घायाळ मी हरिणी…सख्या रे

Written by

घायाळ मी हरिणी… सख्या रे

सगळं जसं तुला हवं तसं खरेदी कर म्हणत त्याने तिला मुभा दिलेली….. Hotel मध्ये दुपारचं जेवण उरकून … बाईकच्या शोरूममध्ये पोचले दोघे… मंदिरात जाऊन दर्शन आणि बाईकची पुजा….. बाईकवरून रपेट… तिचं त्याला बिलगून बसणं आणि टीशर्टची कॉलर हलकीच खाली ओढून त्याच्या मानेवर ओठ टेकवणं … त्याचं तिच्या मांड्यावरुन हात फिरवणं… मध्येच हात मागे नेऊन साडी आणि ब्लाऊजमधील मोकळ्या जागेत वसलेल्या पोटाला गुदगुल्या करणे इत्यादी सगळं चाललेलं…..नवीन शहरात नवीन घरी नवीन बाईकचं आगमन…

PSI प्रणव मराठे … नुकतीच ठाणे पोलिस स्टेशनला बदली झालेली… पोलिस क्वार्टरससाठी अर्ज केलेला…. महिन्याभरात मिळेल घर… तोपर्यंत ठाण्याच्या बी केबिनमध्ये नातेवाईकांच्या जुन्या चाळीतील दोन रुमच्या घरात संसार मांडलेला… एका चाळीच्या जागेवर बिल्डींग झालीय… ही चाळसुध्दा तोडतील आता सहा महिन्यांनी….

चार दिवस झाले. प्रवासाचा ताण. सामानाची मांडामांड… सगळ्याचा क्षीण आलेला… पोलीस स्टेशनला वर्दी देऊन चार दिवस भरल्यानंतर आज सुट्टी घेतलीय प्रणवने… पुर्ण दिवसाचं प्लॅनिंग करून…

प्रिया आज खुप खुश आहे… या घरात फक्त ते दोघंच राजाराणी… त्याने लग्नाच्या वाढदिवसाला घेतलेली साडी नेसून, पुरेशी तयारी करून, चार वेळा आरशात पाहत सुंदर दिसत असल्याची खात्री करून घेऊन ती आज प्रणवसोबत फिरतेयं…तो ही खुश…

बाईक चाळीच्या लाकडी दरवाज्यापाशी पार्क करून दोघे घरी पोचले…. संध्याकाळचे चार वाजलेले… प्रिया फ्रेश होऊन सोफ्यावर बसली….. प्रणव ही फ्रेश झालेला… कमरेला टॉवेल गुंडाळून आरशासमोर केस विंचरत उभा… व्यायामाने कमावलेली पीळदार शरीरयष्टी, आजचा दिवसभराचा सहवास… मनात दाटलेलं प्रेम… प्रियाने उठून त्याला पाठीमागून मिठी मारली…

” Madam जी , क्या खयाल है..!!” त्याने आरशात पाहत हसत विचारलं..
” बड़े ही नेक खयाल है , साहबजी..!!” म्हणत तिनेही पाठीमागून आरशात पाहत हसत हसत डोळा मारला..
” ऐसा लगता तो नहीं… !! ” म्हणत तिच्या हाताला धरून पुढे ओढलं…
” छान दिसतेस की या साडीत..” म्हणत चेहरा हातात धरून कपाळावर ओठ टेकवले…

बाहेर अवकाळी आणि आत प्रेमाचा पाऊस…..रंगंलेले क्षण… मिलनाची आतुरता पराकोटीला …. ‘कारभारी दमानं’ गाणं मनात वाजलेलं… Precautions, position, permission All set with bed corner… & गडबड…

जोरात रिंगलेला फोन… त्याचं चटकन बाजूला होणं… न मोडताच पाठीची विसावलेली कमान… घायाळ मी हरीणीचे भाव डोळ्यात…

अर्जंट पोलिस ठाण्यात बोलावलेलं… देशभक्त निघण्याच्या तयारीत… तिनेही आवरायला घेतलेलं.. बाय करून तो निघाला…

” Hallo !! बाबा मी प्रिया बोलतेयं… ”
” —— ”
” बघा ना, आज प्रणवला बरं नाहीयं. उन्हात फिरलोय त्याचा त्रास झाला… झोपलाच होता.. पण पोलिस स्टेशनमध्ये बोलावलं आणि उठून गेलाय दुखऱ्या डोक्यांने..”
” ——”
“बघा न बाबा जरा… अगदीच त्याची गरज असेल तर ठीक आहे… पण त्याच्यामुळे काही अडणार नसेल तर थोडा आराम केला असता ना.. माझं नाव नका सांगू प्लीज…..”

” ——–”

मध्ये पाच मिनिटे प्रिया होल्डवर…

” थँक्यु सो मच बाबा… लव यु..!” फोन कट्

तिने धावतच लाकडी गेट गाठलं… घाईगडबडीत अर्धा पदर तसाच सोडलाय हातावर… बाहेर वाकून पाहिलं.. प्रणव बाईकची चावी बोटात फिरवत शिट्टी वाजवत… गेटकडे येतोय… फोटोत दाखवल्याप्रमाणे ती तिरक्या नजरेने त्याला पाहत उभी आहे… तो जवळजवळ येतोय… तशी ती सावध झाली आणि तो पोचलाच..

आता ती त्याला ” ~भॉ ~” करेलं आणि मी तुम्हांला..

का म्हणून काय विचारता राव… इथपर्यंत जगलात ना कथा माझ्या लेखणीतून…. मग…?? आता तर तो घरी आलाय… तेव्हा करा शेवट कथेचा तुम्हाला हवा तसा तुमच्या मनाने.. गालातल्या गालात हसत…हा हा हा…

वाचकहो वरील फोटोवरून लिहा सांगितलं आणि मी लिहिलं… आवडलं असेल तर नक्की वर हिरवा ठेंगा दाखवलाय त्याला क्लिक करा… कमेंट करा…

खुप आभार तुमचे… तुम्ही लिंक क्लिक करून पूर्ण कथा वाचली…

सौ. वर्षा विशाल ठुकरुल
Velvet Kavisha

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा