगाच ओढून ताणून हसणार्या ,तोंडावरची माशी उडणार नाही असा चेहरा करून रहाणार्यांचा तिला जरा तिटकाराच होता ..
मग आले हे महाराज.. फोटोवरून तरी मोकळे वाटले……
तो-
सरकारी हॉस्पिटल मधे प्रैक्टिस करणारा..घरात कुणी दुसरं डॉक्टर नसतांना स्वतःच्या मेहनतीवर इथपर्यंत पोहचलेला…..पण गर्व जरा म्हणून नाही.. सगळ्यांशीच पटकन जुळवून घेणारा मदत करणारा ..आणि म्हणूनच पूर्ण कुटूंबात कौतुकाचा विषय असलेला.. आईपप्पांचा राजकुमार आज त्याच्या राणीला पहायला जाणार होता……

क्रमशः

-प्रणाली.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत