गैरसमज …(भाग एक)

Written by

©️ सौ. योगिता विजय टवलारे ✍️

आज २ महिने झालेत.. साहिल शांत शांतच होता..🤐ना स्वतः कडे लक्ष ,ना घरात! जेवणही एक वेळेसच करायचा..त्याच्यातला हा बदल घरच्यांचा लक्षात येऊ लागला होता..घरचे खूप काळजीत होते..आई आणि बाबा दोघेही त्यांच्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करायचे.😒

पण तो बोलायला सुद्धा तयार नसायचा! असं काय झाल की तो एकदम अबोल होऊन गेला? दोन महिन्या आधी त्याच लग्न ठरलं होत..त्याची पसंती विचारूनच मुलीला होकार कळवला ..साखरपुडा झाला त्यादिवशी तो खूप आनंदात होता..पण हल्ली त्याचं काहीतरी बिनसलं होत…

त्याच्या मनात दुसरी कुणी तर नसेल? नेमकं त्याच्या मनात काय चालू असेल? कळायला मार्गच उरला नव्हता..🤔 त्याची गाडी कुठेतरी भरकटली होती जी रुळावरून चालायला तयार नव्हती.. त्याच्या आई बाबांना वाटायचं ,लग्नानंतर होईल हळु हळू सगळं नीट..🤷( प्रत्येक आई – वडिलांचा गैरसमज!मुलगा असो वा मुलगी! लग्नानंतर सगळ चांगलं होईल..पण असं होत का खरंच?? मला न उलगडलेलं कोडं..कुणाला सोडवता आल तर नक्की मला कळवा, मी वाट पाहील..🙃)

इकडे मुलीकडे म्हणजेच मालन कडे आणि साहिल कडे सुद्धा लग्नाची जय्यत तयारी सुरू होती …२५ दिवसांवर लग्न येऊ घातलं! पण साहीलमधे बदलण्याचे कुठलेच चिन्ह दिसत नव्हते..ह्या काळात मालन त्याच्या घरच्यांशी बोलायची, दोन तीनदा घरी सुद्धा येऊन गेली ..ती जेव्हाही घरी येऊन जायची तेव्हा तीच्याशी बोलायचं तर दूरचं, पण साधं पहायचा सुद्धा नाही! ती निघून गेल्यावर साहिल आणखी चीड चीड करायचा..आई बाबांशी अबोला धरायचा.. 🤦तिला वाईट वाटायचं.. त्याच्या मनाविरुध्द तर हे लग्न होत नाहीये?? हा विचार बऱ्याचदा तिच्या मनात येऊन जायचा..

पण तीही हाच विचार करायची ,त्याला त्याची स्पेस मिळायला हवी..आपण घाई करायला नको..होईल सगळ नीट! तो तिच्याशी फोनवर पण नाही बोलायचा ..😳(आता लग्न ठरल्यावर मुल/मुली फोन वर बोलतातच! बोलत नसेल तर नवलच ..पण साहिल सारखे अपवाद पण असतात..) कधी कधी त्याचं वागणं तिला असह्य व्हायचं ..तेव्हा साहिलच्या बहिणीकडे ती मन मोकळ करायची..

त्याची बहीण तिला म्हणायची, तो आधीपासूनच कमी बोलतो..पण मनाने मात्र प्रेमळ..कुणाचं मन दुखावणार नाही..तुला खूप सुखी ठेवेल तो..😄साहिल होताच तसा! सगळ्यांचा लाडका! आई बाबांचा इच्छे विरुद्ध न जाणारा,सगळ्यांचे मन जपणारा … आता त्याच्यात झालेले बदल वगळता त्याच्यात कसलीच उणीव नव्हती..😇 पण आताच वागणं मात्र…..

(साहिलच्या आयुष्यात असं काय घडलं की तो इतका बदलला?? त्याच्या मनाचा तळ कुणाला गाठता येईल का?? हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढचा भागात! 🙏)

# कथा काल्पनिक असून, ह्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही..असल्यास केवळ योगायोग समजावा..तसेच  माझ्या लिखाणास वाचक सहमत असायलाच हवेत, ही माझी मुळीच अपेक्षा नाही..      

आवडल्यास मला आनंदच होईल आणि नाही आवडले  तर खूप जास्त आनंद होईल कारण माझ्या चुका लक्षात घेऊन मी नव्याने लिखाणास सज्ज होईल..🙂🙂

टिपः माझ्या नावासकट शेअर करा..तसे न आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

💝 योगिता विजय💝

११/६/१९

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत