गुणगौरव सोहळा..!!

Written by

शिक्षण घेत असताना अनेक प्रेरणादायी गोष्टी घडत असतात .मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढावा त्यांंच्यात गुणात्मक स्पर्धा जोर धरावी व मुलांच्या सर्वांगीण विकासाला नवचैतन्य मिळावे यासाठी शाळेमध्ये मुलांनी मिळविलेल्या शैक्षणिक यशाबद्दल गुणगौरव सोहळ्यांचे आयोजन केले जाते.या सोहळ्यामुळे निश्चितपणे मुलांना नवचेतना मिळते.कष्ट करुन जेंव्हा यश मिळते तो आनंद वेगळाच असतो पण याच आनंदाला जेंव्हा सोहळ्यांची किनार लागते तेंव्हा तो आनंद संपुर्ण जीवनाला प्रेरणा देतो.असे सोहळे प्रत्येक ज्ञानमंदिरात व्हावेत ,मुलांचे ते उज्वल भविष्य घडवितात ….अशाच गुणगौरव सोहळ्याची काव्यात टिपलेली भावमुद्रा ….!!

?

गुणगौरव सोहळा..!!

आज सोनियाची उगवली पहाट

गुणगौरव सोहळ्याची पहातो आम्ही आतुरतेने वाट

गुणगौरव सोहळ्याचा अप्रतिम थाट

सर्वदुर पसरे आनंदाची लाट

गौरव सोहळ्यात होते बक्षिसांची खैरात

बक्षिस देणाऱ्यांचे हे लाख मोलाचे हात

शाळेतील शिक्षक म्हणजे संस्काराची खाण

विद्यार्थ्यांच्या हृदयात त्यांचे मानाचे स्थान

शिक्षकांचे मार्गदर्शन मिळे विलक्षण

जीवनात उपयोगी पडे प्रत्येक क्षण

सुसंस्काराची शाळा देते आयुष्याचा धडा

विचारांच्या प्रेरणेने तुम्ही अन्यायाशी लढा

गुणगौरव सोहळा म्हणजे कष्टाचे फळ

विद्यार्थ्यांना मिळते सतत शैक्षणिक बळ

आठवणीत राहतो हा रम्य सोहळा

कसा विसरू आम्ही गुरुजनांचा लळा

गुणगौरव सोहळ्याची परंपरा ही अविरत रहावी

शाळेची किर्ती ही सातासमुद्रापार पसरावी.

—————————————–

✍

नामदेव पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा