गृहकर्जावरील भरमसाठ व्याज ह्या पद्धतीने मिळवा परत…

Written by

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक जण आयुष्यात काही ना काही स्वप्नं जरूर बघत असतो. स्वप्नच नसतील तर आयुष्याला फारसा अर्थ उरत नाही. चांगले शिक्षण हा आयुष्यातील पहिला टप्पा पार पटल्यावर मग चांगली नोकरी/व्यवसाय यासाठी प्रयत्न सुरू होतात. त्यात यश आले की मग बहुतांश जणांचे पुढचे स्वप्न असते स्वतःचे घर. जर तुम्ही शहरात राहत असाल तर घर घेणे ही आयुष्यात सगळ्यात मोठी गुंतवणूक असते. अर्थात त्यासाठी लागणारा कालावधी आणि एकूण रक्कम याआधारे म्हणतोय मी. शहरात घर घेणे हे काही केवळ जवळ साठवलेल्या रकमेतून होत नाही.त्यासाठी जवळपास सर्वांना गृहकर्ज घ्यावे लागते.

पण गृहकर्ज घेताना त्याचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे असते. गृहकर्ज घेतल्याने काही प्रमाणात टॅक्स मध्ये फायदा होऊ शकतो. पण याचीच दुसरी बाजू म्हणजे पूर्ण कालावधी मध्ये व्याजाच्या स्वरूपात द्यावी लागणारी भरमसाठ रक्कम.

ही रक्कम किती मोठी असू शकते ह्यासाठी एक उदाहरण. समजा तुमचे गृहकर्ज आहे ३० लाख रुपये. गृहकर्ज कालावधी साधारणपणे २०, २५, ३० वर्षे असतात. जर ३० वर्षे धरले आणि व्याजदर ९ (सद्यस्थिती मध्ये याच्या आसपास आहे) पकडला तर आपण ह्या ३० वर्षात बँकेला व्याजस्वरूपात किती रक्कम देतो याचा विचार केलाय कधी ? नाही , तर मग बघा …

इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण व्याजासाठी तब्बल ५६ लाख ८९ हजार रुपये बँकेला देतोय.

बँकेला जाणारे व्याज..

ही खूपच मोठी रक्कम आहे. त्यामुळे ही रक्कम आपण एखद्या दुसऱ्या पद्घतीने परत मिळवू शकू का…तर नक्कीच..

चला मग बघुया ती पद्धत..

वर इमेज मध्ये दाखवल्या प्रमाने कर्जाचा हप्ता(emi) येतोय २४ हजार रुपये. आता आपल्याला साधे एकच करायचे ते म्हणजे ह्या emi रकमेचा १०% रक्कम म्हणजे २४०० ची mutual फंड मध्ये एसआयपी पद्धतीने दरमहा गुंतवायचे. हे असेच दरमहा जोपर्यंत कर्ज आहे तोपर्यंत करायचे. जसे मी मागच्या लेखामध्ये सांगितले होते की दीर्घकालीन गुंतवणूक असेल तर एसआयपी चांगले return देऊ शकतात(१२ ते १८%).

तर आता आपण पाहूया की जर आपण हे जास्तीचे २४०० रुपये ३० वर्षासाठी एसआयपी मध्ये गुंतवले तर किती रक्कम होऊ शकते…

एसआयपी मधून मिळू शकणारी रक्कम…

तर ही रक्कम आहे तब्बल ८४ लाख. यात आपली गुंतवलेले रक्कम ८.६४ लाख सोडले तरी होणारा नफा आहे ७६ लाख.

अगोदरच्या इमेज मध्ये बघितले होते की आपण बँकेला व्याज देतोय ५६ लाख, पण फक्त थोडे पैसे अतिरिक्त पणे एसआयपी मध्ये गुंतवले तर आपण कमवतोय ७६ लाख. म्हणजेच जाणारे व्याज वाजा केले तरी उरतात २० लाख.

यासाठी तुम्हाला संयम आणि शिस्त ह्या गोष्टीची गरज लागेल. कारण तुम्हाला एसआयपी ३० वर्षे चालू ठेवायची आहे. चला तर मग वापरा ही स्मार्ट पद्धत आणि करा तुमचे गृहकर्ज परवडण्यासारखे…

लेख कसा वाटला हे जरी कळवा ([email protected]).

टीप: मी नोंदणीकृत फिणान्सिअल advisor नाहीये. Mutual फंड मध्ये गुंतवणुकीसाठी आपण आपल्या advisor शी बोलू शकता.

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा