चहा

Written by

 

चहा हमने, चहा है तुमको

चहाची तल्लफ आली ना की काही सुचतच नाही, मग ती सकाळची वेळ असो, किंवा दुपारचा तीन चार वाजता. प्रवासात असलो तर मग विचारूच नका ,तीन चार वाजले की चहाची मनासारखे टपरी शोधणं हा एक व्यापच असतो आणि त्यावेळेला जर हवा तसा चहा मिळाला, तरच ती तल्लफ जाते.
मी अगदी चहाबाज नसले ,तरी सकाळचा आणि दुपारचा चहा हवाच .कधीतरी पावसाळी वातावरणात आणि हिवाळ्याच्या थंडीत तीन-चार वेळाही घेता येतो चहा.
बाल्कानीत बसून निवांतपणे घेतलेला चहा,आॅफिसमधला तरतरी आणणारा चहा,सकाळी जाग आणणारा चहा,भज्यांसोबतचा चहा.प्रत्येकाची गोडी वेगळी बरं का. आणि ज्यावेळी चहा हवा तेंव्हा चहाच हवा.सरबत,काॅफी,नारपाणी हे पर्याय चालतच नाही.
याची रूपे तरी किती साधा चहा, दूध पावडरचा चहा, फक्त दुधाचा चहा ,वेलची युक्त चहा ,आलेवाला, चहा गवती चहा,तुळशीचा चहा.
आता ग्रीन टी ,लेमन टी, चॉकलेटी टीअशी बरीच भावंड या चहाला आलीत .पण शेवटी आपला छान पैकी उकळलेला, दुध घातलेला,साखरयुक्त, थोडासा मसाले वाला चहा याची सर इतर कोणत्या चहाला नाही हे खरं.
आजच्या जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने एवढेच म्हणणे,

चहा
चहा है तुमको दिलोजानसे

  • भाग्यश्री मुधोळकर
Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.