गुलाबाचे काटे – 2

Written by

खडतर आहे मार्ग तरी चालत रहायच आहे
याच खाचखळग्यातून पुढे नंदनवन गाठायच आहे!!

अजून तर खऱ्या सत्याशी ओळख व्हायची आहे
इतक्यात धीर सोडू नको, ही तर खरी सुरवात आहे!!

सोपं नही जरी तरी अशक्य नक्कीच नाही
मन खंबीर ठेव, हिम्मत कधी हरायची नाही!!

स्वप्न मोडल तरी स्वप्न बघण सोडायचं नाही
ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण सोडायच नाही!!

खूप अडचणींनंतरच यशाची पायरी दिसते
काट्यांमुळे तर गुलाबाची खरी किंमत कळते!!

सहज मिळालेले यश पण कधी मानवत नाही
म्हणूनच काटे काढू नको, त्याशिवाय गुलाबाला काहीच अर्थ नाही!!!

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा