चिंब मन ( तिचं आणि त्याचं )

Written by
  • 1 महिना ago

चिंब मन ( तिचं आणि त्याचं )

पाऊस सुरु झाला तो जुन्या आठवणी घेऊनच,
पहिला पाऊस माझ्यासाठी आनंदी क्षण तर त्याच्यासाठी बिन बुलाया मेहमान जो त्याला कधीच नको असतो.
माझ्यासाठी पाऊस म्हणजे मातीचा सुगंध तर त्याच्यासाठी फक्त चिखल. माझ्यासाठी उत्साह तर त्याच्यासाठी घराबाहेर न पडण्याचं कारण.
पाऊस ज्याच्या प्रत्येक थेंबात मी संगीत शोधलं तर त्याने त्यालाच त्रासदायक रिपरिप म्हटलं. मला पाऊसात भिजून टपरीवर चहा हवा होता तर त्याला आजाराचं निमंत्रण  वाटलं.
माझ्यासाठी पाऊस म्हणजे चिंब धुंद आनंद तर त्याच्यासाठी ताणणार प्रकरण,
पाऊस माझ्यासाठी सुख दुःखाचा साथी,
तर त्याच्यासाठी नको असलेल्या आठवणी ना उगाळा,
पावसातली क्षण विरुद्ध जरी असली तरी एकमेकांसाठी त्या गोष्टी करण्यातच मज्जा आहे.

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत