#गोष्टी#बालकथा#लहान मुलांच्या गोष्टी

Written by

मुलांची युक्ती

आमचा चिन्मय….आम्हीं सर्व लाडाने त्याला चिनू म्हणतो,कारण तो आहेच तसा,जसा काही चिनीच…बसक नाक, चिंगरे चिंगरे डोळे, गोरा गोरा रंग, भुरे भुरे केस….
तर अस हा आमचा चिनू अभ्यासात खूपच हुशार, सर्वच बाबतीत नंबर वन👍….. पण सर्वच बाबतीत हुशार असलं तरी काही अवगुण सुद्धा असतातच. सर्वगुण संपन्न व्हायला आपल्यातल्या काही अवगुणांवर मात करावी लागते.
असो…. तर आमचा चिनू ना खोड्या काढण्यात खूपच बंड.
खोड्या काढायच्या पण “मी तो नव्हेच” असा आव दाखवून बाजूला व्हायचं. अस अनेकदा व्हायचं , खोड्या तो करायचा पण मार मात्र दुसऱ्याला…
पण असं कधीपर्यंत चालणार ना. कधी न कधीतरी तर खरं समोर येणारच.
सर्व मुलांनी त्याला अद्दल घडवायचं ठरवलं, कारण सर्वच मुलं खुप त्रासली होती त्याच्या खोडकरपणा मुळे….वर्गात हुशार त्यामुळे सर सुद्धा त्याला रागवत नसत.
आज मात्र मुलांनी योजना आखली, काहीही असो, आज मात्र परदा फॅश करायचंच!
सर वर्गात यायच्या आधी सर्व मुलं कलासच्या बाहेर गेली,
चिनूला वाटलं अरे वा! आज तर छान संधी मिळालीय, त्याने काय केलं, काही मुलांच्या बॅगमधून डबे काढले, तर काहींच्या बॅगमधुन पुस्तक काढली, काहींच्या बुक्स ची पाण सुद्धा फाडली….😡
आणि आपल्या जागेवर जाऊन बसला, नेहमीसारखा “तो मी नव्हेच” आपलं पुस्तक काढून वाचत बसला .
पण यावेळेस मात्र मुलं सजग होती, त्यांनी काय केलं महिताय, त्यांनी ना मोबाइल मध्ये चित्रीकरण केलं….
यापेक्षा चांगला प्रूफ कोणता?
(शाळेत मोबाईल नेणं हे चुकीचं,पण खऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी हे आवश्यक होतं)
सर वर्गात आले, मुलांनी नेहमीप्रमाणे complaint केली, चिनूच नाव सुद्धा सांगितलं, पण चिनू मात्र नेहमीप्रमाणे “तो मी नव्हेच” असा
आव आणून तयार…
शेवटी मुलांनी चित्रीकरण सरांना दाखवलं.सरांनी चिनूला विचारलं, त्याने कबूल केलं, हो सर,” मीच तो”
त्याच्या आईवडिलांना शाळेत बोलावलं, सगळं सांगितलं.
त्याच्या आईबाबांनी त्याला सर्व मुलांसमोर माफी मागायला लावली.आता यापुढे मी असं वागणार नाहीं, उलट सर्वांना मदत करीन.
खरच त्या दिवसापांसून चिनू खूप सुधारला, आता तो सर्वांना अभ्यासात मदत करतो.
( बरेचदा आपण बघतो, मुलं खोड्या करतात, लहान आहे म्हणून दुर्लक्ष करतो, पण कधी कधी हेच दुर्लक्ष पुढे जाउन खूप मोठं कारण बनू शकतं )
आपल्या पाल्यांच्या चुकांवर विरजण न घालता , लगेच त्याला समजवण्याचा प्रयत्न करा, हे बालसुलभ वय अस असत, आपण जसे संस्कार देऊ तसंच ते घडतात.

लता राठी
अर्जुनी /मोरगाव

माझ्या कथेला like, comments करा, मला follwo करण्यासाठी माझे लेख वाचत रहा. 🙂
वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व लेखिकेकडे हक्क राखीव🙏

Article Categories:
शिक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा