चुकलो रे मी.. एक बाप म्हणून 😢😢

Written by

“चुकलो रे मी..एक  बाप म्हणून ”
©जयश्री कन्हेरे -सातपुते 📖✒️

समीर आज रागातच घरी आला.. काही तरी बिनसलं होत त्याच बाहेर..
रात्रीचे 11वाजले होते..
तो आलेला बघून त्याचे बाबा उठले.. किचन मधे जाऊन  ताट वाढायला घेतली… “अरे समीर हात धुऊन घे.. मी जेवायच थांबलो रे तुझ्यासाठी.. “

मला भूक नाही.. मी पार्टीतून आलोय. तुमचं तुम्ही जेवून घ्या.. आणि तसंही काय बनवलं तुम्ही.. पोळी.. भाजी बस..

अरे.. रोज रोज काय बनवायचं रे…कामावरून येउन थकतो मी.. तुला तर कितीदा म्हंटल जरा मदत करत जा.. त्या मोबाईल वरून बघून काहीतरी बनवून बघत जा..  तू कुठे ऐकतोस माझ.. कॉल करून सांगायचे तरी मला.. घरी जेवणार नाहीस ते.. उगाच स्वयंपाक शिल्लक राहील.. उद्या मलाच खावं लागेल ते.. तुला तर शीळ जातच नाही.. बाबा

    काय हो बाबा.. नेहमी टोचून बोलत असता तुम्ही.
काय केलंत तुम्ही माझ्यासाठी ..?
जे तुम्ही मला नेहमी टोमणे मारता..

मी कुठे टोचून बोललो रे तुला.. फक्त अन्न वाया जाऊ नये म्हणून म्हणालो.. अरे पोरा किती कष्ट करावे लागतात दोन वेळच जेवण मिळालं पाहिजे म्हणून.. याची जाणीव आहे का तुला.. तुला सगळं मिळत न आयत.. म्हणून तुझे नाटक चाललेत सगळे….बाबा

काय दिल हो तुम्ही मला?  दोन ड्रेस घालायला व दोन वेळच जेवण दिल की झालं का बापाचं कर्तव्य..
मी म्हणालो होतो का तुम्हाला माझ्यासाठी काही करा म्हणून?
की म्हणालो होतो मला जन्म द्या म्हणून?
जरा बघा माझे मित्र कशे बुलेट घेऊन फिरतात
पार्टी करतात,म्हणजे पार्ट्या देतात.. मी फक्कड आहे सगळ्यात.. एकदाही पार्टी दिली नाही कुणाला.. सगळे म्हणतात “तू फक्त खायला येत जा पार्टीत.. देत नको जाऊस पार्टी कधी.. फक्कड कुठला ” किती वाईट वाटत मला असं ऐकून..
लाईफ एंजॉय करणं कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला. माझ्या मित्रांसारखं जगणं म्हणजे जीवन जगणं होय…  याला म्हणतात लाईफ एन्जॉय करणं बाबा…
तुम्ही काय दिल मला….?
गरिबीची आयुष्य…  प्रत्येक वेळी कोणत्याही गोष्टीसाठी वाट बघावी लागते मला..
नको असं जीवन.
चुक केलीत तुम्ही मला जन्म देऊन…लाज वाटते मला तुमची.. बाप म्हणून कोणतंही कर्तव्य पार पाडलं नाही तुम्ही.. आणि वर मलाच अक्कल शिकवता.. जन्म दिला तसा गरजाही पूर्ण कराव्या लागतात बाबा.. अन्न, वस्त्र, निवारा या व्यतिरिक्त ही गरजा असतात आजकालच्या मुलांच्या..
फॅशनेबल कपडे, फिरायला गाडी, खिशात भरपूर पैसे हवे.. त्याला म्हणतात लाईफ एंजॉय करणं
तुम्ही जन्म तर दिला पण मुलाच्या गरजा, इच्छा पूर्ण नाही करू शकले.. शापित जीवन वाटत मला.. असं वाटत, जन्मताच मेलो असतो तर बर झालं असत. चुकलात तुम्ही मला जन्म देऊन… ” 😡😡😡

रागारागात नको… नको ते बोलला समीर बाबाला.. नाही वयाचा विचार केला व नाही बाबांच्या त्यागाचा.. फक्त बोलत सुटला तो.. आपल्या बोलण्याचे किती घाव झाले असेल बाबांच्या मनावर याचा विचारही त्याला शिवला नाही..

हे सगळं ऐकून.. समीरच्या बाबांना खूपच धक्का बसला.. काय बोलाव पोराला हेच कळेना त्यांना.. आपण कुठे चुकलो याला वाढवण्यात..?
आईविना वाढलेलं पोर म्हणून हे असं वागतय का?
खरंच मी चुकलो का बाप म्हणून?
याला रागावण्याचा, मारण्याचा अधिकारच नाही मला..
माझ आयुष्य जे मी याच्या आनंदासाठी खर्ची घातलं.. त्याच याला काहिच नाही.. 🤔🤔🤔स्वतःला सावरून ते बोललेच समीरला..
” हो रे बाळा.. चुकलो मी एक बाप म्हणून..
तुझी आई तुला जन्मदेऊन देवाघरी गेली. तुला सावत्र आई नीट सांभाळेल की नाही म्हणून दुसरं लग्न नाही केले मी.

सगळे म्हणायचे.. “अरे, एकटा कसा सांभाळणार मुलाला. तुलाही सोबतीची गरज आहे. लग्न कर दुसरं.. वाटेल तर मुलं नको होऊ देउ दुसरं.. पण लग्न कर.. आयुष्य खूप मोठ आहे. तू शेवटी बापच आहेस.. आई सारखं नाही सांभाळू शकणार समीरला.. ”
पण मी कुणाचंही ऐकलं नाही.. तुला सावत्र आईचा जाच नको म्हणू

तुझ्या गरजा, इच्छा पूर्ण करण्याचा माझ्या परीने पूर्ण प्रयन्त केला मी. माझ्या कुवतीप्रमाणे माझ्याने झालं ते सगळं केल मी. तुला खुश ठेवण्यासाठी झटत राहिलो. स्वयंपाक करणं, कपडे धुणं, सगळं.. सगळं केल मी.. तुझ्यासाठी.. तू असं बोलतोयस मला म्हणजे नक्कीच मी दिलेल्या संस्कारात काहीतरी कमी राहिली..😢😢
नाही रे… मी तुझ्यावर संस्कारच नाही करू शकलो..जे फक्त एक आईच करू शकते.. एकटा बाप नाही..  चुकलो मी चुकलो रे…. मी बाप म्हणून😢😢 इतक बोलून समीरचे बाबा.. खाली कोसळले...

   समीर धावतच जाऊन बाबांना मांडीवर घेऊन..

“बाबा.. बाबा.. काय झालं..?

बाबा बोला न…

बाबा.. बाबा.. बाबा “

पण आता समीरचा टाहो फोडण्यात काहिच अर्थ उरलेला नव्हता... त्याचा बाबा आता कधीच बोलणार नव्हता.. 😢😢😢समीरच्या हाती आता फक्त पच्छाताप बाकी होता.. कारण बाबा तर कधीच निघून गेला.. याच्या शब्दाच्या वारानी घायाळ होऊन…. 😢😢
समाप्त…….
📖✒️जयश्री कन्हेरे -सातपुते

(  बऱ्याच जागी ही परिस्थिती बघायला मिळते. याला मुलीही अपवाद नाहीत.. मुलगा घेतला मी इथे .. सत्य परिस्थितीवर लिहिलेली कथा आहे.. )
सगळीकडं थोड्याफार फरकान हेच आहे. बापाला असं बोलणारी पोर जेंव्हा बापाच्या वयाची होतील आणि त्यांची पोरं अस बोलतील, त्याचवेळी त्यांना समजेल की आपण आपल्या बापाला जेंव्हा अस तोडून बोललो, त्यावेळी त्यांना काय वाटल असेल. लेकरांचे हट्ट पुरवूनही ते असं आईबापाला बोलतात. यासारखे दुसरे दुःख नाही.असं काहीतरी ऐकल्यावर  बाप आतल्या आत पार कोलमडून पडतो . बापाच दुःख हे  बाप झाल्याशिवाय कळणार नाही..
म्हणून म्हणते आई – बाप जिवंत आहे, तो पर्यंतच त्याच्याशी निट वागा, प्रेम द्या, मान द्या… मुलं असं काहीतरी बोलून जातात आवेशात आणि उरतो तो फक्त पश्चाताप……बाकी काही नाही.

अस एकदम तोडून नका बोलत जाऊ आई -बापाला. लेकरांनी दोन शब्द, गोड बोलावे, मायेचे बोलावे एवढीच माफक अपेक्षा असते त्यांची. तुमचा पैसा नको असतो त्यांना.. तुमचा आनंदच त्यांचा आनंद असतो.  तो. तुम्ही प्रेम द्या, मान द्या बघा तरी आई -बाबा कसे आतर्बाह्य फुलून येतात .  समजुन घ्या आपल्या बापाला… कारण बाप कधी चुकत नसतो..
शेअर करायचा असेल तर नावासहित शेअर करा..  धन्यवाद 🙏  जयश्री कन्हेरे -सातपुते

Comments

  • Khup chan jayshree

    Vijay banait 4th जुलै 2019 8:11 am उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत