चंद्र आजही निघाला होता… पण….?????

Written by

चंद्र आजही निघाला… पण जरा ओशाळलेला होता…
नेहमी प्रमाणे शांत.… पण जरा तळमळत होता…

पौर्णिमेचा पूर्ण गोल… पण जरा झाकोळलेला होता…

प्रकाशित पूर्ण… पण जरा काळवंडलेला होता…

प्रेमवीरांच्या कवितेतील… प्रेयसीचा मुखडा होता…
न निजणाऱ्या बाळाच… अंगाई गीत होता…
निबोणीच्या झाडामागे... लुकाछुपी खेळणार बाळ होता…
काल्पनिकच सही… मामा म्हणून भाच्यांचा गराड्यात होता…

चंद्रच होता तो… पण जरा कासमुसलेला होता…
मला कुणी बघत नाही... म्हणून हिरमुसलेला होता…
चांदण्या असूनही... एकांतात हरवलेला होता….
चंद्रच होता तो.. पण आज खरंच रडवेला झाला होता…
✍️जयश्री कन्हेरे -सातपुते ☺?

आवडल्यास like कॉमेंट करायला विसरू नका.. शेअर करायच असेल तर प्लिज नावासहित करा.. ©®जयश्री कन्हेरे -सातपुते फोटो. साभार गुगल… ??

Article Categories:
कविता

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत