‘छान किती‌ दिसते फुलपाखरू’🦋

Written by

(ही बालकथा तुमच्या लहान मुलांना नक्की वाचायला दर्या)

“सानू बाळा मला पुजेला फुले आणून दे.”आज्जीने देवघरातून सान्वीला आवाज दिला.”हो आज्जी म्हणत  सानू परडी घेउन अंगणातील बागेत फुले आणायला गेली.फुले तोडताना तिला पानांच्या मागील बाजूस बरेच काळे ठिपके दिसले.तिने आज्जीला फुले आणून दिली.”अगं आज्जी जास्वंदीच्या पानांमागे ना काळ्या मन्यांसारखे बरेच ठिपके आहेत”सानू आज्जीला सांगत होती.आज्जी म्हणाली “आधी  पुजा करते मग पाहूया.”                पूजा संपल्यावर सानूच्या हातावर साखर देत आज्जी म्हणाली”चल आपण पाहूया काय आहे ते.” दोघी बागेत गेल्या.आज्जीने बघितले पानांच्या मागे छोटी छोटी बरीच अंडी होती.”अगं सानू ही तर फुलपाखरांची अंडी आहेत,लिंबूच्या झाडावर भरपूर असतात चल पाहूया.”दोघी तिथे गेल्या.आज्जी सानूला दाखवू लागली .ही बघ ही पण फुलपाखरांचीच अंडी आहेत. Wow ! कित्ती छान ,मला फुलपाखरं खुप

आवडतात.  आज्जी यातून फुलपाखरं कधी बाहेर येणार.”अगं  वेळ आहे अजून त्याला,चार अवस्थांमधून‌ गेल्यावर रंगीबेरंगी फुलपाखरांचा जन्म होतो.तू रोज निरीक्षण करत जा या अंड्यांचे.” नातीचा अन् आज्जीचा असा संवाद सुरू होता.

सानूला अंडी निरीक्षणाचा छंद लागला होता.ती बागेत जाऊन रोज निरीक्षण करू लागली.काही दिवसांतच त्या अंड्यांच्या पुंजक्यामधून बाहेर आलेल्याअळ्या सानू ने पाहिल्या.  त्या झाडांची पाने फस्त करत होत्या.सानू घाबरली व आज्जीला हाक मारू लागली.आज्जी बागेत आली.”बघ ना आज्जी किती पाने खाल्ली या अळ्यांनी , आपण स्प्रे मारूया का झाडावर?सानू आज्जीला विचारत होती. आज्जी म्हणाली नाही सानू  त्यांचा ही जीव आहे,तुला फुलपाखरांचा जन्म पहायचा आहे ना? अळी  फुलपाखरांच्या वाढीचा दुसरा टप्पा.अळी झाडांची पाने खाऊनच वाढते.खुप खादाड असतात या अळ्या ,तुम्हा मुलांसारख्या.”सानू खुदकन हसली.


Pediasure 

सानू रोज निरीक्षण करायची.आता अळ्या चांगल्याच मोठ्या झाल्या होत्या.हिरव्यागार पानातून दिसू येत नव्हत्या.आज्जी सानूला सांगत होती.बघ या अळ्यांचा रंग हिरवा गार पानांसारखाचआहे.काही अळ्यांच्या अंगावर विषारी काटेही असतात.निसर्गानेच त्यांना शत्रूपासून,पक्षांपासून त्यांचं संरक्षण व्हावे म्हणून तशी सोय केलेली असते.” सानू ला बरीच माहिती मिळत होती.

अळ्यांची आता पुर्ण वाढ झाली होती.त्यांनी स्वत:भोवती कोष तयार केला होता.आज्जी सानूला सांगत होती ही फुलपाखरांच्या वाढीची तिसरी अवस्था.या टप्प्यावर अळी सुप्तावस्थेत स्वत:भोवती कोष करून रहाते.चिकट द्रावामुळे हा कोष झाडावरपानांखाली ,देठाजवळ चिकटून राहतो. सानू कोषाच निरीक्षण करत होती.”पण आज्जी फुलपाखरू कधी तयार होणार?”सानू आज्जीला विचारत होती.त्यावर आज्जी म्हणाली “अजुन आठ ते दहा दिवस तरी लागतील तु रोज निरीक्षण करत जा.

अन् काय आश्र्चर्य आठ दिवसांनी आज्जी अन् सानू निरीक्षण करत असताना कोष हळूहळू हलू लागला.त्यातून एक सुंदर रंगीत फुलपाखरू बाहेर येण्यासाठी फडफड करू लागलं.थोड्या वेळातच ते कोषातून पुर्ण बाहेर पडून उडू लागले.अहाहा!किती सुंदर सानुने हे सगळं मोबाईल मध्ये कैद केलं.एका सुंदर क्षणाच्या साक्षिदार होत्या सानू आणि आज्जी.

आज्जी किती सुंदर आहे हे  फुलपाखरू .फुलावर बसलेल्या फुलपाखराकडे बघत सानू म्हणाली “आज्जी पकडू का याला?” असं म्हणत सानू त्याच्या मागे धावू लागली.अग नको किती नाजुक आहे ते,तुला सापडणारही नाही.सानू खुप आनंदात  होती. ती आता  रोज रंगीबेरंगी फुलपाखरांमागे  बागेत बागडू लागली.

काही दिवसांत बागेत अनेक विवीध रंगी फुलपाखरे नाचताना दिसू लागली‌.फुलांवर बसलेली,फुलांचा मध पिणारी म्हणूनच ती फुलपाखरे हो ना आज्जी?”हो अगदी बरोबर”आज्जीला तिच्या लहानपणची कविता आठवू लागली.ती गाऊ लागली.

‘फुलपाखरू,

छान किती दिसते फुलपाखरू……

या वेलीवर फुलांबरोबर

गोड किती हसते फुलपाखरू……..

सानू ही आज्जीबरोबर  गाऊ लागली

मी धरू जाता येई न हाता

दूरच ते उडते,

फुलपाखरू……..                 🦋

(मुलांनो आवडली ना कथा,मग तुमच्या आवडत्या रंगाने फुलपाखरांत रंग भरा.

पशुपक्षांवर ,निसर्गावर भरभरून प्रेम )

सौ.सुप्रिया रामचंद्र जाधव

Comments are closed.