चला लोकशाहीला बळकट करुया …!!

Written by

🔴चला लोकशाहीला बळकट करुया…!!

२१ आक्टोंबरला महाराष्ट्रात मतदान होत आहे.मतदानाचा हक्क हे आपले मुलभुत कर्तव्य समजुन मतदान केले पाहिजे.भारतिय लोकशाहीला सदृढ करण्यासाठी युवकांचे योगदान महत्वाचे असते.सर्व राजकिय पक्षांचा डोळा युवकांच्या मतावर असतो त्यांना राजकिय प्रवाहात आणून त्यांचा वापर आपल्या स्वार्थासाठी करण्यात राजकिय नेते वाकबगार असतात.पण युवकवर्गाने व समाजातील सर्व मतदारबंधुभगिनीनी जात पात , धर्म , पंथ या पलीकडे जाऊन मतदान केले पाहिजे .अनेक अमिषे , प्रलोभने , आश्वासने मतदाराला दिली जातात पण आपण विवेक बुध्दीने चांगल्या सक्षम उमेदवारालाच मतदान करावे .आपल्या भागाचा , देशाचा , मतदारसंघाचा विकास करणार्या व तळागाळातील जनतेचा विचार करणारा , अभ्यासू व निष्कलंक उमेदवारालाच निवडून द्यावे.
मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी असते तरीसुद्धा बरेच मतदार मतदानाचा हक्क बजावत नाहीत हे खरोखरच निरासजनक आहे.भारतिय लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदार जागृत असला पाहिजे त्यासाठीच सर्वानी मतदान करणे अनिवार्य आहे.मतदानाचा हक्क बजावून महाराष्ट्राला समृद्ध करुया…!!

जेंव्हा बोटाला लागते शाई
तेंव्हा मजबूत होईल लोकशाही

©नामदेव पाटील ✍

Article Categories:
राजकीय

प्रतिक्रिया व्यक्त करा