गुंतता हृदय हे!! (पर्व २) भाग २

Written by

गुंतता हृदय हे!! (अंतिम भाग)

गुंतता हृदय हे!! पर्व २ (भाग १)

समीर आर्याच्या आठवणी मनात ठेवून जीवनाच्या एका नव्या प्रवासाला निघतो.

बँगलोर, भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर. बँगलोर शहराला भारताची माहिती तंत्रज्ञान (IT) उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते.

असो, समीरला बँगलोरच्या एका खूप मोठ्या IT कंपनीत नोकरी मिळते. २ दिवसानंतर त्याला ऑफिसमध्ये रुजू व्हायचे असते. पण त्याआधी तो बँगलोर शहर फिरायचं ठरवतो. त्याची राहण्याची सोय कंपनीने तिच्या कंपनीच्या कॉम्प्लेक्स मध्ये केलेली असते. तिथे त्या कंपनीतले काही सहकारी आपापल्या कुटूंबासोबत, तर काही एकटे राहत असतात..अत्याधुनिक सुविधा असलेली ती कॉम्प्लेक्स असते. त्या बिल्डिंगच्या समोर एक मोठं गार्डन सुद्धा असतं..समीरला बऱ्यापैकी ती जागा आवडते. तो दोन दिवसात जमेल तितकी माहिती काढून आसपासची ठिकाणे फिरायचे ठरवतो…तो राहत असलेल्या माळ्यावर २ फ्लॅट असतात..एका फ्लॅटमध्ये समीर तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये कोणी प्रमोद शास्त्री म्हणून राहत असतं..हे समीरला त्या फ्लॅटच्या नावाच्या फलकावरून कळते..सुदैवाने त्याचे शेजारी हे एक मराठी असतात हे बघून समीरला हायसं वाटतं.

समीरच्या दिवसा जेवणाचा प्रश्न ऑफिसमुळे सुटतो पण रात्रीच्या जेवणाचं काय करायचं..म्हणून जवळ कुठे खानावळ वगैरे असेल तर प्रश्नच मिटेल असा मनात विचार करून समीर शेजारच्या शास्त्री यांच्या दारावरची बेल वाजवतो..

प्रमोद शास्त्री स्वतःच दरवाजा उघडतात..समीर त्यांना स्वतःची ओळख करून देतो व त्यांना तो शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला आल्याचं सांगतो..तसेच त्याने बेल वाजवण्याचं कारण ही शास्त्री यांना सांगतो..
शास्त्री समीरला आत बोलवतात आणि त्यांच्या पत्नीला म्हणजेच सुमती शास्त्री यांना हाक मारतात..

शास्त्री कुटूंबाचे प्रमुख प्रमोद शास्त्री हे त्याच IT कंपनीत मोठ्या हुद्यावर असतात..जिथे समीर रुजू होणार असतो..त्यांची बायको सुमती ही गृहिणी..तसेच त्या दाम्पत्याला गौरी आणि वेदांत नावाची मुले आहेत..गौरी २ वर्षांपूर्वीच तिच्या पुढच्या शिक्षणासाठी परदेशी गेलेली असते आणि वेदांत त्याच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतो. त्या दिवशी रविवार असल्यामुळे सगळे जण घरात असतात.. एकंदरीत ते छोटं पण सुखी कुटुंब असतं..

गप्पांच्या ओघात हे कळते की, सुमती काकू ह्या स्वतः खानावळ चालवत असतात..त्यामुळे समीरचा जेवणाचा प्रश्न सुटतो..शास्त्री काकांना एकंदरीत समीरचा स्वभाव बऱ्यापैकी आवडतो..तसे पण, एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे सतत त्यांच्या भेटीगाठी तर होणारच असतात..

असेच काही दिवस जातात..समीर हळूहळू त्याच्या ऑफिसच्या कामामध्ये रुळू लागतो..काही दिवसातच त्याने त्याच्या हुषारीची छाप सर्वांवर पाडलेली असते..त्याचे बॉस ही त्याच्यावर खूप खुश असतात..तसेच समीर ही त्यांची ह्या कंपनीच्या उज्वल भविष्यासाठी केलेली योग्यच निवड होती..याचा त्यांना अभिमान ही वाटतो..

त्याचबरोबर शास्त्री कुटूंबाशी ही समीरचे काही दिवसातच ऋणानुबंध जुळतात..आता तर, सुमती काकी त्याला रोज रात्री घरीच जेवायला बोलवत असतात..तसेच वेदांत ही कधीमधी अभ्यासात काही अडलं तर अभ्यासात समीरची मदत घेत असतो..एकंदरीत फार कमी दिवसात समीर एका अनोळखी शहरात स्थिरस्थावर होतो..तसेच शास्त्री कुटूंबाचा एक सदस्य ही..

तरीही आर्याच्या आठवणी काही त्याच्या मनातून जात नसतात..कधी कधी तर त्या आठवणींतून तो त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून देत असतो आणि म्हणत असतो,
🎶🎶ये रूह भी मेरी, ये जिस्म भी मेरा
उतना मेरा नही, जितना हुआ तेरा..
🎶तूने दिया है जो, वो दर्द ही सही
तुझसे मिला है तो ईनाम है मेरा🎶🎶
🎶मेरा आसमाँ ढूंढें तेरी ज़मीं
मेरी हर कमी को है तू लाज़मी🎶🎶
🎶ज़मीं पे ना सही, तो आसमाँ में आ मिल
तेरेे बिना गुज़ारा, ऐ दिल है मुश्किल🎶🎶

क्रमश:

(हा भाग आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की share करा..)
©preetisawantdalvi

Article Categories:
प्रेम

Comments