गुंतता हृदय हे!! (भाग ५)

Written by

गुंतता हृदय हे!! (भाग १)

गुंतता ह्रदय हे!! (भाग २)

गुंतता हृदय हे !! (भाग ३)

गुंतता हृदय हे!! (भाग ४)

आर्या मनातच म्हणाली, “अनिशचा फोन??”

क्षणभरासाठी तिने समीरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि समीरला म्हणाली, “मी आलेच २ मिनिटात”

व तिने अनिशचा कॉल रिसिव्ह केला..

तिने फोन उचलताच अनिशने आर्यावर नुसता प्रश्नांचा भडिमार सुरू केला.

तो म्हणाला,”आर्या तू ठीक तर आहेस ना? की, तुला माझा कोणत्या गोष्टीबद्दल राग आला आहे? तू फक्त पहिल्या दिवशीच मेसेजचा रिप्लाय दिलास, बाकी दिवशी तू माझा मेसेज ओपन करूनही नाही बघितलास..काय झालाय तुला? तू अशी का वागते आहेस माझ्याशी??”

बापरे, आर्याच्या लक्षात ही आले नव्हते की, तिच्या मेसेज न करण्यामुळे असे काही तरी होईल..पण तिला हे ही जाणून घ्यायचे होते की, अनिशची ही फक्त काळजी आहे की, त्याच्या मनात दुसरंच काहीतरी चाललय..असे असंख्य विचार तिच्या मनात चालूच होते.

तेवढ्यात अनिश समोरून म्हणाला,”आर्या are you there???”

आर्या पटकन भानावर आली आणि म्हणाली, “हो, अरे, किती काळजी करशील. मी एकदम ठणठणीत आहे. इतके दिवस मी ऑफिसच्या कामात खूपच व्यस्त होते. म्हणून खूप दिवस व्हाट्सएप ओपन करून नाही पाहिले आणि मी तुझ्यावर का रागविन. तुझं आपलं काहीतरीच असतं.”

तिचे बोलणं मधेच तोडत पटकन अनिश म्हणाला,”माझ्याबरोबर आज कॉफी प्यायला येशील? प्लीज”

आर्याला काय बोलावे हे सुचतच नव्हते..

चक्क अनिश तिला भेटायला बोलवत होता..

ती मंद हसली आणि म्हणाली, “हो नक्कीच..का नाही”

अनिश हे ऐकून खूपच खुश झाला..तो म्हणाला, “मस्त..मी तुला जागा आणि वेळ मेसेज करतो..मग आपण भेटू..अरे हो, अजून एक..कृपा करून आज तरी निदान माझा मेसेज वेळेवर वाच म्हणजे झालं”

दोघेही हसले..आणि मग दोघांनीही फोन ठेऊन दिला..

आर्या हसत हसतच समीर जवळ आली..

इतक्यात तिला आठवले की, समीरला तिला काहीतरी सांगायचे होते..

ती लगेच म्हणाली, “अरे समीर तू काहीतरी सांगणार होतास. बोल काय बोलायचंय.”

तो बोलणारच होता की, आर्याच्या फोनची मेसेज टोन वाजली..तिने पाहिले तर अनिशचा मेसेज होता. त्याने तिला भेटायची वेळ आणि ठिकाणाचे नाव मेसेज केले होते..

त्याने भेटायची वेळ ५ वाजताची दिली होती.

आर्याने घड्याळाकडे बघितले तर ३ वाजत होते..म्हणजे आर्याकडे फक्त २ तासच होते..तयार व्हायला..ती लगेच शेखरजवळ गेली व तिने शेखरला request केली की, तिला एका महत्वाच्या कामामुळे आताच घरी जावे लागणार म्हणून..शेखरने एकवार समीरकडे पाहिले..तर समीरने हा असा इशारा केला..मग काय, शेखरने आर्याला हो म्हंटले.

मग आर्याने पर्स उचलली आणि ती घरी जायला निघणार..इतक्यात तिला काहीतरी आठवले म्हणून ती परत आली आणि समीरच्या समोर उभी राहिली व म्हणाली,”सो, सॉरी यार, आपण उद्या बोललं तर चालेल तुला, प्लीज, मला खूप अर्जेन्ट काम आहे. उद्या नक्की बोलू.. बाय!!”

समीरने आर्याकडे बघून स्मित हास्य केले आणि मानेने हो म्हटले..

आर्या थोड्याच वेळात घरी पोहोचली..आर्याला लवकर घरी आलेलं पाहून तिची आई सुद्धा थोडी आश्चर्यचकित झाली..कारण महत्वाचं कारण असल्याशिवाय आर्या कधीच लवकर घरी येत नसे आणि सुट्टी ही घेत नसे..ती तिचे काम चोख करत असे..नेहमीच!!

जोशी काकू म्हणजेच आर्याची आई आर्याला म्हणाल्या, “अग आर्या, आज लवकर कशी आलीस? कुठे बाहेर जायचंय काय?”

आर्या उत्तरली,”हो आई. मला थोडं ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचंय..मी येईन तासाभरात परत..”

(थोड्यावेळानंतर..)

“अगं अगं, काय हवय तुला मला सांग. मी देते काढून. ही मुलगी ना..सगळ्या कपड्यांच्या घड्या विस्कटून टाकल्या. आर्या हे सगळे कोण उचलणार..किती तो पसारा केलायेस..” काकू म्हणाल्या.

“आई बस ना आता, निदान आज तरी नको ना..मी आवरेन आल्यावर रूम..आता प्लीज तू शांत राहा..कटकट नको करुस” आर्या म्हणाली आणि घरातून लवकर सटकली..

जोशी काकूंची बडबड सुरूच होती..

जशा सगळ्यांच्याच आई करतात?

असो, आर्या ५ मिनीट आधीच कॉफी शॉपमध्ये पोहोचली.. पण पाहते तर काय???

अनिश आधीच तिथे बसलेला तिला दिसला..

अनिशने ही आर्याला पाहिले आणि बघतच राहिला.. आर्याच्या बाबतीतही तसचं काहीतरी झालं..

अनिशने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती व डोळ्यांवर ग्लेअर लावला होता..आणि आर्याने पिंकीश कलरचा चुडीदार, एका हातात बंगल्स आणि दुसऱ्या हातात घड्याळ घातले होते..केस मोकळे सोडले होते आणि कानात झुमके आणि कपाळावर डायमंड टिकली लावली होती व ओठांवर मॅचिंग लिपस्टिक..

वाह!! ती इतकी सुंदर दिसत होती की, बघणारे बघतच राहतील..मग अनिशच काय झालं असेल..तुम्ही विचारच करा..

दोघांनीही एकमेकांना ग्रीट केले आणि दोघे बसले…दोघेही एकमेकांकडे नजर चोरून बघत होते..बोलायला कशी आणि काय सुरुवात करावी असे दोघांच्याही मनाला वाटत असावे.

मग काय अनिशनेच पुढाकार घेतला आणि २ कॉफी ऑर्डर केल्या..

आज त्याची नजर आर्यावरून हटतच नव्हती..

त्याला असं वाटतं होते, आज वेळ इथेच थांबावी आणि त्याने आर्याला असच बघत राहावे.

इतक्यात आर्या बोलली, “अनिश तुला काही बोलायचे होते का?”

“अ..म्..हो..म्हणजे तू ठीक आहेस की नाही हे..म्हणजे नाही..” अनिश बोलता बोलता थांबला..

त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलणार तर वेटर कॉफी घेऊन आला..

आर्या अनिश काय बोलतोय याची वाट पाहत होती..

वेटर निघून गेल्यावर अनिश उठून आर्या जवळ आला आणि तिच्या समोर गुडघ्यांवर बसून त्याने चक्क तिला लग्नाची मागणी घातली..

आर्याला हे सगळं स्वप्नचं वाटत होतं..तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं..अनिशला ही आर्याच्या मनाची अवस्था समजत होती. कारण त्याला ही वाटले नव्हते की, तो आज आर्याला मागणी घालेल ती पण लग्नाची..तो उठला त्याने खुर्ची सरकवली आणि आर्याचा हात हातात घेतला..

आर्या काही बोलणारच होती. पण त्याआधी अनिश म्हणाला, “आर्या ह्या माझ्या मनातल्या भावना आहेत..तुझा जो काही निर्णय असेल मला तो मान्य असेल..मला नाही माहीत हे कसे झाले पण झाले..तुला माझा राग आला असेल तर मला माफ कर पण…”

आर्याने अनिशच्या तोंडावर हाथ ठेवला आणि म्हणाली, “बस, आता काही नको बोलूस..मला सुद्धा हेच ऐकायचे होते..मला ही तू खूप आवडतोस अनिश..अगदी पहिल्या दिवसापासून..जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले होते..I love you अनिश”

बाहेर खूप पाऊस पडत होता आणि कॉफी शॉप मध्ये गाणं सुरू होतं..

??मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो???

नाही कळले कधी, जीव वेडावला??

ओळखू लागलो तू मला मी तुला

नाही कळले कधी,  धुंद हूरहुर ही श्वास गंधावला??

ओळखू लागलो तू मला मी तुला

नाही कळले कधी…..???

मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो?????

नाही कळले कधी, नाही कळले कधी???

क्रमश:

गुंतता हृदय हे!! (भाग ६)

(माझ्या कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व वाचकांचे धन्यवाद? ही कथा आवडल्यास like आणि share करायला विसरू नका..पुढचा भाग लवकरच पोस्ट होईल याची वाचकांनी नोंद घ्यावी)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत