चंद्र कोर

Written by

चंद्र कोर….

     

     रितेश यु.एस. वरन आल्याआल्या पहिलीच मुलगी बघायला गेला. आतुन खुप धड धड होत होत पण उत्सुकता ही खुप होती… कांद्या पोहयांचा कार्यक्रम सुरु झाला… मेघना ट्रे घेवुन बाहेर आली… काठाची गुलाबी साडी, लांब काळेभोर केस, मोत्यांचा गळया-कान-हातांचा सेट, गोरी गोमटी नाजुक शरीरयष्टी, ओठांवर स्मित हास्य त्यात तीच्या कपाळावरची चंद्र कोरेची लाल टिकली… साजेल शोभेल अशी लोभस दिसत होती. बघताच रितेश तिच्या प्रेमात अडकला. एका नजरेत हृदय घायाळ झाल. 

   त्याने लग्नाला संमती दिली. मेघना ही हासी ख़ुशी लग्नाला राजी झाली. “चट मंगणी पट ब्याह” करुन पंधरा दिवसात त्याने तिला आपल करुन घेतल…. 

लग्नाची पहिली रात्र होती…….

मेघनाच्या मांडीवर डोक ठेवुन गालावरील केस बाजुला करीत रितेश म्हणाला…

         “तुला माहिती आहे…. तुला बघताच माझी विकेट पडली होती. तुझ्या कपाळावरच्या या चंद्राच्या कोरोने बघता क्षणीच घायाळ केल होत… तुझ्यावर ही टिकली खुप उठुन दिसते…. मी असो नसो नेहमी तुझ्या कपाळावर तिला मात्र असु दे”,.

“अहो…. काही काय बोलताय… पुर्ण आयुष्यभर मला असच तुमच्या सोबत घालवायच आहे”……

“मी आहोच ग….!!!!!! 

          बोलता बोलता दोघे एकामेकाच्या कुशीत हरविले…………..

 कधी रूसवेकधी फुगवे…..

कळत नकळत….दिवस लोटले….

कधी तो जिंकलाकधी ती जिंकली….

कधी तो मुद्दाम हरला… तर कधी तिने हरल्याचे नाटक केले…..

दोघांच्या ही आसवांचे बांध… बरेच दा फुटले….

कधी रागात तो उपाशी झोपला…तर कधी ती जेवणाला मुकली..   

हळुच मागन मिठीत घेवुन.. वर्षें मिनीटांप्रमाणे सरली…

एक दिवस आला तो देवा घरी गेला… पण ती मात्र मागेच सुटली…..

         लग्नाची १५ वर्षें लोटुन गेली… एका अपघातात रितेश मेघनाला सोडुन गेला… तिच्या हृदयाला मोठा आघात झाला…..  तिचा साज शृंगार उतरला…. पण त्यानी म्हंटलेल ( मी असो नसो नेहमी तुझ्या कपाळावर तिला मात्र असु दे ) ती विसरलीच….

            तो गेला त्याच रात्री मेघना त्याच शर्ट डोक्या खाली घेवुन अश्रु गाळीत होती… सगळीकडे शांतता होती. मध्य रात्री अचानक एक गार झुळुक तिच्या चोही बाजुला फिरली… अंग शहारुन उठल… डोळयात वेगाने धारा लागल्या…. ओठ थरथरु लागले…. अंग भारी होवु लागल…तिला काही कळेनासे झाले… आणि तिचे डोळे मंदावले…. 

          सकाळी उठुन बघते तर……

                    तिच्या कपाळावर ती चंद्राची कोर तेवत होती..  बघुन ती ढसाढसा रडु लागली….. घरभर कावराबावरा होवुन त्याला शोधु लागली….. त्या चंद्राच्या कोरेत त्याचे प्रतिबिंब अनुभवु लागली…. 

धन्यवाद…!

©️अश्विनी दुरगकर ?

       

     

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा