चूक कुणाची??

Written by

प्रिया नाजूक ,दिसायला मध्यम परंतु अतिशय चंचल.मग ते कोणतेही।   काम व असो, कॉलेज  मधील अभ्यास  किंवा घरकाम ..त्यामुळे कॉलेज मध्ये अनेक जण तिची मदत घेत.घरी देखील ती अनेक कामात मदत करत असे काही क्राफ्ट वर्क असेल, पदार्थ बनवायचा असेल, कोणाला लग्ना साठी खरेदी असेल, अश्या अनेक गोष्टी मध्ये ती कोणी ना कोणाला मदत करत.. त्याच सोबत तीचं कॉलेज देखील सुरु च होते.. तेथे पण तिला  चांगले च मार्क मिळत.. अश्या प्रकारे तिचे आयुष्य सुरु होते .. रोज कॉलेज ,घर हे रोजचं ठरलेले..
अनेक मुलांना ती मनातून आवडत पण कोणी तिच्या डॅशिंग स्वभावा मुळे तिला सांगण्याची हिम्मत केली नाही.. अश्या त च कॉलेज मध्ये प्रोजेक्ट वर्क सुरु झाले. मग मार्गदर्शनाच्या निमित्ताने तिचा कोणा ना कोणाशी,कॉलेज च्या मुलं मुलींशी  संवाद होत होता.. त्यात तिला अनिकेत खूप छान प्रकारे मदत करत होता. तीचे एकच ठरलेले कीं प्रोजेक्ट सर्वात छान करून त्यात नंबर मिळवणे.. त्यासाठी ती रात्र दिवस एक करत होती.. अनिकेत ने तिला खुप छान प्रकारे मदत केली आणि आता ते एकमेकांचे खूप छान प्रकारे मित्र झाले..थोडयाच दिवसात प्रियाचे प्रेजेट्टेशन झाले व तिचा पहिल्या 3मध्ये नंबर आला ती खूप खुश झाली,तिला असे झाले हि बातमी ती कधी अनिकेत ला जाऊन सांगेल.. अश्या प्रकारे त्याचा संपर्क मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली आणि अनिकेत ला ती ,तिचा सहवास, तिचा स्वभाव आवडू लागला..इकडे प्रियाच्या मनात देखील तसेच काही होते पण कोणी एकमेकांना सांगण्याची हिम्मत करत नव्हते.. तेवढ्यात कॉलेज ची अंतिम परीक्षा जवळ येत होती ते सर्व अभ्यासात व्यस्त असल्याने त्यानां ह्या गोष्टी शेअर करायला निवांत वेळ च भेटला नाही सर्व गोष्टी मनात च होत्या..
बघता बघता परीक्षा जवळ येऊ लागली काहीच दिवसात परीक्षा पार पडली.. कॉलेज च्या शेवट च्या दिवशी मनातल्या भावना सांगाव्या असे दोघांना पण वाटले परंतु कोणीच हिम्मत केली नाही..बघता बघता सुट्ट्या लागल्या आणि त्याचे भेटणे कमी झाले.., आता मात्र दोघांना एकमेकांची उणीव भासायला लागली ..ते मेसेज फोन च्या आधारे संपर्कात होतेच.. असेच एके दिवशी बोलता बोलता अनिकेत ने तिला मनातली गोष्ट फिरवून सांगितली तेव्हा प्रिया  ला कळून चुकले कि जे माझ्या मनात तेच अनिकेत च्या देखील मनात..दोघे आता खूप खुश झालेले..आता त्याचं मन मोकळे झाले होते.. दोघे पण रोज फोन वर बोलू लागले. संपूर्ण सुट्ट्या त्त्यांनी फोन मेसेज यावर वेळ घालवला…
काहीच दिवसात परिकक्षेचा निकाल येऊन दोघेही चांगल्या मार्क्स ने उत्तीर्ण झाले.. पुन्हा त्यांचे कॉलेज सुरु झाले..अनिकेत शेवटच्या वर्षाला तर प्रिया तिसऱ्या वर्शात गेली ..दोघेही घरा पासून दूर कॉलेज ला असल्याने त्यांच्या वर इथे जास्त बंधने नव्हती .. कॉलेज सम्पले कि दोघेही भेटू लागली, बोलू लागली, सुट्टी च्या दिवशी फिरायला जाणे, पिक्चर ला जाणे असा  त्यांचा एकंदरीत प्रवास सुरु होता.. दोघांनीही आयुष्य सोबत घालावण्याच्या शपथा घेतल्या.. ते दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. त्यांच्या घरून विरोध होणार हे त्यांना चांगले ठाऊक होते तरीही ते निर्णयावर ठाम होते.
काहीच दिवसात अनिकेत चे शेवट चे वर्ष सम्पले व त्याला कॉलज सोडून जावे लागणार होते त्यामुळे दोघेही दुःखी होते परंतु पुढे भविष्या साठी त्याला बाहेर जाऊन नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे असल्याने दोघांनी आपल्या भावनांना आवर घालून मनाची तयारी केली…
आता अनिकेत शहरात नोकरी करत होता व प्रिया चे शेवट चे वर्ष होते.. दोघांचीही भेट कमी होत होती पण फोन च्या माध्यमातून ते संपर्कात होते. एकीकडे प्रिया चे शेवट चे वर्ष संपत आल्याने घरच्यांनी तिच्या लग्नाची तयारी सुरु केली
प्रिया सुट्टी मध्ये घरी जाता च घरी पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली ..इकडे प्रिया ची मात्र अजिबात मनस्थिती नव्हती..तिने आईला सांगितले मात्र आई ने ऐकताच विरोध केला, हे शक्य नाही असे सुनावले… पण लगेच ऐकणार ती प्रिया कसली कारण तिला फक्त अनिकेत शी लग्न करायचे होते.  एकीकडे अनिकेत ला समजल्यावर त्याच्या पण मनाची घालमेल सुरु झाली..  त्त्यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र दोघांच्या घरून तीव्र विरोध सुरु झाला. तरीही त्त्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही काहीही फायदा झाला नाही.. उलट त्यांना भावनिकरित्या अडकवले गेले शेवटी त्त्यांनी घरच्यांच्या आनंदा साठी प्रेमाचा त्याग करायचा ठरवला.त्यांच्या साठी हा खूप अवघड निर्णय होता तरीही त्त्यांनी सामोरे जायचे ठरवले.. काही दिवसात प्रिया चे लग्न ठरले व त्याच्या  काही दिवसात अनिकेत चे लग्न..दोघेही एकमेकांच्या संपर्कात नव्हते , कारण त्यानां पुढे जाऊन कोणाचीही फसवणूक करायची नव्हती
काही दिवसात प्रिया चे लग्न झाले. प्रिया चा नवरा चांगला होता नाव ठेवण्यासारखे असे त्याच्या मध्ये काहीही नव्हते परंतु प्रिया ला मनातून अनिकेत सारखं कोणीही नाही असेच वाटे..पण ती तिच्या कर्तव्यात, प्रेमात कुठेही कमी पडली नाही. सर्व जबाबदाऱ्या ती अतिशय मना पासून प्रेमाने पार पाडत होती.. ती चुकून पण मनात कधी अनिकेत चा विचार येऊ देत नव्हती.. तिला तिच्या वर प्रेम करणाऱ्या नवऱ्या बद्दल नेहमी आपुलकी,, प्रेम होते.. सर्व काही सुरळीत सुरु होते.. काहीच दिवसात प्रियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. खूप छान असे चालले होते..प्रिया देखील रुळली होती तिचे पण तिच्या कुटुंबावर प्रेम होते..
पण म्हणतात ना अडथळा नाही तर ते आयुष्य कसले?
एके दिवशी प्रिया चा नवरा घरी आला पण एकदम रागात.. प्रिया बोलायला जाताच तो तिच्याशी उद्धट पणे बोलला..तिने ते सोडून दिले काही टेन्शन मध्ये असतील म्हणून..पण तो मात्र तिला आता काहीही बोलायला लागला.. तू मला फसवले, तुझं प्रेम प्रकरण मला समजले अश्या प्रकारे तो अनेक आरोप करू लागला.. एकीकडे प्रियाला काहीच अर्थ लागत नव्हता तेव्हा त्याने अनिकेत चे नाव घेतले तेव्हा प्रिया घाबरली..
पण तिचा नवरा एकच आरोप करत राहिला मला फसवले म्हणून पण प्रिया ने लग्ना नंतर अनिकेत शी साधा संपर्क देखील केला नव्हता त्यामुळे ती गोंधळून गेली.
तेव्हा तिने नवऱ्याला शांत राहण्याचा सल्ला दिला.. मात्र तो तिला जाब विचारू लागला. घरात आई वडीलांसमोर सर्व गोंधळ सुरु झाला, तेव्हा प्रिया म्हंटली मी सर्व सांगते तेव्हा तिने त्यांच्या बद्दल सर्व सांगितले की लग्ना आधी त्यांचं प्रेम होते परंतु घरातील विरोधामुळे त्त्यांनी लग्न केले नाही हे ऐकल्यावर मात्र तिच्या सासू सासर्यांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला..त्यांनतर कोणीच तिच्याशी नीट वागेनासे झाले.. ती सर्वांना ओरडून सांगत होती की  तो माझा भूतकाळ होता आता माझं सर्वस्व तुम्ही आहेत पण त्यांचा स्वाभिमान कुठे तरी दुखावला ह्या अविर्भावात ते प्रिया कडे दुर्लक्ष करू लागले..
फक्त कामापूरत तिच्याशी बोलणे,पाहुण्यांसमोर बोलणे एवढच तिच्याशी सर्व बोलत. त्या व्यतिरिक्त प्रेमाने बोलणे,विचारपूस करणे असे काहीही तिला अनुभवायला मिळत नव्हते ..तिच्या भूतकाळाचा तिच्या वर्तमानावर असा काही परिणाम होईल असा तिने विचार देखील केला नव्हता परंतु आता तिच्या वाटेला द्वेष च आला होता.
हे दु:ख ती  घरी  माहेरी देखील सांगू शकत नव्हती कारण तिला ह्या वयात आई वडीलांना त्रास द्यायचा नव्हता, म्हणून ती सर्व सहन करत होती, एकाच आशेवर कि आज नाही तर उद्या सर्व काही नीट होईल..
परंतु आज देखील प्रिया च्या वाटेला द्वेष आहे.. तिला अनेक स्वातंत्र्या  पासून वंचित ठेवले गेले .तिला नोकरी ची परवानगी नाकारली, तिला फोन दिलेला नाही माहेरी करायचा असल्यास नवऱ्याचा फोन घेऊन त्यावरून त्यांच्या समोर बोलणे असा अनेक प्रकारे ती सहन करत असून यात खरचं  तिची चूक आहे का?? लग्ना नंतर जर ती भूतकाळ विसरून वर्तमान काळ स्वीकारत असेल तर तिच्या भूतकाळ वरून तिला त्रास देणे योग्य आहे का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे..
भूतकाळ आपल्या हातात नाही पण वर्तमान काळात आपण भूतकाळाचे पडसाद उमटवत नसेल तर इतरांनी त्यावरून त्रास देने दोषी ठरवणे चुकीचे आहे . प्रेम करणे गुन्हा नाही तिने प्रेम केले पण घरच्या लोकांसाठी तिने प्रेमाचा त्याग करणे हे देखील मोठेपण च होते.. जर ती सर्व विसरून नीट राहतेय तर नवऱ्याने ह्या गोष्टी  एकांतात बोलून समजून घेने महत्वाचे ..

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा