छंद…भाग-३

Written by

छंद…… भाग-३

    घरात चित्तथरारक शांतता होती.. दुपारची वेळ होती… सगळे जण आपआपल्या खोलीत विश्रांती करीत होती… अचानक मोठयाने गाण वाजल… सगळे धावत पळत बाहेर पडले आणि मग बघते तर काय….?                       मंदारची आई… हो त्याच….  पूर्णाच्या सासुबाई… भरतनाट्यमचा ड्रेस घालुन नाचीत होत्या… काय..? 

होsssss अगदी बरोबर वाचलय तुम्ही… 

   त्याच सासुबाई ज्यांनी सुन चार चौघात नाचली म्हणुन भर लग्नातुन हाकलुन लावले होते… हो त्याच त्या… मस्त proper ड्रेस बीस घालुन… सेम जश्या च्या तश्या मुद्रा करीत नाचीत होत्या… अगदी अशक्य ज्याची कल्पना कोणी स्वप्नातही करू शकत नव्हत ते आज घडल होत…

     सासरे बुवा, मंदार, लक्ष्मी, पूर्णा, घरी कामावर असणारी मंडळी… सगळे डोळे फाडुन एक तार बघीत होते… जस की वाघ दिसला की काय त्यांना…डोळयांवर विश्वास होण्यासारखी ही गोष्ट नव्हतीच… 

     वयाच्या ५८ व्या वर्षी भरतनाट्यम करतांना तिने पहिल्यांदाच कुणाला तरी बघीतले होते… ते ही एवढ सुरेख… उत्सफ़ुर्त होवुन… एक एक मुद्रा बिलकुल परफेक्ट…. जस की fully trained नृत्यांगना नृत्य करते…. सगळे धरे चे धरे रहिले… त्या surpriseचे वर्णन शब्दशाहा होवुच शकणार नाही अस दृश्य होत..

     गाण संपल आणि लक्ष्मीने आजीला धावत जावुन घट्ट मिठी मारली… त्या लहान मुलीप्रमाणे ढसाढसा रडु लागल्या… मंदार आणि पूर्णा ही गेले आणि त्यांना मिठीत घेतल… व ते दोघेही रडु लागले… 

           “मला माफ़ कर ग पूर्णा… माझ्यावर पडलेल्या बंदीच्या बेड्या मी तुझ्या ही पायी टाकल्या”…. सासुबाई रडत रडत म्हणाल्या..

“आई तुम्हीच मेरोको माफ करो… मैं ही नाहीच समजु शकली आपको”, सासुबाईंचे अश्रु पुसत पूर्णा म्हणाली…

“ त्या दिवशी तुला लग्नात नाचतांनी बघुन माझ खुप मन भरुन आल होत… तुझ्यात मला मीच दिसली.. अस वाटल त्याच क्षणी येवुन तुला मिठीत घ्याव पण दुसऱ्याच क्षणी घरच्या रुढी परंपरांनी मला दुर सारल… मी माझ्या काळातील एक चांगली नृत्यांगना होती पण अगदी वयाच्या १८ व्या वर्षी कोहळया वयात माझ तुझ्या बाबांशी लग्न झाल… ना पुढे शिकु शकली ना कोणती हौस पुर्ण करू शकली.. माय बापाची एकुलती एक लेक… फुलपालखरा सारख उडणार माझ मन… ईथे येवुन क़ैद झाल… माझे सासु सासरे अतिशय शिष्तप्रिय आणि तत्ववादी होते… त्यांच्याशी जुडवुन घेता घेता मी ही त्या प्रवाहात गुरफटक गेले आणि तु ही तसच कराव अशी अपेक्षा केली… मला खरच माफ़ कर ग….!!! मी खुप चुकले… खर तर मी तुला मुक्त वातावरणात वावरू द्यायला हव होत…पण मी माझ्याच ऐटीत राहीले… तुझ्या नाज़ुक मनाला समजु शकले नाही.. जे माझ्यासोबत घडल मी त्याचीच पुनरवृत्ति तुझ्यावर केली…

पण या ईवल्याश्या निरागस ईश्वरीय आत्मेने माझ्यातील माणुस जागा केला”…. 

“आई,,,,,,,, जे हो गया ते हो गया,  आम्ही तुम्हाला बघुन बहोत खुश आहोत”…

“अग पण आई तु हे आम्हला सांगीतल का नाहीस”, मंदार म्हणाला.

“अरे वेडया, हे गुपीत माझ्या सोबतच आल आणि माझ्या सोबतच दहन झाल असत ज़र ही गोड परी माझ्या आयुष्यात नसती आली”, लक्ष्मीचा लाड करित सासुबाई म्हणाल्या..

“अग… यशु मला तर सांगायच होत ना..? तुझा खरा गुन्हेगार तर मी आहे”, सासरे बुवा म्हणालेत..

“अहो…. जे नाही झाल त्याची खंत मला अजिबात नाही.. अर्ध आयुष्य तर क़ैद मैंनेप्रमाणे गेल पण आता मात्र मी पुरेपुर आनंद लुटून पुढले दिवस घालवणार आहे”….

      सगळे खुप आनंदीत होते… गगणात मावेना एवढ सुख त्यांच्या झोळीत पडल होत… एखाद झाड कस एकदम बहरत आणि तुडुंब फुलांनी गजबजत तसेच सगळयांचे मन झाले होते… 

      लक्ष्मीच्या ही समस्येचा आता अंत झाला होता… तिला तर ईकडे उड़ी मारु की तिकडे अस वाटत होत… घरात तिन तिन नृत्यांगना होत्या… त्या ही एकदम expert…. 

        पूर्णा आणि सासुबाई दोघीही आपल्या आपल्या अनुभवाच्या मेळाने नृत्याचा अभ्यास करु लागल्या… शेवटच्या तारखे पर्यन्त जोमात सराव झाला…

स्पर्धेचा दिवस उजाडला..तब्बल ४० वर्षानंतर स्टजेवर performance देन काही सोप नव्हत… सासुबाई खुप nervous होत्या… पण पूर्णा आणि लक्ष्मी त्यांना वेळोवळी धिर देत होत्या.. 

           तिघिही तयारी करून आल्या.. अगदी नजर वेधावी एवढ्या सुंदर त्या दिसत होत्या… ५८ वर्षाची म्हातारी भरतनाट्यम पेहरावात कशी दिसत असेल याची आपण केवळ एक कल्पना करू शकतो…  मंचावर जोशी कुटूंबाच्या तीन पिढ़्या खंबिर आणि आत्मविश्वासाने उभ्या होत्या… 

             एक ज्यांनी चार भिंतींना सजवुन घराचा पाया मजबुत केला… दुसरी जीने चार भिंतींच्या घराला घरपण दिल… आणि तिसरी ती जीने घराला आत्मा दिला… मंचावर जाताच सगळी मंडळी आश्चर्याने बघीत होती… 

    मंदार आणि सासरेबुवा त्यांना मोलाचा पाठींबा देत होते… उपस्थित दर्शक मंडळीं आणि जजेस सुद्धा त्यांच नृत्य बघण्यास आतुर होते… 

     त्यांच गाण संपत पर्यन्त लोकांनी भरभरुन टाळयांचा गजर केला… तिघींनी मंच हादरवणार performance दिल…. सगळयांनी उभे राहुन त्यांना मानाचा मुजरा दिला… पूर्णा आणि सासुबाईचे डोळे गजबजले.. सासरेबुवा तर चक्क रडत होते…. खाली उतरून तिघिही लहानमुलां सारख्या उड्या मारीत होत्या… आयुष्यात आपले छंद शेवट पर्यन्त जोपासल्या नंतर स्वर्गाचा आनंद मिळतो… तोच त्या तिघी अनुभवत होत्या…

        विजेता घोषित करण्याची वेळ आली… सगळे जोशी… कुटूंबियाचे नाव घेत होते… परत प्रथम क्रमांक पत्कारून लक्ष्मी विजयी ठरली…  सासुबाईंनी हाती बाक्षिस घेतल आणि नाचु लागल्या… 

      एका छोट्याश्या स्पर्धेने तिघींचही आयुष्य कायमच बदलुन टाकल..सासुबाई आता dance class घेतात… पूर्णा clinic आटपुन सासुबाईं सोबत class सांभाळते… आणि सगळयांचा जिव की प्राण असणारी लक्ष्मी… state level वर एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे…

       अशी होती एका दक्षिण संस्कृतीमधन मराठा संस्कृतीमध्ये समावेशित झालेल्या पूर्णाची कथा…

                 —————————

   मैत्रीनींनो छंद कोणता ही असो त्याला शेवत पर्यन्त जोपासणे खुप गरजेच असत.. ज्यातन आपल्याला आनंद मिळतो… ज्या zone मध्ये आपण comfortable असतो ते आपण नक्कीच करायला हव.. बरेचदा लग्न, नौकरी, मुल बाळ, सासु सासरे या सगळयांमुळे आपण स्वतः कडे दुर्लक्ष करतो पण वेळेतन वेळ काढुन आपण स्वतःला द्यायला हवा…. आपण कितीही म्हातारे झालो तरी आपली आवड हृदयाच्या एका कोपऱ्यात नेहमीच जवान असते….

 

तो फिर हसो… जियो… मुस्कुराओ… 

 लेख आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा .

 

शुद्धलेखनाच्या चुकांना कृपया माफी द्यावी…. ??

धन्यवाद…!

©️अश्विनी दुरगकर ?

छंद…… भाग-१ 

by Ashvini Duragkar. 

 Read Here : https://www.momspresso.com/parenting/muliche-jivana/article/chamda-bhaga1

छंद… भाग-२ 

by Ashvini Duragkar. 

 Read Here : https://www.momspresso.com/parenting/muliche-jivana/article/chamda-bhaga2

Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत