गैरसमजं…(भाग दोन)

Written by

#गैरसमजं_भाग_दोन….

©️सौ.योगिता विजय टवलारे ✍️

पण ……. साहीलच, आताच वागणं मात्र त्याच्या स्वभावा विरुद्ध होत.. त्याच्यामुळे कुणाला त्रास होता कामा नये ,ह्याची तो पुरेपूर काळजी घ्यायचा!🙂त्याचा हाच सर्वात मोठा plus point! आता मात्र ह्या वेळेत त्याला कुणाशीच काही घेण देणं नव्हतं…पण ….       त्याच मन त्याला खात होत..तो आतल्या आत आणखी बंदिस्त होत चालला होता…त्याला कळत होत की ,आपल्या अशा वागण्याने घरच्यांना त्रास होतोय …☹️

पण तरीही त्याची कळी खुलायला तयारच नव्हती…अशातच तो घरून निघून गेला..कुठे गेला? कसा गेला?? कुणालाच माहीत नाही! त्याचा मोबाईलही स्वीच ऑफ! आता काय करू? काय नको? असच काहीसं झालं होत त्याचा घरच्यांना!😒😒

घरच्यांच्या  मनात नको ते विचार यायला लागलेत. .त्यानं काही जिवाचं बरं वाईट केल तर? आपण कुठे कमी पडलो? त्याने अस का वागावं??  पोलिस कंप्लेंट करावी का??  अख्खी    रात्र उलटून गेली विचार करण्यात! ह्या आधी साहिल अस कधीच वागला नव्हता…त्याला थोडा जरी उशीर झाला तरी तो घरी फोन करून सांगायचा…शिस्तीचा पक्का! आणि म्हणूनच घरच्यांची काळजी वाढतच चालली होती…😒

नातेवाईकांना फोन करून विचारलं, त्याच्या अवघ्या मित्रांना विचारलं ,तरी त्याचा काही पत्ता लागत नव्हता…तो बेपत्ता होता ती काळजी तर होतीच ,पण  त्याच बरोबर त्याच्या घरच्यांना एक वेगळाच प्रश्न पडला…. हे सगळं मालन आणि तिच्या घरच्यांना कळल तर?? त्यांना काय उत्तर द्यायचं??  साहिल चा काळजीने ते मालनला पार विसरून गेले..

😒आता साहिल बरोबरच ,मालनच्या    काळजीने ते अस्वस्थ व्हायला लागले…गेले कित्येक दिवस साहीलच्या वागण्याचा ते विचार करत होते…अशी एखादी गोष्ट असेल ज्यामुळे त्याच्या मनातलं आपल्याला कळेल म्हणून त्याचे बाबा प्रत्येक दिवसाचा, त्याचा वागण्याचा आढावा घेत होते….पण त्यांच्या  हाताला मात्र काहीच लागत नव्हतं!!!😒

अशातच, साहिलच्या बहिणीला मालनचा फोन आला…( त्याच्या बहिणीला जसं कळलं की साहिल घरातून निघून गेलाय..तशीच ती माहेरी      आली…🙂 दोघच बहीण भाऊ!! साहिल त्याच्या ताईला सगळचं सांगायचा! बहीण  –   भावापेक्षा बेस्ट फ्रेंड जास्त…पण आताशी त्याच्या स्वभावातला बदल बघता तिला वाटू लागलं होत की  नक्कीच त्याच्या मनात मोठं वादळ उठलय. आता पर्यंत तिच्याकडे मन मोकळ करायला त्याने इतका वेळ घेतलाच नसता…एक दिवस उलटून गेलाय आणि साहिल अजून कसा परतला नाही म्हणून दुसऱ्याच दिवशी पहिली बस पकडून ती माहेरी आली…)

मालनने फोन वर नेहमी प्रमाणे घरच्यांची , साहिलची चौकशी केली…साहिलची बहिण अगदी नॉर्मल होऊन बोलायचा प्रयत्न करत होती..पण का ? कुणास ठाऊक ?? मालानला कळायला वेळ लागला नाही…😒काहीतरी झालाय हे तिने लागलीच हेरल…आणि मग ती सुद्धा साहिलच्या घरी यायला निघते…   
 

#कथा_काल्पनिक_असून_ह्याचा_वास्तविक_जीवनाशी_काहीहीसंबंध_नाही…कथा आवडल्यास नक्की (माझ्या नावासकट) शेअर करा, नाही आवडली तरीही कळवा..

मी नक्की माझ्या लिखाणात सुधारणा करेल…🙂आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे…😊

💝 योगिता विजय 💝

१२/६/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत