चिंता ubhta आयुष्याची

Written by
  • 4 आठवडे ago

बसल्या बसल्या चिंता करी उभ्या आयुष्याची होईल का पूर्तता दोघांच्याही स्वप्नांची

संपूर्ण आयुष्य जगायचंय एकमेकांच्या साथीने संसाराचा हा रथ पेलेल का दोघांच्याने

खरा ठरेल का आमचा संसार दोघांच्या वतीने एकटा कोणीतरी वागेल का समजुतीने

आई, बाबांची चिंता त्याचं मन पोखरी      दोघांनाही सांभाळेल का ही नवीन छोकरी

मुलांची जबाबदारी घेईल का एकटा कोणीतरी का पाठवणी होईल त्यांची पाळणा घरी

बसल्या बसल्या चिंता करी उभ्या आयुष्याची “मुंडावल्यातला तो” स्वतःलाच प्रश्न विचारी

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा