“चूक नसतानाही…”

Written by

“चूक नसतानाही…”

काहीही घडले की तुझ्यामुळे घडले.. तुझ्यामुळे घडले…
साऱ्यांच्या चुकांचे खापर माझ्या माथी फोडले…
चूक नसतानाही आजवर सारे सहन केले…
पण बस झाले आता मी आवाज उठवायचे ठरवले…!
साऱ्यांना आपले मानले.. चुकले का माझे..?
माझी माणसे म्हणून सर्वांचे केले.. चुकले का माझे..?
चूक नसतानाही आजवर सारे सहन केले.. चुकले का माझे..?
पण बस झाले.. आता मी आवाज उठवायचे ठरवले…!!

(कैफियत एका स्त्रीची)

© सौ. सुचिता वाडेकर…✍

Article Categories:
कविता

Comments are closed.