गुंतता हृदय हे !! (भाग ३)

Written by

गुंतता हृदय हे!! (भाग १)

गुंतता ह्रदय हे!! (भाग २)

“अनिश ह्या साठे काकू आणि या जोशी काकू व ही त्यांची मुलगी आर्या’, गोडबोले काकू म्हणाल्या.

अनिश ने दोन्ही काकूंना नमस्कार केला आणि आर्याला hi म्हटले.

आर्या ची नजर अनिश वरून हटतच नव्हती..

इतक्यात जोशी काकू म्हणाल्या, “अरे, रेडिओवर म्हणजे तू RJ अमेय ला ओळखत असशील ना? “

“मी न चुकता त्याचा प्रोग्राम ऐकते..कोणता ग तो आर्या? हा “गुंतता हृदय हे”, किती सुंदर असतो प्रोग्रॅम!! त्यातली मराठी गाणी तर खूपच सुंदर आणि त्याचा आवाज तर!!”

काकूंना मध्येच थांबवत आर्या म्हणाली, ” आई!! पुरे झाले त्या अमेय च कौतुक”.

इतक्यात साठे काकू म्हणाल्या,” मी पण ऐकते तो प्रोग्राम..फारच छान आवाज आहे हो अमेयचा. अनिश तु ओळखतोस का रे त्याला?”

अनिश मंद हसला आणि म्हणाला, “नाही, मी पण त्याचा आवाजच ऐकलाय. त्याला कधी पाहिले नाही..कारण मी हल्लीच रेडिओ वर कामाला लागलोय..आणि माझी ऑफिस ची वेळ उशिराची असल्यामुळे..त्याला भेटण्याचा योग अजून तरी आला नाही. हा पण जेव्हा पण मी त्याला भेटेन, तुमचा मेसेज नक्की देईन”

आर्या ला फारच बोर झाले होते..ती हा विषय संपवण्यासाठी अचानक म्हणाली, “वाह!! काकू तुमचे घर खुपच छान आहे, मी बघू शकते का?”

“नक्कीच, त्यात काय विचारायचं एवढे. अनिश जा रे आर्याला आपले घर दाखव..”

अनिश आर्याला घेऊन घर दाखवायला घेऊन गेला व म्हणाला,” तू लिविंग रूम तर बघितलास.. आता हा उजवीकडे किचन आणि हो ही डावी कडची माझी रूम आणि हा समोरचा मास्टर बेडरूम हा आई बाबांचा आहे.”

“वाह!!खूपच मस्त आहे तुझं घर i mean तुमचं घर!!” मधेच तोडत अनिश म्हणाला की, “its ok. तू बोललंस तरी चालेल मला”.

“तुझं घर खूप छान आहे..woww तू paintings पण काढतोस?” आर्या म्हणाली.

“ते आपले असचं वेळ जात नसेल तेव्हा काहीतरी रेखाटतो.  मी काही प्रोफेशनल पेंटर नाही.” अनिश म्हणाला.

“तरी फारच छान आहेत paintings..एखाद्या दिवशी वेळ काढून नक्की बघायला येईन..” आर्या म्हणाली.

त्यावर अनिश काही बोलणारच होता, तेवढ्यात जोशी काकूंनी आर्याला हाक मारली.

त्यामुळे त्या दोघांचं बोलणे अर्धवटच राहिले..गोडबोले काकू आणि अनिश चा निरोप घेऊन जोशी काकू, आर्या आणि साठे काकू घरी जायला निघाल्या..

घरी आल्यावर पण आर्या च्या मनातून अनिश ची छबी जातच नव्हती..आणि इथे ही असाच काहीतरी अनिश च झाल होतं..

कहते है ना, एक नजर ही काम कर गयी।।?

चला, दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या कामाला लागले..सकाळीच जोशी काकांनी काकूंना आपण संध्याकाळी एरिया मधला सार्वजनिक गणपती बघायला जाऊ असे सांगितले..आणि आर्या ला ही बरोबर नेऊ म्हणून तिला तयारीत राहायला सांग असा मेसेज ही दिला.
ऋग्वेद तर मित्रांच्या घरचे गणेश उस्तव करण्यात व्यस्त होता..काकांना माहीत होते की, हा ११ दिवस काही सापडायचा नाही. म्हणून त्यांनी आर्यालाच मेसेज दिला..

संध्याकाळी सर्व जोशी कुटूंब जवळच्या गणपती मंडळात गेले..पाया पडून निघणार इतक्यात गोडबोले कुटूंब ही तिथे आले होते..आर्याची नजर अनिश ला शोधत होती..आणि हे गोडबोले काकूंनी हेरले..त्यांना आर्या बघताक्षणी आवडली होती..त्यांना आर्यासारखीच बायको हवी होती अनिशसाठी.

इतक्यात, जोशी काकू म्हणाल्या, “अनिश कुठेय? तो नाही आला?”

“त्याच्या मित्राच्या घरी गेलाय तो गणपतीसाठी..इथे आज सत्यनारायणाची पूजा म्हणून मी म्हटले, पटकन पाया पडून येते..घरी माझी जाऊ आहे. म्हणून जमलं. नाहीतर घरात गणपती असताना कुठेच जायची सवड मिळत नाही.” गोडबोले काकू म्हणाल्या.

“हो ना. ते तर आहेच. चला आम्ही निघतो” जोशी काकू उत्तरल्या.

इतक्यात अनिश तिथे आला.
“आई, अग तू इथे आहेस. चल ना लवकर घरी माझे सगळे कामावरचे सहकारी आले आहेत घरी..त्यांचा अचानक फोन आला. काकू बोलली तू इथे ली आहेस, म्हणून तुला बोलवायला आलो.”

बोलता बोलता त्याची नजर जोशी कुटूंबाकडे गेली. आर्या ला बघताच तो बघतच राहिला..

आर्याने मेहेंदी कलरचा कुर्ता घातला होता, त्यावर मॅचिंग झुमके, bangals..आणि क्लिप लावून सोडलेले मोकळे केस..कपाळावर diamond टिकली..ती खूपच सुंदर दिसत होती..

आर्या ची कळी ही अनिश ला बघताच लगेच खुलली..

ये तो होना ही था।।?

इतक्यात जोशी काकू पटकन म्हणाल्या,” अनिश RJ अमेय पण आला आहे का? असेल तर घेऊन ये की, त्याला इथे..आम्ही सर्व भेटू”

अनिश मंद हसला.
“काकू तो आज नाही येऊ शकला.. त्याच्या घरी पण गणपती असतो, जर तो आला तर मी नक्कीच कळवेन”.

आर्याकडे बघत बघत तो काकूंना म्हणाला,” काकू तुमचा नंबर मिळाला असता तर बरं झालं असतं कळवायला?”

“हो ना नक्की. तू आर्या चा नंबर घेऊन ठेव आणि तिलाच मेसेज कर, ते व्हाट्सएप का काय त्यावर” जोशी काकू उत्तरल्या.

आर्या आणि अनिशने आपापले नंबर exchange केले.
इतक्यात गोडबोले काकूंनी गणपती जवळ मनातल्या मनात आर्याच माझ्या घरची सून होऊ देत असे साकडे घातले..
व सगळे आपआपल्या घरी निघून गेले..

घरी आल्यावरही आर्याने पटापट स्वतःचे चांगले फोटो व्हाट्सएपच्या स्टेटस् वर ठेवले.. जेणेकरुन अनिश ते फोटो बघेल व त्यावर काही तरी कंमेंट करेल आणि त्या दोघांचे बोलणे सुरू होईल..

त्यादिवशी अनिशचे सहकारी उशिरा गेले व दुसऱ्यादिवशी विसर्जन असल्यामुळे अनिश ही लवकर झोपी गेला..

दुसऱ्या दिवशी सकाळी..जोशींच्या घरी…
||गुड मॉर्निंग, मुबंई||
मी आहे तुमचा सर्वांचा आवडता RJ अमेय.
सो, फ्रेंड्स आज स्टोरी सबमिशन ची शेवटची तारीख आहे.
ज्यांनी अजूनही ही स्टोरी पाठवली नसेल त्यांनी संध्याकाळी ५ वाजायच्या आधी स्टोरी सबमिट करावी..
जेणेकरून भाग्यवान विजेत्यांना मला भेटायची संधी मिळेल..

अमेय चा आवाज ऐकताच आर्या खाडकन जागी झाली आणि मनातच पुटपुटली, “लास्ट date..पण मी तर स्टोरी लिहिलीच नाही..म्हणजे मी अमेय ला कधीच नाही भेटू शकणार???”

इतक्यात तिच्या मेसेज ची बीप वाजली आणि तो मेसेज होता अनिश चा..

क्रमश:

गुंतता हृदय हे!! (भाग ४)

(कथा आवडल्यास like, share आणि comment द्यायला विसरू नका..पुढचा भाग लवकरच पोस्ट केला जाईल..धन्यवाद?)

©preetisawantdalvi

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा