छंद माझा वेगळा

Written by

मी mrs. वसुधा दीक्षित…

एका प्रतिष्टीत कंपनीत उच्चपदावर.खूप कष्ट करून मी आज या पदापर्यंत पोहोचली.

आज एक मोठ्या हॉलमध्ये चित्रकलेच भव्य प्रदर्शन भरविण्यात आलं होतं, आणि त्यासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं.

मी इथली पैंटिंगस पाहून भारावून गेली ….मन भरून आलं.

नकळतच मी आपल्या भूतकाळात गेली….

मला आठवताहेत माझे छंद…. खर पाहता मला चित्रकलेतच आपलं carier करायच होत.

पण घरची गरीब परिस्थिती त्यामुळे मला  लवकरात लवकर नोकरी करणे आवश्यक होते,कारण माझ्या पेक्षा दोन लहान बहिणी, एक भाऊ ,आणि आई यांची जबाबदारी माझ्यावर होती.बाबाचं मी लहान असतानाच निधन झालं होतं.

सर्वांचं educatuon उत्तम रीतीने पार पाडून,त्यांचं लग्न करून देऊन मी सर्व जबाबदाऱ्या उत्तम रितीने पार पाडल्या….आज सर्व जण आपापल्या संसारात खुश आहेत.आज सर्व सुख पायाशी लोळण घेत आहेत,पण कुठेतरी मी मात्र मनातून दुःखी आहे…

पण कोणाला सांगू?

हे रंग,कॅनव्हास, ब्रश बघितले ना की माझे हात आपसूकच त्यावर प्रेमाने फिरतात.  …..

————————————

अहो, मॅडम, ऐकताय ना, मघापासून आवाज देतेय,कुठंल्या विचारात आहात! तिच्या सोबत असलेल्या पाहुण्यांनी तिला विचारलं.

वसुधा- काही नाही हो, बस ह्या paintings पाहून थोडा वेळ  भूतकाळात गेले होते.☺️तिथल्या काही पैंटिंगस तिने खरेदी केल्या.

————————————–

 

मनु…. माझी छोटी परी….शाळेतून  धावतच घरी आली,आई, अग ये आई ,काय करतेस, “जर बघ तरी मला शाळेत काय मिळालंय ते”…मी हातातलं काम सोडून तिच्याजवळ गेले, तिने मला ०गच्च मिठी मारली,मी म्हणाले, अग काय झालंय सांग तरी….

तिने आपल्या ब्यागमधून एक छान मोमेंटो काढला, आणि म्हणाली,”हे सर्व तुझ्यामुळेचं ग”…आई तुला आठवतेय, मागच्या आठवड्यात आमच्या शाळेत एक स्पर्धा होती चित्रकलेची,आणि तू मला त्यात participet करायला लावलं होतं, आणि खूप मदतही केली होती,हो ना ग आई,..

शाळेत सर्वांनी माझं खूप कौतुक केलं,आणि मला स्टेजवर बोलावून दोन शब्द  बोलण्यास सांगितले,खरं सांगू आई मला ना डोळ्यासमोर तूच दिसत होतीस.

तुला चित्रकलेची  खुप आवड होती , अस तू नेहमी म्हनायची… पण तु ती पूर्ण करू शकली नाहीस, हो ना!

खूप खंत वाटायची ना तुला याची?

पण  माझ्यात तुझी ही कला आली बघ! म्हणूनच मी हे करू शकले ग……

तुझा नेहमीच मला सपोर्ट रहायचा. खरच ग आई हे सर्व न तुझ्यामुळेच…..

नकळतच माझ्या डोळ्यात पाणी आलं, माझी छोटी परी माझ्याजवळ आली ,”का ग रडतेस कशाला? माझं काही चुकलंय का?

मी तिला जवळ घेतलं,”नाही रे बाळा, मला खूप खूप आनंद झालाय.

लहानपणापासून चित्रकलेची खूप आवड,पण काही करणासत्व मी माझा छंद जोपासू शकले नाही,पण काही हरकत नाही.

माझ्या छोट्या परीने माझं अपूर्ण  राहिलेलं स्वप्न पूर्ण केलंय ना….

आता तिच्यासोबतच मी माझं  अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करीन…छंद जोपासायला वयाची मर्यादा नसते, हेच जणू ती मला म्हणत असावी…

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

लता राठी

अर्जुनी/ मोरगाव

आवडल्यास नक्कीच like, comment करा.

(Share सुद्धा करू शकता पण नावासहितच🙏😊)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा