गोष्ट तिची अन त्याची…….

Written by

ती आणि तो… दोघेही शिकत होते होते…

घरातल्या जबाबदारीमुळे त्याने कॉलेज सुरू असतानाच काम शोधायला सुरुवात केली…

तिनेही योगायोगाने त्याच्याच ऑफिस मध्ये काम करायला सुरुवात केली…

ती एकुलती एक होती… तो मोठ्या कुटुंबातून आलेला….

तो जेवढा अबोल… तेवढीच ती बडबडी… तो अगदी वेळ पाळणारा.. ती कितीही वेळेत आवरायचं ठरवलं तरीही ऐन वेळी गडबडणारी…

तो धीरगंभीर, विचारपूर्वक बोलणारा… ती हसरी.. मनात काहीही न ठेवता लगेच बोलणारीही..

त्याला एकांत प्रिय.. तिला अवतीभवती माणसं लागत…

असे ते दोघे एकमेकांच्या एकदम विरुद्ध… पण म्हणतात ना “opposite attracts”, तसंच काहीसं झालं त्यांचं..

आणि एवढं सगळं वेगळं असूनही ते एकमेकांना आवडू लागले..

दोघांचेही शिक्षण पूर्ण झालं.. आणि जेव्हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा दोघेही आनंदाने एकमेकांना जोडीदाराच्या रूपात स्वीकारायला तयार झाले…

गावांत एक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर होते… तिथे जाऊन दोघांनीही त्यांच्या लग्नासाठी साकडं घातलं…

दोन्ही घरून लग्नाला सक्त विरोध होता.. मात्र दोघांचाही एकमेकांशी लग्न करण्याचा निश्चय ठाम होता..

लग्न करताना ते घरातून पळून जाऊन नाही तर घरच्यांना विश्वासात घेऊनच करायचे अशी maturity असल्याने दोघेही घरच्यांच्या संमतीची वाट पाहात थांबले आणि मगच लग्न केले…

लग्न झाले… संसार सुरू झाला… सुरवातीचे काही दिवस खूप आनंदात गेले.. थोड्याच दिवसात त्यांना एक गोंडस मुलगा झाला.. बाळाच्या संगोपनात तिचा वेळ कसा जातं असे तिचं तिलाच समजत नव्हते..

आता तिचं स्वतःकडे अजिबात लक्ष नव्हते.. बाळं आणि बाळच जणू तिचे विश्व झाले होते.. तिने स्वतःच बाळासाठी घरी राहण्याचा निर्णय घेतला…

लग्नानंतर तिचं माहेरी जाणं खूप क्वचित होऊ लागले…

मात्र जसे जसे दिवस जाऊ लागले…

तसं तसं आधीच सर्व बदलू लागले…

तिचा बोलकेपणा जो त्याला आधी आवडत होता ती त्याला आता कटकट वाटू लागली.. तिच्या भाबडेपणावर आता बावळटपणाचे शिक्कामोर्तब झाले…

खरंच दिवस पूर्ण बदलले होते.

त्याच्या वागण्यातला हा बदल तिलाही जाणवत होता.. पण आपलंच चुकत असेल असं म्हणून ती दुर्लक्ष करत होती….

एक दिवस बाळाने रात्री खूप जागवल्याने ती खूप थकल्यासारखी झाली होती…. दिवसभरही बाळ सारखं रडत होते..

ती बाळाला घेऊन फिरतच होती..आणि तो घरी आला..

घरात सर्व पसारा पडलेला होता…. त्याने तो पसारा पाहिला.. आणि ” काय करतेस गं तू दिवसभर.. साधं घरंही आवरलेलं नाही अजून.. “?

त्याचं हे असं बोलणं ऐकून तीही चिडली.. शब्दाने शब्द वाढत गेला.. “तुझी लायकी तरी आहे का माझ्यासोबत राहायची..” तो बोलला..

आणि धाडकन दार आदळून निघून गेला… ती त्या आवाजाने भानावर आली.. आणि तिने ठरवले आज माहेरी जायचं.. आता इथे एक क्षणही थांबायचं नाही ..

मनातल्या सगळ्या भावना डोळे भरून वाहत होत्या.. अगदी पहिल्या भेटीपासून आत्ता पर्यंतचा सर्व प्रवास डोळ्यासमोरून गेला…

काहीही झालं तरी आता परत जायचं नाही… तिने मनाशी खूणगाठ बांधली…

ती आईच्या घरी पोहचली तेव्हा बरीच रात्र झाली होती..

खूप दिवसांनी तिने आईच्या हातचं जेवण केलं आणि बाळाला कुशीत घेऊन आईशी गप्पा मारता मारता कधी झोप लागली तिचे तिलाच कळलं नाही…

Roca Roca Roca
इकडे तो घरी आला.. त्याने रोजच्या सवयीप्रमाणे दार वाजवलं पण दाराला कुलूप…

“कुठे गेली असेल ही ?” तो स्वतःशीचं बोलला आणि त्याच्या जवळच्या चावीने कुलूप उघडून तो घरात गेला…

रिकामं रिकामं घर पाहून त्याला खूप कसतरी झालं..

आधी त्याने तिच्या मोबाईलवर कॉल केला.. तेव्हा तिच्या आईने तो उचलून ती घरी पोहचल्याचे सांगितले…

ती घरी नसताना वाटणारं रिकामं घर, बाळाच्या आवाजाशिवाय त्याला घरं जणू अंगावर येतंय असं वाटू लागलं ..

त्याने टी. व्ही लावला.. इतक्या शांतपणे टी. व्ही त्याला कधीचं पाहता यायचा नाही.. उलट टी. व्ही पाहता येतं नाही म्हणून कधीतरी भांडणही व्हायची.. पण आत्ताची ही शांतता त्याला अगदी नकोशी झाली..

टी. व्ही बंद करून तो झोपायला गेला… आणि ती जवळ नसताना तिचं त्याच्या सोबत असणं किती महत्वाचं आहे हे त्याला जाणवलं… खरंच रागाच्या भरात आपण तिला खूपच टाकून बोललो हेही त्याला realize झालं.. खूप मोठी चूक झाली आपली..

ती नाही बाळ नाही तर हे आपलं घर नाही.. आणि आपल्या या घरट्यात घरपणं नाही…. त्याला अजिबात करमेना… कितीही झोपायचा प्रयन्त केला तरी झोपही येईना…

तो तडक तिला घेण्यासाठी निघाला…

ती सकाळी उठली.. तिला उठल्या उठल्या आपल्या घराची आठवण झाली… “काय करत असेल तो? उठला असेल का? रोज alarm बंद करुन परत झोपतो.. आज कसा उठेल कोणास ठाउक”; इतकं सगळं होऊनही मला त्याचीच आठवण येतीये..

मनातले विचार बदलण्यासाठी ती बाहेर गेली…

फेरफटका मारायला म्हणून ती परसातल्या बागेत आली.. तिला आज स्वतः मधला बदल प्रकर्षाने जाणवत होता..

तिने कित्येक दिवसात निवांत पुस्तक वाचले नव्हते.. ना सलग तीन तास बसून एखादा picture पाहिला नव्हता.. बाळ लहान असल्यामुळे तिचे घराबाहेर पडणं पूर्णपणे बंद झालं होतं… सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिचं चक्र घडयाळाच्या काट्यावरच चाललं होत…

आणि त्या मध्ये तिला स्वतःसाठी वेळचं नव्हता….

आणि मनासारखं न जगता आल्यामुळे आपोआपच तिची चिडचिड होऊ लागली….

खरंच दिवसातला थोडा तरी वेळ माझा माझ्यासाठी पाहिजेच…

आधीची मनसोक्त, स्वछंदी जगणारी ती आणी आजची ती यात खूप फरक पडला होता.. जो आजपर्यंत तिनेही notice केला नव्हता..

तेवढ्यात गेट वाजलं तिने पाहिलं तर तो येताना दिसला…

तिला समोर बघताक्षणी त्याने तिला सॉरी म्हटले…माझं खूप चुकलं गं… मी तूला गृहीत धरलं… Please मला माफ कर …. आणि चल आपल्या घरी… तो म्हणाला…

ती म्हणाली “घरी येईन, पण एका अटीवर “….

“ती कोणती “; त्याने विचारलं… ती घरी परत येण्यासाठी काही अट वैगरे घालेल हे त्याच्यासाठी खरंच नवीन होतं…

ती म्हणाली ” लग्न झाल्यानंतर तुझं आयुष्य आधी होतं तसंच राहिलं रे.. पण माझं मात्र पूर्णपणे बदलून गेलं… माझा माझ्यासाठी असा वेळचं राहिला नाही…मला माझा वेळ पाहिजे … मी तूला जशी space देते.. तुझी space जपते.. तशीच तूही जपावी…

आणि सगळ्यात महत्वाचे मलाही कंटाळा येऊ शकतो ; माझंही कधी चुकू शकतं .. मला समजून घे तेव्हा… सर्वांच्या कायम पुढे पुढे करून मलाही कधीतरी थकायला होतं रे “हे तू पण लक्षात ठेव…

सगळ्या अपेक्षा फक्त माझ्याकडूनच नको ना रे ठेवू… की त्या अपेक्षांचं मला ओझ वाटायला लागेल…. माझी खूप घुसमट होते रे…. “

हे तिचं बोलणं ऐकून तोही विचारात पडला… आणि त्याला realize झालं की सध्या तो तिच्याशी typical नवऱ्यासारखा वागत होता…

तो तरी घराबाहेर पडायचा, चारचौघात मिसळायचा, ती मात्र दिवसभर घरीच असायची… परत संध्याकाळी घरी आल्यानंतर तिनेच आपल्या पुढे पुढे करावं… हीच आपली अपेक्षा… काय करतेस गं तू दिवसभर… घरीच तर असते…

हे वाक्य आपणच तिला कित्येकदा बोललो आहे…

“खरंच माझं चुकलं गं.. प्लीज मला माफ कर.. “

त्याने तिचा हातात हात घेतला… आणि दोघेही खूप दिवसानंतर रिलॅक्स झाले…. आता ओढ लागली होती परत घरी परतण्याची…..

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत