छंद…. भाग…२

Written by

 

       जस चालल आहे सगळ तसच चालल होत. पूर्णा मंदारच्या घरच्यांच्या मनात आपली कोरडी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होती आणि तोंड घाशी पडत होती… घर आणि क्लिनिक मोठया हळहळीने ती सुरळीत चालवायची…पण सासरच्या लोकांच्या अपेक्षा पुर्ण करता करता स्वतःला ती हरवुन बसली…..  सदैव खळखळत असणारी  पूर्णा कोमेजु लागली होती.. मराठा आणि दक्षिणी संस्कृती जपता जपता तिचा मुरांबा व्हायचा…. तिच्या माहेरच्या लोकांची सासुबाईंना खुप चिड होती…. म्हणुन ये जा ही कमी असायची.. पूर्णा pure non vegitarian आणि मंदारच्या घरचे pure vagitarian होते… म्हणुन तिच स्वयंपाक खोलीत येण सासुबाईंना पटत नसे…

त्या खुप नियमबद्ध आणि तत्ववादी होत्या… दुसऱ्या संस्कृतीची धाप घरात पडु नये म्हणुन त्या वाटेल ते करायच्या….. 

 त्यांच्या घराण्यात तीन पीढ़यांपासन एकही मुलगी जन्माला आली नव्हती… खुप नवस पाणी केलेत पण आजतायत तस झाल नाही म्हणुन मुलीच प्रेम काय असत त्यांना कळे ना… त्यांच्याशी कस वागाव, कस समजवाव त्यांना उमजेना… त्या फक्त आपल्या तत्वांना घेवुन चालायच्या…

     पण मंदार पूर्णाला नेहमी म्हणत असे” माझी आई नारळाप्रमाणे आहे…तु फक्त धिर धर”… पण त्यांच वागण बघुन तिला याची शाश्वती दिसत नव्हती…सासरे बरेचदा पूर्णाची साथ द्यायचे पण सासुबाईंच्या भितीपोटी ते ही घाबरायचे… त्यांच्या पुढे कुणाची चालत नसे…. 

मंदार मात्र तिला आपल शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करायचा पण सासरच्या इतर मंडळींन कडन तिचा नेहमी अपमानच व्हायचा….

         वर्षाकाठी तिला दिवस गेले… दुसऱ्या पीढ़ीतील पहिल बाळ येणार होत…पण सासुबाईंच्या वागण्यात मात्र काही फारसा बदल झाला नव्हता… घरातील वातावरण मात्र हळुहळु बदलाच्या दिशेने वळत होते…काही नियम आता शिथिल झाले होते….. सासरे,मंदार,घरची ईतर मंडळी लपुन छपुन पूर्णाचे डोहाळे भागवायचे…. सासुबाईंचा काही विरोध नव्हता पण त्याच्या रागाचा ही काही भरवसा नव्हता…. म्हणुन सगळे घाबरायचे.. 

         पूर्णाचे दिवस भरले होते … अचानक अर्ध्यारात्री तिला त्रास होवु लागला.. बाळाने आत शी केली होती आणि ती बाळाच्या पोटात गेली… तिला असहय वेदना होवु लागल्या. ताबडतोब तिला रुग्णालयात दाख़िल करण्यात आले. Situation अगदी critical झाली होती… पूर्णाच बी॰पी॰ वाढत चालल होत… लगेच C- section करुन प्रसुती करण्याचे ठरविले…  मंदारचा जिव टांगणीला लागला होता… ईश्वरीय कृपेने सगळ सुरळीत पाडल.. घरी लक्ष्मीचे आगमण झाले…. गेल्या तीन पिढीनंतर पहिली मुलगी घरात आली… सासुबाईंनी बाळाला हाती घेतल… नाक डोळे अगदी रखरखीत चेहऱ्यावर देवी सारख तेज बघताच नजर वेधेल अशी सुरेख दिसत होती.. बघताच त्यांच्या तोंडुन लक्ष्मी नाव बाहेर पडल….. त्यांनी पूर्णाच्या डोक्यावरन हात फिरवला….आणि म्हणाल्या…” तीन पीढ्यानंतर लक्ष्मीची चाहुल आमच्या घराला लागली तुझे जेवढे आभार मानावे तेवढ़े कमी आहेत.. पहिल्यांदा सासुबाईंची माया तिला भेटली…. तिला खुप गहीवरुन आल आणि तिने त्यांना घट्ट मिठीत घेतल…. सासुबाईंच मन ही हळव झाल आणि त्यांची ही आसव कोसळली… त्यांना बघुन मंदार ढसाढसा रडु लागला…. ज्या दिवसाची वाट मंदार आणि पूर्णा आतुरतेने बघीत होते तो दिवस आला होता… दोघींचे करंट मारणारे तार एकदाचे जुळलेच… 

          घरात अगदी हर्षउल्लासचे वातावरण होत… लक्ष्मीचे आणि पूर्णाचे जोरदार स्वागत करण्यात आले… आधीच्या वातावरणात आणि आताच्या वातावरणात लाख मैलाचे साम्य होते… घरात सगळे लक्ष्मीच्या अवतीभवती फिरू लागले… सगळंचा जिव तिच्यात जडला…तिच्यामुळे घराला घरपण आले आणि पूर्णाला तिची जागा मिळाली.. ज्या प्रेमासाठी ज्या आशीर्वादासाठी ती वर्षभर तरसली ते सगळ तिच्या ऒंजळेत पडल.. ती जणु लक्ष्मीमध्ये आपल बालपण शोधत होती.. 

    लक्ष्मीमध्ये पूर्णा आणि मंदार दोघांच ही मिश्रण होत..  दक्षिणी आणि मराठीची सुबकता होती.. पूर्णानी तिला दोन्ही संस्कारात वाढवायच ठरवील.. पण अगदी नाकावरची माशी ही न हलु देणारी मंदारची आई लक्ष्मीच्या एका रुसव्यावर थईथई नाचायची… सासरे अतिशय आनंदीत होते. ज़िला आजपर्यंत कोणी नाचवु शकल नाही तिला नाचवायला आणि तिची क्लास घ्यायला एक छोटी मॅडम आली होती…तिच्या चुटचुट बोलण्यावर त्या जिव लावायच्या…

   लक्ष्मी पूर्णा प्रमाणेच एक awesome dancer होती जशी आईच्याच पोटातन शिकुन आली की काय… ईकडे गाण लागल तिकडे तिच सुरु व्हायच… 

अगदी पूर्णा प्रमाणे तिही तिच्या कलेत निपुन होती…..त्यातल्या त्यात पूर्णाप्रमाणे तिच्यातही दक्षिणी संस्कृतीचा झरोखा होता… 

        लक्ष्मी तिसरया वर्गात असतांना..  शाळेत एक नृत्य स्पर्धा होती… लक्ष्मीने खुप हट्ट धरला मला त्यात भाग घ्यायचा म्हणजे घ्यायचा… पण पूर्णा ती घटना विसरली नव्हती म्हणुन ती नाही च्या सुरात कायम होती… तिला आपल्या सुखी संसारात तडा नको हवी होती…. पण लक्ष्मी माने ना… 

ती घरभर जिद्द करीत होती… शेवटी तिच्या आजीला तिची दया आली आणि त्यांनी घरच्या सगळया मंडळीना एकत्र बोलावीले…

सासुबाई : लक्ष्मीला मला अस बघावल जात नाही. 

मंदार      : आई तिची प्रत्येक जिद्द पूर्ण करओढण्याचा     गरज काय.

सासुबाई : पूर्णा तू तयारी कर लक्ष्मी सहभागी होईल..

पूर्णा      :   नको आई रहेना दो…

सासुबाई : मी तुला विचारत नाही आहे. तुला सांगते आहे आता चर्चा नको…

         पूर्णाची इच्छा आधीच होती पण ती मुद्दाम नाटक करित होती…. ऐकुन पूर्णाचा आनंद गगणात मावे ना.. मंदार तर अगदी आसमान झेप घेवुन आला होता.. दोघी माय लेक़ी जमुन तयारीला लागल्या… स्पर्धेचा दिवस आला….लक्ष्मीला नाचतानी बघुन पूर्णा आणि सासुबाई खुप enjoy करित होत्या. 

            प्रथम फेरी जिंकुन तिने पहिला क्रमांक पत्कारला.. पण दुसऱ्या फेरीत “आई – मुलीला” सहभाग घ्यायचा होता… घरात पुन्हा शांतता पसरली… पूर्णाला हमी होती की आता हा प्रवास ईथेच थांबवावा लागेल.. घरची सुन चार चौघात नाचणे सासुबाईंच्या तत्वनिष्ठ स्वभावाला पटण्या पलीकडे होत… पूर्णा लक्ष्मीला शांत बसायला सांगायची पण ती मानत नसे… येवुन जावुन ती देव बाप्पाला प्रार्थना करीत असे…

“देव बाप्पा please माझ्या आईला माझ्या सोबत डांस करू दे”…

  पूर्णाच्या डोळयात अश्रुंच्या धारा लागायच्या.. लक्ष्मीने आजीशी बोलणे बंद केले होते. तु BAD आजी आहेस अशी म्हणायची… लक्ष्मीचा असा अबोला तिला सहन होत नसे.. त्यांनी मन पक्क करायच ठरविल… पूर्णाला एकट्यात बोलवुन लक्ष्मी सोबत सहभागी होण्यास परवानगी दिली… ऐकुन पूर्णा उड्या मारु लागली आणि दोघाींनी एकामेकाला घट्ट मिठी दिली… ऐकताच लक्ष्मी ही पळत आली आणि आजी ला येवुन बिलंगली… आजी नाती दोघीही आनंदाने नाचीत होत्या…

       पूर्णा आणि लक्ष्मी सरावाला लागल्या… तिला सासुबाईं समोर नाचायची लाज वाटायची पण त्या कालांतराने इतक्या खुल्ल्या होत्या की दोघींची छान जवळीक झाली होती..   

    स्पर्धेचा दिवस आला… दोघी माय लेकीनी सासुबाईंचा आशीर्वाद घेतला… स्टजेवर गेल्या… दोघींनी WOWTASTIC performance दिला..भरतनाट्यम आणि हिप होप च्या combination च नृत्य दोघींनी सादर केल. जजेस नी नृत्याला खुप दाद दिली.. सासुबाई अश्रुंना वाट मोकळी झाली होती… या क्षणांन साठी तो तरसत होता.. मंदार जाम ख़ुश होता.. 

लक्ष्मी परत एकदा स्पर्धा ज़िंकली.. 

     पण स्टोरी मध्ये परत एक मोट्ठा Twist येणार होता.. पुन्हा एका family member ला नृत्यासाठी सहभागी करायच होत.. आता सगळयांपुढे एक मोट्ठ प्रश्नचिन्ह येवुन ठाकल… 

    आता लक्ष्मी मॅडमला चिंता वाटु लागली… तिची पहिली आवड तिचा बाबा होता.. पण मंदारचा आणि नृत्याचा ३६ चा आकडा होता… पूर्णा आणि लक्ष्मीने त्याला शिकवण्याचा खुल प्रयत्न करित होते.. पण त्यातल अ च ढ त्याला येई ना… उलट तो नाचला की सगळे हसायचे… आता उरले फाँके सासु-सासरे..? सासऱ्यांकडन काही अपेक्षा नव्हती… मग आता एकमेव व्यक्ति होती जी त्यांना मदत करू शकत ती म्हणजे सासु बाई… 

     पण हे अजीबातच शक्य नव्हत. आता पर्यन्त होणारी गोष्ट निराळी होती… मात्र आता कदाचित त्यांना मागे पाऊल घ्याव लागु शकत होत..

     लक्ष्मीला ही आजीला force करायची हिम्मत नव्हती.. आता पर्यन्त जिद्द करून तिने सगळ मनवुन घेतल पण आता…? शक्य नव्हत… 

   घरात चित्तथरारक शांतता होती.. दुपारची वेळ होती… सगळे जण आपआपल्या खोलीत विश्रांती करीत होती… अचानक मोठयाने गाण वाजल… सगळे धावत पळत बाहेर पडले आणि मग बघते तर काय….?

      ——————————————

क्रमशः

लेख आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा . पुढील भाग तुमच्या भेटीला लवकरच…

 

शुद्धलेखनाच्या चुकांना कृपया माफी द्यावी…. ??

धन्यवाद…!

©️अश्विनी दुरगकर ?

        

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत