“चौकट”

Written by

ती गुदमरली,
अखिव-रेखीव चौकटीत ती एकदा गुदमरली,
म्हणून चौकटी बाहेर पडली…
आणि तिच्यासाठी चौकट कायमची मिटली….

तो ही एकदा गुदमरला,
आणि चौकटी बाहेर पडला…
मोकळ्या हवेत मोकळा होऊन,
पुन्हा परतला…

त्याच्यासाठी मात्र चौकट उघडीच होती,
‘सुबह का भूला, श्याम को लौट आया’ म्हणत
त्याचं स्वागत केलं सर्वांनी…

आणि ‘राह भटक गयी’ म्हणत
तिला मात्र टोचून खाल्लं
असंख्य गिधाडांन्नी…

दिप्ती

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत