गुगलवरील जिवती

Written by

गुगलवरील जिवती,..

(श्रावण शुक्रवारची कथा आधुनिक जिवती)

©स्वप्ना मुळे (मायी)

ऑफिसच्या कोपऱ्यात तिघींची चालू असलेली खुसफूस रेवाला ऐकू येत होती,…पण आधीच ऑफिसमध्ये यायला उशीर झालेला त्यामुळे तिला आता जाऊन त्यांच्या हसण्याला उत्तर देता येईना,…दुपारी लंच मध्ये बोलू ह्यांना असं म्हणत ती कामात गुरफटली,..
काल लोकलमध्ये जीवतीचा फोटो हिने विकत घेतल्या पासून ह्या तिघींची खसखस जरा जास्तच पिकली होती,..”असल्या रूढी परंपरा पाळायच्या तर शिक्षणाचा काय उपयोग असे टोमणे मारून झाले होते,..”रेवाने तेंव्हा दुर्लक्ष केलं आणि घरी गेल्यावर तिच्या सासूबाईंसोबत तिने ही गोष्ट शेअर केली,…तेंव्हा सासूबाईंनी फार सुंदर समजावलं होतं,..
हे बघ रवा,.. सणवार ह्यांचा उद्देशच मुळी आनंद हा आहे,…काही गोष्टी अति त्रासदायक असतील तर त्या सोप्या करूनही करता येतील पण त्या करण्याचा उद्देश जर तुमच्या पिढीच्या लक्षात आला ना तर मग सगळं सोपं आणि आनंददायी,..आता हा जिवती शुक्रवारच बघ ना,..जुन्या बायका लेकरं अगदी हाकेच्या अंतरावर असुनही आपल्या लोकरांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी करतच होत्या ही पूजा प्रार्थना,..हल्ली तर तुमची लेकरं दिवसभर कितिकिती तास तुमच्या पासुन कितीतरी दूर अंतरावर आहेत,..चटकन त्या फोटोसमोर दिवा लावून,..नाही पुरण तर गुळाफुटण्याचा नैवेद्य जो शरीराला पौष्टिक आहे ठेवून डोळे मिटून फक्त पॉझिटिव्ह व्हेवज निर्माण करायच्या आहेत म्हणजे आमची कहाणी,आरती पण नाही तुम्हाला वेळ तर फक्त मनात ती भावना त्या व्रताची की माझी बाळ सुरक्षित ठेव जिथे असतील तिथे,..बाळ तर अगदी दूर दूर देशात सुद्धा गेली आहेत आजकालच्या आयांची,..पण त्या व्हेवज करतात सकारात्मक वातावरण निर्माण,…आजकाल तुमचे सगळे अध्यात्म गुरू हेच सांगतातना पॉझिटिव्ह थिंकिंग अगदी परदेशी पुस्तकं सुद्धा थिंक पॉझिटिव्ह हाच सल्ला देतात तेच आपल्या पूर्वजांनी सणावारातून सांगितलंय,..रेवाला देखील ते पटलं होतं,.. तिने तर अगदी सकाळी जरा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मस्त हिरव्यागार दुर्वा आणि आघाड्याची पान तिने आणली होती,..एक पॉझिटिव्ह एनर्जी ह्या सगळ्या कृतीतून तिला जाणवत होती,…..
लंचमध्ये हे सगळं तिने उत्साहाने समजावलं आणि त्या आधुनिक आयांना पण ते पटलं त्यांनी लगेच गुगलवर जिवती इमेज शोधून दोन मिनिटं आपल्या बाळांना आठवून संरक्षणाची प्रार्थना त्या जिवतीला केली,..त्या प्रार्थनेत उल्लेख होता,..समाजात होणारे बलात्कार,..वाढते नशेचे व्यसन,.. अश्या सगळ्या आधुनिक विकारांपासुन आमच्या बाळांचे रक्षण कर,..आणि त्यांना तशी वाईट वागण्याची बुद्धी होऊ नये म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची आम्हाला बुद्धी दे,…
रेवाने पौष्टिक गुळ फुटाणे सगळयांना दिले आणि चौघीं जणींनी गुगलचे जिवती फोटो बद्दल आभार मानले,…आणि एका पॉझिटिव्ह एनर्जीने त्या भारावून गेल्या,…?

लेखिका-स्वप्ना मुळे,.. औरंगाबाद…

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा