#गैरसमज…(अंतिम)

Written by

©️ सौ.योगिता विजय टवलारे ✍️

साहिलच्या बहिणीला( आशा) काही सुचतच नव्हते.. आशा साहिल पेक्षा मोठी …साहजिकच आई बाबांना त्या क्षणाला तिचा एकटीचाच आधार होता..तीही हताश आणि घाबरलेली..पण आई बाबांना ती तसे जाणवू द्यायची नाही …? खरंतर तिला खूप रडावसं वाटतं होत पण स्वतः ला तिने सावरलं…

दुपारी बळजबरी आई बाबांना जेवायला वाढून ती साहिलच्या रूम मध्ये गेली…रूम अगदी नेहमीसारखीच नीटनेटकी होती…अचानक तिला काय वाटल कुणास ठाऊक?? ती काहीतरी शोधायला लागली..तिला आठवलं ,साहिल वाईट आणि चांगल्या गोष्टींची नोंद त्याच्या पर्सनल डायरी मध्ये करायचा…☺️

तिने खूप शोधल्यांनतर अखेर तिच्या हाताला डायरी लागली..काहीशा उत्सुकतेने , काहीशा भीतीने तिने डायरी उघडली…त्यात बऱ्याच गोष्टींची नोंद होती..पण तिने त्याच्या साखरपुड्याची तारीख सर्वात आधी चेक केली..(कारण तेव्हापासूनच त्याच्या वागण्यात बदल झाला होता…)त्यावर लिहिलं होत …..✍️

? आज माझा साखरपुडा झाला..आई बाबा, ताई सगळेच खूप खुष होते…आणि मी सुद्धा!! पण का कुणास ठाऊक?? मालन मला शांत शांत वाटत होती… तिच्या मनात नेमके काय चालू असेल?? मला माहित नाही…पण मनात कुठेतरी जाणवतं…तिला मी पसंत नाहीये…आता मी काय करायला हवय?? काहीच सुचत नाहीये…?

पुढच्या काही पानांवर त्याच्या ऑफिसच्या काही महत्वाच्या नोंद केलेल्या होत्या…मग एक पान सोडून लिहिलं होत….✍️

?आज साखरपूड्याच्या चार दिवसानंतर पहिल्यांदा मालनचा msg आला..मला छानच वाटल…मी कमी बोलत असलो तरीही तिने माझ्याशी बोलायला हरकत नाही…पण….प्रेमाचे दोन शब्द बोलायचे सोडून थेट संशयाचा किडा माझावर सोडून मला गोंधळून सोडलय…??मला msg वर म्हणाली ” साखर – पुड्याच्या दिवशी माझ्या मैत्रिणींबरोबर इतकं close वागायची आणि इतक्या जवळ उभे राहून फोटो काढायची काय गरज होती…?

मी त्यावर काहीच rpl दिला नाही..पण डोक्यात खूप विचार चालू आहेत…माझी निवड चुकली तर नाही ना?? मी आधीपासूनच मुलींपासून लांबच राहिलो ..त्यांच्याशी कस वागायचं?? कस बोलायचं ? मला नाही कळत ..? आशा ताई सोडली तर मला एकही मैत्रीण नाही ..तीच बहीण आणि तीच एक मैत्रीण! मग मालनने माझ्या बद्दल असा विचार का करावा?? मी इतकं close नव्हतोच तिच्या मैत्रिणींशी! मग हीच्या डोक्यात असा विचार आलाच कसा?? म्हणूनच साखरपुड्याला ती मला शांत वाटली…तर हे कारण होत तीच शांत असण्याच! ?

पुढच्या काही पानांवर काही किरकोळ नोंद होत्या..एक , दोन पानं सोडल्यावर लिहिलं होत..✍️

? वेळे अभावी लिहू शकलो नाही.. काल मी पहिल्यांदा मालनला भेटलो..☺️ तशी माझी भेटायची इच्छाच नव्हती.. तिच्या संशयी स्वभावामुळे मला बोलावस सुद्धा वाटत नाहीये..मग भेटणं तर दूरच… काल पहाटे तिचा फोन आला तेव्हा ती परत परत तोच एक विषय घेऊन बसलेली…म्हणाली, ” तुझ अफेअर असेल तर तसं सांग?

हा काय प्रश्न झाला?? इतकंच होत तर मग लग्न जुळायच्या आधी तिने मला विचारायला हवा होतं..पण आता मनात येत की लग्ना आधी जरी विचारलं असत आणि मी तिला सांगितल असतं की “माझा आयुष्यात तुझाशिवाय कुणीच नाही ” तरीही तीच आताच वागणं लक्षात घेऊन तिने माझावर विश्वास ठेवला नसताच…

काल भेटलो तेव्हा ती दोन शब्द प्रेमाचे, भविष्या बद्दल , दोघांचा फॅमिली बद्दल बोलायचं सोडून सतत माझं अफेअर आहे का? विचारत होती..मी तिच्याशी काहीही न बोलता तसचं निघून आलो… मालन दिसते तशी मुळीच नाही.. आणि उगाच ताईसमोर स्पेसच्या बाता करते.. ती नेहमीच माझ्या घरचांसमोर चांगुलपणाचा आव आणते..?ह्यातल माझ्या किंवा तिच्या घरच्यांना काहीच माहीत नाही..

आणि म्हणूनच माझी खूप घुसमट होतेय..मी जर हे घरच्यांना सांगितल तर तेही मला हेच म्हणतील की लग्ना नंतर सर्व ठीक होईल! पण मला माहित आहे, एकदा का संशयाचा किडा डोक्यात गेल्यानंतर त्यातून निघण्याचा कुठलाही मार्ग नाही..? आता साखरपुडा तुटला तर चालेल पण लग्नानंतर आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नकोय..आणि म्हणूनच मी एक दिवस घरातून निघून जाणार आहे…?कुठे जाईल?? माहित नाही…पण काही दिवस एकांतात राहून परत येईल…नव्याने आयुष्य जगण्यासाठी…

आशाने डायरी वाचूून बंद केेली.. तिच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तिला मिळाली होती… तिच्या मनातलं वादळ शमलं होत..काहीतरी मनाचा निश्चय करूनच ती रूमचा बाहेर आली…संध्याकाळ झालेली..तिने देवा जवळ दिवा लावला…तोपर्यंत मालन आणि तिचे आईवडील सुद्धा आले होते…? मालन काही विचारणारच काय?? तर आशाने तिच्या हातात डायरी ठेवली…आणि म्हणाली, ” काहीही झालं तरी मी माझ्या भावाच्या मनाविरुध्द काहीच होऊ देणार नाही!! ? मालन कितीतरी वेळ आशा आणि डायरी कडे बघत राहिली…..लग्न एकदाचं होत…आणि एकदाचं आयुष्य मिळत…साहिलने लोकांचा आणि घरच्यांचा विचार करून लग्न केले असते तर कदाचित त्याच्या बरोबर घरचे सुद्धा सुखाने राहू नसते शकले …त्याला जर त्रास झाला असता तर निश्चितच घरच्यांना त्रास झाला असता..तो आनंदी तर घरचे आनंदी!! बरोबर न?? तसेच, आपले आहे…☺️ बरेच मुलं, मुली त्यांच्या मनात नसतांना केवळ आई वडिलांच्या इच्छेखातर लग्न करतात… मला असे म्हणायचे नाहीये की घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करावं!

मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की लग्नासारखा निर्णय खूप विचापूर्वक घ्यावा..ज्यात सर्वांची आवड आणि इच्छे बरोबरच आपली सुद्धा इच्छा असावी!! तरच संसार सुखाचा होतो..इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपला श्वास गुदमरत तर नाही ना?? हे आधी लक्षात घ्यायचे..

काही दिवसांनी साहिल परत येतो..लग्न तुटतं तेव्हा मुली बरोबरच मुलाची सुध्दा बदनामी होते..साहिलने मालनची बदनामी होऊ दिली नाही ..त्याने स्वतः ला बदनाम करून घेतले…मुलापेक्षा मुलीला खूप सहन करावं लागत …

आपण मात्र नेहमीच, सत्य काय आहे?? हे जाणून न घेता फक्त एकट्या मुलीची बदनामी करतो .. मुलीचाच दोष असेल असा ” गैरसमज” करून घेतो…कधी कधी दोघांचा, कधी फक्त मुलाचा तर कधी मुलीचा दोष असतो..पण आपण फक्त मुलीकडे बोट दाखवतो…?इथे मालन जरी चुकली तरी साहिलपेक्षा तिची जास्त बदनामी होणार होती…पण मुलं सुद्धा चुकतात बरं का??? हे पण लक्षात असू द्यात…?

  • तुम्हाला माझी कथा कशी वाटली?? नक्की कळवा…आणि सोबतच शेअर करा पण माझ्या नावासकट…

वाचक माझ्या मताशी सहमत असायलाच हवे, ही माझी मुळीच अपेक्षा नाही.. चांगल्या बरोबरच मी वाईट कमेंट्स चे आनंदाने स्वागत करेल..

? योगिता विजय?

१२/६/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत