गारवा…♥

Written by

©® सुनीता मधुकर पाटील.

गारवा…❤

शहारून टाकतो ,
गुलाबी थंडीतील बोचरा गारवा…
हळुवार उलगडतो ,
मनाचा कोपरा हळवा…

अंतर्मनात घालतो ,
जागर तुझ्या आठवांचा…
शोधत फिरतो ,
मग मी उन्हात चांदवा…

दिसता तु मोहरतो ,
असतेस तु फक्त भास फसवा…
उराशी सांभाळतो ,
अगणित वेदना विरह रुसवा…

स्वतःलाच समजावतो ,
आहे स्वप्नांवरच हक्क तेधवा…
काटा देहावरी उठवतो ,
घायाळ करतो बोचरा गारवा…

©® सुनीता मधुकर पाटील.

Article Categories:
कविता

Comments are closed.