चांदन्या रातीत…

Written by

चांदन्या रातीत

गीत माझे गावे !

शब्दरंगात न्हाउन

मी बेहोश व्हावे !

तुझ्या स्वप्निल रंगतीत

नदी किनारी फिरावे !

मी धुंद होऊन

दुर देशी जावे !

पुष्पांच्या दुनियेत

तुज स्वप्ननगरित न्यावे  !

तुझ्या या रूपास 

माझे शब्द करावे !

तुझे सौंदर्य घेऊन 

मी माझे गीत भरावे !

Article Categories:
कविता

Comments are closed.