चुक कोणाची

Written by
  • 1 महिना ago

दोष दोघांचाही असेल किंवा नसेल हे त्या नशीब लिहिणाऱ्यालाच माहिती असेल, पण त्याची मानसिक शिक्षा ही कदाचित ते दोघेही अनुभवत आहेत.

एकमेकांवर जीवापाड प्रेम करूनही आज वेळ अशी की एकमेकांना टाळत असावेत. त्याने फक्त मोठ्या भावाचं लग्न होऊ दे मग आपण लगेच लग्न करू हीच अट घातलेली आणि तिने आताच घरी येऊन मागणी घाल हा हट्ट धरलेला ह्या दोघांमध्ये बाजी मारली नशिबाने म्हणजेच तिच्या आईवडिलांनी लग्न लावून उरकून घेतलं. नशिबात जे लिहलं होतं तेच घडलं तेव्हा हे दोघेही गाफील होते की त्यांची जोडी कधीच तुटणार नाही. आता ह्या गोष्टीला ६-७ वर्षे उलटली पण दोघांच्याही मनात कदाचित तेवढंच प्रेम किंवा जास्त राग दाटला असावा. दोघांच बोलणं पुन्हा सुरू झालं सोशल मिडियाद्वारे पण बोलण्यात विषय फक्त होता -चूक कोणाची. त्यातही त्याने हिला खूप समजावलं आणि पुन्हा एकदा सहज भेटण्यासाठी कबूल करवरून घेतलं,हिच्या मनात खूप धाकधूक होती की ह्या भेटीमुळे असलेल्या संसाराला ठेच नको पण तरीही मनाशी काही ठरवून भेटण्याचा क्षण ठरवला. हे सर्व बोलणं फक्त सोशल मीडियावर पर्यंतच सीमित होत, स्वतः चा मोबाईल नंबर देणं ही तिला धोकादायक वाटतं होत, नेमक भेटण्याच्या वेळीसच हा मोबाईल घरी विसरून कामात व्यस्त होता आणि तिथे वाट पहात असलेल्या तिने न राहवून त्याला खूप कॉल्स आणि व्हाट्सएप मेसेजेस केले, हेच सर्व मॅसेज ह्याच्या पत्नीने वाचले आणि कशाचाही विचार न करता दोघांनाही दोषी ठरवून त्यांची हीच प्रवृत्ती असल्याचं जाहीर केलं. फक्त एक भेट किंवा आवाज ऐकणं ही त्यांचा नशिबी नाही आलं आणि पुन्हा दोघे एकमेकांच्या खूप दूर निघून गेले हाच विचार करत की चुक कोणाची

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत