चायलेंज

Written by

तुझ्या मनाच्या पतपेढीत ।
माझ्या देहाचे तारण ।।
जसे तळलेल्या करंजीत ।
ओल्या मटाराचे सारण ।।

एक्सेल शीटमधले तुझे माझे ।
दोन सेल करू मर्ज ।।
अडबलनाथ सहकारी बँकेतून घेऊ ।
घरासाठी जॉईंट कर्ज ।।

तू न माझी पक्षकार ।
मी न तुझा वकील ।।
पायजमा घातलेला बाप मात्र ।
शनवार पेठेतला छोटा शकील ।।

आपल्या प्रेमाच्या रेसिपीत ।
कांदा मारून बीफ खिमा ।।
गाडी गावभर ठोकली तरी ।
नोक्लेम बोनस विमा ।।

बिल नाही भरलं तरी ।
प्रेमाची कापू नकोस वीज ।।
मीही एक्स्पेन्स नाही करणार ।
आपल्या प्रीतीचं फायनान्स लीज ।।

Article Categories:
भयपट

प्रतिक्रिया व्यक्त करा